Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

यंदाची संक्रांत कशावर आरुढ आहे.
आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत हे खूप खास आहे. या सणाला खूप महत्त्व आहे.. तसेच प्रत्येक महिन्यात मकर संक्रात येत असते.

सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला मकर संक्रात म्हणतात.
महिने पण १२आहेत ,आणि राशि पण12 आहे. त्यामुळे महिन्यात एक संक्रात येतेच. पण सूर्य जेव्हा त्याची धनु रास सोडून मकर राशि प्रवेश करतो . मकर संक्रात होते. आपण मकर संक्रांतीच्या साजरा करतो.

नवीन वर्ष सुरू झालं की त्यात पहिला येणार सण म्हणजे मकर संक्रांत असते. मराठी महिन्यांमध्ये मकर संक्रांति पोष महिन्यात येते.
सोमवार 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांत आहे. संक्रमण नका सकाळी ७ वाजून १७ मिनिट ते सायंकाळी ६वाजून २० मिनिटापर्यंत आहे.

यंदाची संक्रांत कशावर आरुढ आहे?

पूर्वीच्या काळी गावाकडे ब्राह्मण हे त्याच्या गावी संक्रात सांगायला येत असतील व अजून पण येत आहेत.

संक्रांतीचे फळ– रविवार दिनांक14 जानेवारी २०२४ शके १९४५ पोस्ट ३ वाजून उत्तररात्री २ वाजून42 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.संक्रांतीच्या पुण्य करार हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून 17 मिनिट ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे.


सूर्याची मकर संक्रात विशेषकर्ण वर होत असल्याने

  • ,वाहन= घोडा,
  • उपवाहन= सिंह ,
  • वस्त्र = काळ,
  • शस्त्र =भाला ,हळदीचा टीला लावलेला आहे .
  • वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता =दूर्वा ,
  • जाती =ब्राह्मण,
  • भूषणार्थ =सोने धारण केले आहे.
  • नक्षत्रनाव = महोदती.

सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ते उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे, व नेऋत्य दिशेस पाहत आहे.
संक्रातीचे फळ=
संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत. त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेली आहे .त्या जनतेला फळ प्राप्त होईल,

पूर्वकालात द्यायचे दान

नवे भांडे ,गाईला घास, तील, गुळ सोने, भूमी, गाया, वस्त्र ,घोडा.

संक्रातीचे वर्ज कामे

दात घासणे, कठोर बोलणे ,वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नये.

संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया नी कोणती साडी नेसावी,

या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते .आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला एक अनन्य असे महत्त्व आहे. काही रंग सकारात्मक लहरी प्रदान करतात, आणि काही रंग अशुभ मानले जातात.
हिरवा= हा रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जाते .कारण नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते .हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे .शक्य असेल तर तुम्ही संक्रातीला हिरव्या रंगाची साडी नेसा.
लाल =लाल रंग हा पण खूप पवित्र आहे .आपण कोणतीही पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र पाटावर माडतो.लाल रंग हा सर्व देवींना तसेच माता लक्ष्मीला पण अतिप्रिय आहे .सौभाग्य मध्ये सर्वात महत्त्वाचा रंग म्हणजे कुंकू. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य ,धैर्य, मनोबल , व नवीन सन्मानाचा प्रतीक मानला जातो.

केशरी= केसरी रंग हा पण खूप चांगला रंग आहे .तुम्ही केशरी रंगाची साडी पण मी नेसू शकतात. केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्त याचा रंग आहे . केशरी रंग हा त्याग, न्याय ,शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे.

संदर्भ

  1. मकर संक्रांती २०२४ः संक्रांत कशावर आहे?

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo