गुरुपौर्णिमा 2022 मुहूर्त व माहिती

गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात.या दिवशी चार वेदाचे ज्ञान देणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. शिवपुराण नुसार वेद व्यास हे भगवान विष्णूं चे अशवतार मानले जातात.या दिवशी भगवान विष्णू ची पुजाचे विशेष महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमा पूजा विधी – सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. आघोळ करून सर्व काम आटपून घ्या. आपल्या घरात चागल्या ठिकाणची जागा पुसून घ्या. व तिथे पाट ठेऊन तिथे आपले जे गुरू आहे त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्या. त्याला दक्षिणा द्यावी. आपल्या जीवनात अनेक गुरू आपल्याला चागलं संस्कार व मार्गदर्शन करताना. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमा वेळ व मुहूर्त 2022

या दिवशी गुरू पौर्णिमा १३जुलै २०२२ ला आहे. वार बुधवार या दिवशी आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा या दिवशी पहाटे ४वाजल्यापासून सुरू होत आहे. त्याच वेळी पौर्णिमा तिथी १३जुलै रोजी दुपारी १२ वाजून ६ मिनिट वाजता समाप्त होईल.

गुरुपौर्णिमेच्या महत्त्व काय आहे ?

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूची पूजा केली जाते.
शास्त्रामध्ये गुरूला देवाच्या बरोबर मानले जाते.
या दिवशी गुरूचे व आपल्या पेक्षा मोठ्या माणसाचे आशीर्वाद घेतले पाहिजे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला सन्मान द्यावा.
धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू ची पूजा केली जाते.
या दिवशी भगवान विष्णू ला पंचामृत अर्पण केले जाते. व हे खूप शुभ मानले जाते.
या दिवशी गायीला चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात.

वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांच पूजन आहे, तत्वांच पालन आहे. गुरू कोण असतो, तर आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! मग गुरू म्हणजे एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.

गुरूकडून आपण विद्या, ज्ञान प्राप्त करतो. म्हणजेच इथे आदान-प्रदान आहे, ते ज्ञानाचे, विद्येचे!  गुरूकडून ज्ञान प्राप्त करायचे, त्याचे संवर्धन करायचे व अंतिमतः त्याच्या अभिनीवेशाचा त्याग करायचा, कशासाठी तर आत्मदर्शनासाठी व समाजासाठी! म्हणून गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे म्हटले आहे.

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे .
भारतीय संस्कृतीत गुरूला देवप्रमाने मानले जाते.
गुरुपौर्णिमा ला गुरू पूजन पण केले जाते.
भारतात गुरू पौर्णिमा मोठ्या उत्सवात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
प्राचीन काळापासून गुरू व शिष्याची परंपरा चालू आहे .
तसाच श्लोक आहे.
गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णू गुरूर देवो महेश्वरा,!
गुरू: साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरूवे नम:!

संदर्भ :

१ . विकिपेडिया मुक्त ज्ञान कोश .

आमचे इतर लेख :

Author: maymarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *