Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

२०२४ मध्ये भोगी सण कधी आहे ?

14 जानेवारी 2024 रविवार या दिवशी आपल्याला भोगी साजरी करायची आहे. मकर संक्रांतीच्या आधी जो दिवस असतो तो म्हणजे भोगी. भोगी हा नवीन वर्षाचा पहिला सणआहे. ‘न खाई भोगी त सदा होगी’हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. या शब्दाचा शब्दश अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी हा सर साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून मानला जातो.

पण भोगी म्हणजे नेमकी काय?

पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसरा अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तेव्हा त्याला भोग म्हणतात. हा शब्द भुज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभग्य स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी माहेरी येतात. फुगे असं हेमंत ऋतू मध्ये येणार सन आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं. आहारातील त्याच्या तितका चविष्ट पद्धतीने वापर केला जातो.

भोगी सणाची स्पेशल मिक्स भाजी

भोगी या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खेंगाट म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश असतो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खरडा ,सर्व शेंग भाज्या , वांगी, अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करतो. भोगीची भाजी प्रामुख्याने बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते. बाजरी उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्यात थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरी सोबत भाजी खाणे हे आरोग्याला पोषक आहे.

भोगी सणाची इतर राज्यातील नावे

  • भारतात वेगळ्या नावाने ओळखले जाते
  • तामिळनाडू= पोगल,
  • आसाम= भोगीपिहू,
  • पंजाब= लोहरी,
  • राजस्थान= उत्तरावर.

भोगी सणाचे धार्मिक महत्व

या सणाला धार्मिक महत्त्व पण आहे
सुहासिनी संक्रांतीला सुगडा ची पूजा करतात . भोगी या दिवशी काळ्या रंगाच्या मातीच्या सुगडाची पूजा केली जाते . सगळ्या शेतात भरलेले नव धान्य ठेवून पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात ठेवन त्याची पूजा केली जाते. धन धान्याचे प्रतीक म्हणून त्यात हरभरा ,गाजर, ऊस ,तील, शेंगदाणे,बोर,तिळगुळ हे साहित्य भरवलं जातं.

भोगी सणाची सुगड पूजा , सुगड पूजा कशी करावी

भोगी सणामध्ये सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडून केली जाते. त्यासाठी पाठ किंवा चौरंग मांडावा, छान रांगोळी काढली. पाटावर तांबड्या रंगाचे, लाल रंगाचा पीस टाकून ठेवायचे .व त्याच्या वरच्या तोंडाला पाच ठिकाणी हळद-कुंकू लावावे. त्या सुगडामध्ये आपण बनवलेला ववसा टाकायचा. अप्रत्यक्ष उघडा खाली तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे. आपण या सगळ्यावर दिवा ओवाळून ठेवायचा व नंतर नैवेद्य दाखवायचा. आपण गुळ दाखू शकतो किंवा तिळगुळ दाखवू शकतो.
आणि ही पूजा झाल्यानंतर हे जे सुगर पूजा आहे ते झाकून ठेवायची आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा आहे.

संदर्भ

१.१४ जानेवारीला अशी साजरी करा भोगी।भोगीच्या दिवशी काय कराव

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo