Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

वर्षभरात पाच सोमवारी तुम्ही हे पशुपती व्रत करू शकतात .पूर्ण श्रद्धांने महादेवाचे हे व्रत तुम्हाला करायचे आहे .जर तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पशुपतीचे व्रत पाच सोमवारी करू शकतात. तर आज आपण पशुपती व्रत विषयी माहिती पाहणार आहोत,

पशुपति व्रत विषयी माहिती

पशुपती व्रत कसे करायचे-

पशुपती व्रत विषयी माहिती यात शिवपुराणात अनेक नियम सांगितले आहेत .पण आजच्या काळात सर्वांना नियमाचे पालन करणे शक्य होत नाही.
हे व्रत सलग पाच सोमवारी करायचे आहे .काही अडचणी आल्यावर तो सोमवार सोडून द्यायचा.
ही पूजा तुम्हाला मंदिरात जाऊनच करायची आहे.

पशुपती व्रतासाठी लागणारे साहित्य –

  • पाणी,
  • पंचामृत,
  • गंगाजल,
  • चंदन
  • भस्म,
  • पांढरी फुल,
  • बेलपत्र,
  • धोत्राचे फळ
  • नैवेद्यासाठी खडीसाखर ,
  • कापूर,
  • फळ,
  • उद,
  • वस्त्र .
    बेलाचे पानेही सोमवारी तोडायचे नाही आदल्या दिवशी तुम्ही तोडू शकतात.

पशुपती व्रत पूजा कशी करायची-

सोमवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून, देवाला जल अर्पण करायचे आहे . ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधी युक्त पूजा करायची आहे. तांब्या भरून जर आपल्या घरातून घेऊन जायचे आहे. मंदिरातले पाणी वापरायचे नाही
पशुपती व्रत करताना आपल्या घरातल्या पाण्याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे .आणि महादेवाची पूजा करायची आहे
नंतर पंचमृताने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे .जल अर्पण करत असताना किंवा पंचामृत अर्पण करत असताना ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. स्त्रियांनी नमः शिवाय असे म्हणायचे तर पुरुषांनी ओम नमः शिवाय जप करायचा आहे .हे पशुपती व्रत कोणीही करू शकतात. परत शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करायचे आहेत. शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची आहे. आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे.

शिवलिंगासमोर दिवा लावायचा आहे. शिवलिंगाला चंदन लावायचे आहे .बेलाचे पान अर्पण करायचे आहे. जमलं तर 108 बेलपत्र अर्पण करा. ते अर्पण करताना ओम नमः शिवाय जप करायचा आहे. शिवलिंगावर फुल वायचे आहे. धूप लावायचा आहे, पूजा करायचे आहे. नंतर पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे .फळ खाऊन उपवास करायचा आहे.

सूर्य मावळण्याच्या वेळेस महादेवाच्या मंदिरा जाऊन पूजा करायची आहे. जाताना तुपाचे सहा दिवे घेऊन जायचे आहे. ते प्रज्वलित करायचे आहेत. हा उपवास संध्याकाळी प्रदोष पूजा झाल्यानंतर सोडवायचा आहे.

संध्याकाळची पूजेचे साहित्य-

  • पाणी ,
  • पंचामृत ,
  • खडीसाखर ,
  • फुल सहा तुपाचे दिवे,
  • गोडाचा प्रसाद.

सूर्यास्ताच्या नंतर मंदिरात जाऊन ही पूजा करायची आहे .मंदिरात जाऊन शिवलिगाजवळ पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत. नंतर प्रार्थना करायची आहे .जो प्रसाद नेला आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत. एक भाग महादेवाला अर्पण करायचा आहे. एक भाग प्रसाद आणि एक दिवा आपण घरी घेऊन यायचं आहे. घरात जाताना उंबऱ्याजवळ उजव्या हाताला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रसाद सगळ्यांना द्यायचा.
प्रत्येक सोमवारी आपल्याला ही पूजा करायची आहे .असे पाच सोमवारी हे पशुपती व्रत भक्तिभावाने करायचे आहे .

तुम्हाला आमचा पशुपती व्रत विषयी माहिती हा लेख कसा वाटला .

संदर्भ

  1. पशुपती व्रत | सोमवारची पूजा | फक्त 5 सोमवार. करा हे पशुपती व्रत.मनातील कठीण इच्छा पूर्ण होईल.

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo