Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

मकर सक्रांति हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी महत्वाचा आहे तसे पाहता नव वर्षातील पहिला मराठी उत्सव म्हणून देखिल याला ओळखले जाते.

बयाच्या जुन्या पिढीतील व सध्या ३० ते४० या वयोगटतातील असनाऱ्याना मकर संक्रांत व पतंग यांचे नाते किती घट्ट आहे ही सांगायची गरज नाही.

तसेच आता मकर सक्रांति मध्ये तितके पतंग उडवणारे व त्यामागचे वेड दिसत नाही अशी खंत राहते.

2023 मकर सक्रांति ची तारीख आणि वेळ

सणाचे नाव24 तासांचा दिवसाचा कालावधीमहोत्सवाची तारीख
हिवाळ्यातील संक्रांतीरविवार15 जानेवारी 2023
मकर संक्रांत पुजा मुहूर्त : भारत , India
पुण्य काळ मुहूर्त : 07:15:13 ते 12:30:00
कालावधी : 5 तास 14 मिनिटे
महापुण्य काल मुहूर्त :
07:15:13 ते 09:15:13
कालावधी : 2 तास 0 मिनिटे
संक्रांत क्षण : 20:21:45 जानेवारी, 14
2023 मकर संक्रांतीची तारीख आणि वेळ

मकर संक्रांत हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. भारताच्या अनेक भागात आणि इतर काही भागांतही हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत साधारणपणे दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात सूर्य मकर राशीवर आल्यावर हा सण साजरा केला जातो. या दिवशी खिचडी खाणे आणि खिचडी दान करणे याला अत्यंत महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा सण हा शेतकऱ्यांचा मुख्य सण आहे. या उत्सवात सर्वजण सूर्यदेवतेची पूजा करतात.

मकर संक्रांति चे वाहन

या वेळी संक्रांतीचे वाहन वाघ, उपवाहन अश्व आहे. शस्त्र गदा आहे. वार मुख पश्चिमेकडे, करण मुख दक्षिण आणि दृष्टी ईशान्य आहे. कपडे पिवळे, दागिने काळे, काटे हिरवे, पदर आणि ती युवा अवस्थेत असून , बसलेल्या स्थिति मध्ये आहे .

आणखी एक मान्यते नुसार सन २०२३ मध्ये संक्रांतीचे वराह हे वाहन असेल , तसेच वृषभ हे उपवाहन असेल . यंदा संक्रांत पश्चिमाभिमुख उत्तर दिशेला येत आहे ती हिरवे वस्त्र व हिरवी कंचुकी, मोती, बकुळची फुले, म्हातारपणी चंदन लावून आणि खड्ग आयुध (शस्त्र) साठी तांब्याच्या भांड्यात भिक्षा खाऊन येत आहे.

मकर संक्रांति : पतंगाचा एक असाही सोनेरी काळ

मांजा सुतवणे त्यासाठी शिरस व काचा गोळा करणे, मग विविध दुकानात जाऊन स्वस्त व मस्त अश्या धाग्याची चौकशी करणे.

काच जर नाही मिळाली तर आसपासच्या घरातून गेलेली एखादी ट्यूब , बल्ब आणणे व एक कापडात त्यांना टाकून कुटणे.

मग एखादी मोकळी जागा पाहून तिथे धाग्या पासून मांजा तयार करत असू. ही प्रक्रिया मांजा सुतवणे अशी देखील ओळखली जाते.

तसेच घरात केलेला भात डिंक म्हणून आपण पतंग चिटकाव्याला वापरत असू , तसेच पतंगाची विविध नावे खूपच गंमतीदार होती.

जस बॉटल , फरया , लोधा, बॉम्बे , डुक्कल प्लॅस्टिक.

आता ते सर्व नामशेष झाल्यासरख वाटत.

नुसतीच पातंगांचीच नाही तर माजाची नाव देखील आगलीच होती.

जस हैद्राबादी बरेली , कमल बाबू , नवल बाबू , पांडा , लाल पांडा.

सुरती बरेली , त्यावेळेस प्लॅस्टिक च मांजा , नायलॉन मांजा आस काही प्रकार नव्हता.

त्या पतंगा च्या खेळाने बरच काही शिकवल.

एक रूपयाच्या पतंग साठी १- २ किलोमीटर आम्ही पळत असू , पण त्यात कधीच भिकारीपणा वाटला नाही , उलट टी पतंग हाती आली तर खूप आनंद होत असे.

आणि नाही मिळाली तरी इतक वाईट वाटत नसे दुसरी पतंग आम्ही पकडायला जात असू.

आम्ही बऱ्याच द कोणत्याही गल्लीत पतंग मागे धावत आसत.

पण मोठ झालो आणि सगळी अदृश्य बंधने आम्ही स्वतः वर लादली.

जी नाही पाळली तरी काही होणार नाही पण प्रत्येकात स्वतच्या मानणं जगण्याची धमक असतेच आस नाही.

त्यावेळेस दुकान देखील जवळ जवळ नव्हती, कधी पतन आणायचा असेल तर सायकल वाला मित्र लागत.

३-३ जन आम्ही एक सायकल वर २ रुपयाचे पतंग आणायला जात असू.

आणि आम्हाला ५० पैशाची पतंग मागायला कमी पणा नव्हता वाटत.

पतंग आणि मांजा दरवर्षी विकत घेत असूत , पण मांजाची चकरी बरेच वर्ष जपून ठेवली जात असे.

एकट्याला जर पतंग उडवायची असेलतर आसरा चक्री भेटायची पण ती इतर चक्री पेक्षा महाग होती.

म्हणून ज्याच्या कड असल त्याला जास्त डिमांड होता.

अजून बरेचशे शब्द होते जसे अट्टी करणे , म्हणजे मांजा हातांवर गुंढाळणे . पतंगाची गोद, म्हणजे दोन पतंगांमध्ये काटा काटी करणे पतंग लप्पु आहे म्हणजे तो उडण्यास योग्य नाही किंवा ती पतंग नीट तैयार केली नाही.

सुत्तर बांधणे, म्हणजे पतंग उड‌वण्यास तिला छिद्र पाडुन मांजाने जोडता होईल असे मांजा बांधण्या योग्य गाठण तयार करणे.

म्हणून आमच्या सारख्या काही लोकांना मकर सक्रांति ही दिवाळी पेक्षा पण खूप जास्त आवडत असे. पण आम्ही आता का तसे नाहीत , ती बेफिकरी आणि ती ऊर्जा पुनः या सनाद्वारे आमच्यात तुमच्यात यावी हीच अपेक्षा आणि तुमचा मकर सक्रांति चा सण आनंदात जावो.

आमचे इतर लेख

संदर्भ

व्रत व पूजा वेळ : 2023 मकर संक्रांत दिनांक व वेळ, 2023 मकर संक्रांत सण वेळ सूची व दिनदर्शिका – सण दिनांक वेळ (festivalsdatetime.co.in)

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo