Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

कथा :

पुरणांमध्ये ब्रम्ह देवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेत विश्व निर्माण केले आहे , असे सांगण्यात येते . साडेतीन मुहूर्ता पैकी एक म्हणून गुढी पाडवा हा दिवस मानला जातो . 

मराठी नवीन वर्षाची सुरवात पण गुढी पाडव्यानेच होते . हिंदू संस्कृतीची नवीन वर्षाची सुरवात तसेच नवीन पंचांगाची सुरवात सुद्धा गुढी पाडव्याच्या दिवशी होते . 

मुहूर्त :

या वर्षी गुढी पाडवा हा सण 2 एप्रिल रोजी शनिवारी येत आहे . या दिवशी पहाटेच अभ्यंग स्नान करून आपल्या दारा पुढे रांगोळी काढायची आहे . आंब्याच्या पानाचे तोरण करून आपल्या घरच्या दरवाज्यात बंधावे . 

गुढीपाडव्याचा ह्या वर्षी मुहूर्त आहे तो सकाळी 0 6:10 वाजेपासून सकाळी 08:29 पर्यंत . हा वेळ इन्द्र योग सुद्धा आहे . 

गुढी कशी उभारावी ?

मध्यम ऊंचीची काठी घ्यावी , त्याला धुवून स्वच्छ करून घ्यावे , काठी च्या टोकाला किंवा मध्य भागी हळद व कुंकू लावून घ्यावे . नंतर काठी च्या टोकाला साडी लावून दोरीने बांधून घ्यावे. नंतर साखर गाठ घेवून तिला काठीला बांधून घ्यावे. फुलांची माळ असेल तर ती सुद्धा टोकाला बांधून घ्यावी . तसेच कडूलिंबाचे व आंब्याचे डहाळे न विसरता टोकाला बांधून घ्यावे. 

तसेच शेवटी कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कळस ह्या गुढी च्या टोकाला ठेवावा.

नंतर एक पाट घेवून स्वस्तिक काढून हळद – कुंकू लावून घ्यावे . तांदळाची रास घालून त्यावर गुढी उभारून घ्यावी .   

————————————————————–

आपल्या इतर सणवारां विषयी माहिती आमच्या मराठी सणवार या पोस्ट कॅटेगरी पेजवर उपलब्ध आहे .

टीप : दिवाळी सणाविषयी माहिती 

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo