Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे.श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जाते.तसेच आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकरा ची पूजा करतो.महादेवाला जवस, तीळ, मूग,तांदूळ अशी शिवमुठ वाहतो.या काळात नाग बिळातून बाहेर पडलेल्या नगामुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी पूजा करतात. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे कालिया  नागाचा पराभव करून यमुना  नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण  सुरक्षित वर आले .तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

नागपंचमी तारीख आणि तिथी २०२३

या वर्षी नागपंचमी तारीख : २१ ऑगस्ट २०२३ आहे.
वार – सोमवार आहे.

21 ऑगस्ट रोजी शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 20 ऑगस्ट रोजी 12:23 मिनिटांनी होईल.

नागपंचमी या दिवशी काय करू नये , प्रथा नुसार

आपण सण आला की पुरणपोळी करतो.आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी हा आवडता पदार्थ आहे. तर आपण हया दिवशी पोळ्या , व आमटी करू शकतो.
नागपंचीमीच्या दिवशी भात करू नये तसेच कोणतेही पदार्थ तळू नये. तसेच चिरू नये, तव्यांवर काही करू नये.शेतात नागर घालू नये,खुरपु नये, शेतातली कामे करू नये.

नागपंचमी या दिवशी काय करतात

नागपंचमी दिवशी वारुलाची पूजा करतात.नागपंचमी ला भावाचा दिवस सबोधल जात.बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी खास उपवास करतात.ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागला च भाऊ मानून नागाची पुजा करतात. नागपंचमी दिवशी मुली सूना झाडाला झोका बाधून झोका खेळतात.गाणी म्हणतात.हाताला मेहदी लावतात.

कथा नागपंचमीची

नागपंचमी कथा
नागपंचमीची कथा

एका नागोबा देवा, तुमची कहाणी.आटपाट नगर होतं.तिथं एक ब्राह्मण होता.त्या ब्राम्हणाला पाच – सात सूना होत्या.चातुर्मासात श्रावण महिना आला आहे.नगपचमीचा दिवस आहे.कोणी आपल्या आजोळी,कोणी पांजोली,कोणी माहेरी अश्या सर्व सूना जिकड तिकडं गेल्या आहेत.सर्वात धाकटी सून होती,तिच्या माहेरच्या कोणीच नव्हत .तेव्हा ती जरा गरीब होती.
मनात माझा संबंधी नागोबा देव आहे,अस समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल , अस म्हणून लागली.इतक्यात काय झालं? शेषभगवनास तिची करुणा आली .त्यानं ब्राम्हणांचा वेष घेतला व तो त्या मुलीला नेण्याकरता आला.ब्राह्मण विचारात पडला,हा इतक्या दिवस कुठे लपून राहिला होता व आत्ताच कुठून आला ?पुढे त्यांनी मुलीला विचारलं .तीन हाच माझा मामा आहे असे सागितले. ब्राम्हणानी तिची रवानगी केली.पुढे त्या वेषधारी मामान तिला आपल्या फनिवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला.आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चाऊ नका.

एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली तेव्हा हीला आपल्या हातात दिवा धरवयास सागितलं.पुढे तिला पिल्ल झाली ,तिची पिल्ल वळवळू लागली.ही मुलगी भिऊन गेली.हातातला दिवा खाली पडला.पोरांची शेपट जळाळी . नागीण रागावली सर्व हकीगत नवऱ्याला सांगितली.तो म्हणाला सासरी पोहचू.पुढं ते पूर्ववत आनंदाने वागू लागले.एक दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोहती केली.नागाची पोर मोठी झाली आपल्या आईबाबापाशी चौकशी केली की,आमची शेपटी कशाणी तुटली?तीनी मुलीची गोष्ट सांगितली ,त्यांना फार राग आला.तिचा सुड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी गेले.तो नागपंचमीचा दिवस होता.हिन आपली पुष्कळ वेळ भावाची वाट बघितली.

नागपंचमी कथा ..

अखेर ते येत नाहीत,म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली ,त्यांची पूजा केली.नागाच्या जवळ लाह्या ,दूध ठेवले.उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल पाहात होती. सरते शेवटी तीन देवाची प्रार्थना केली,जय नागोबा देवा,तिथं माझे भाऊ लाडोबा,पुडोबा,असतील ते खुशाल असोत,अस म्हणून तीन नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला.त्यांचा मनात तिजविषयी दया आली. पुढ त्यांनी त्या दिवशी तिथं वस्ती केली.दूध व पाणी ठेवतात त्यात त्यांनी पहाटेस नवरत्नचा हार ठेऊन आपण निघून गेले.दुसऱ्या दिवशी तो हार उचलून गळ्यात घातला.तिला नागोबा प्रसन्न झाला.

नागदेवताची पूजा कशी करतात

या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनिवर सडा टाकतात. अंगणात रंगोली  काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. ज्या महिलेला शक्य असेई तर त्या नागाच्या वारुळापाशी जाऊन गाणी म्हणतात . आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दुध, लाह्या  ह्या आवडीच्या गोष्टी नागांना वहिल्या जातात.

संदर्भ :

१ . चातुर्मास कथा संग्रह पुस्तक

२ . पंचांग संकेतस्थळ

आमचे इतर लेख :

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo