श्री साई बाबा शिर्डीत अवतरले : – महाराष्ट्रात शिर्डी हे श्रेत्र श्री साईबाबां मुळेच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते.हे श्रेत्र अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
श्री साई बाबा वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डीत एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले शिर्डीतील लोकांना पाहिले.त्यांच्या चेहेऱ्यावर तेजस्विता होती.
त्यांचा जन्म कोठे झाला त्यांचे माता – पिता कोण ते कोणत्या कुळात जन्माला आले त्यांच्या विषयी शिर्डीतील लोकांना काहीच माहिती नाही.
शिर्डीत प्रगट झाल्यावर ते रात्रंदिवस वर्षाचे बारा महिने त्याच कडुलिंबाच्या झाडाखाली आकाशाकडे एकटक पाहात बसत होते.कोणी जर काही खावयास दिले तर तेखत नसे.

चांद पाटील या मुस्लिम गृहस्थाची हरवलेली घोडी परत मिळाली – चांद पाटील हे गृहस्थ धुपखेड या गावात राहत होते.
त्यांची घोडि एक दिवस हरवली सारे प्रयत्न करून पण ती सापडेना.
एक दिवस चांद पाटील परगावा वरून परत येत असताना त्यांना कडुलिंबाच्या झाडाखाली एक फकीर बसलेला दिसला तो फकीर दुसरं कोणी नसुन श्री बाबाच होते.चांद पाटील यांना बाबांनी जवळ बोलविले. व बोलता बोलता चांद पाटील म्हणाले माझी घोडी हरवलेली आहे ती सापडेना.हे एकटाच बाबांनी एका विशीष्ट दिशेने बोट केलं व घोडी तेथे चरत आहे.चांद पाटील तेथे गेले असता घोडी तेथे सापडली.
त्यांना बाबा साधारण नसुन कोणीतरी फकीर अवलिया वाटली म्हणून त्यांनी बाबांना आपल्या घरी नेले

श्री साई बाबा आणि चांद पाटील
श्री साई बाबा आणि चांद पाटील
श्री साई बाबा : दीपउत्सव
श्री साई बाबा : दीपउत्सव

साईबाबा पुन्हा शिर्डीत आले –
चांद पाटील यांच्या मुलाचा विवाह शिर्डी येथील मुलीशी ठरला.लग्नासाठी लोक शिर्डीस निघाले चांद पाटील यांनी पण श्री बाबाना बरोबर घेतले होते.
शिर्डीत गेल्यावर शिर्डीतील खंडोबा मंदिराच्या समोरील श्री म्हाळसा पती यांच्या अग नात उतरविण्यात आले.
बैलगाडी तून लोकं खाली उतरवत असताना साई बाबा पण उत्रत होते.श्री म्हाळसा पती यांनी बाबांना ओळकले व या “श्री साई बाबा” म्हणून स्वागत केले.
द्रारका माई :- बाबाचे वास्तव्य ज्या मशिजित बाबांनी तेथे वास्तव्य करून राहण्यास सुर वात केली.त्या जागेला द्रारका माई या नावाने ओळखले जात होते.इथेच बाबाची एक कायम स्वरुपी धूनी प्रज्वलित केली.

असा झाला दिपोस्तव :-
श्री साई बाबांना दिवे सर्वत्र द्ररका माई त लावण्याचा छंद होता.त्या करिता त्यांना दुकानदार दररोज तेल देत असत पण एक दिवस सर्व दुकानदारांनी ठरवले की आज बाबांना तेल द्यावयाचे नाही.
बाबा सायकाळच्या वेळेस तेल आणण्यासाठी बाजारात दुकानदाराकडे गेले असता.
दुकानदारांनी तेल देण्यास नकार दिला.
बाबा परत द्रारका माई त हात हलवित रिकाम्या हाताने परत आले.
बाबा म्हणाले काय तेल व पाणी दोन्ही सारखेच असे म्हणून दिव्यात पाणी भरले व दिवे पेटवले.
द्रारका माई प्रकाशानी उजळून निघाली.उजललेली द्रारका माई पाहून गावकरी व दुकानदार हे चकित झाले.
सर्वांनी द्रा रका माईत जाऊन बाबाचे पाय धरले व झाल्या अपराध मुळे सर्वांनी श्रमा मागितली त्या दिवशी रात्र भर द्रार का माई त दिवे पाण्याच्या आधाराने उजळत होते.


बाबाच्या भास्माचा प्रभाव – असाच एक पारसी समाजाचा परिवार मुबईत रहात असे त्यांच्या मुलीला केव्हाही फिट्स येत असत.
त्या कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले पण फिट्स येत असत.
त्या पारसी सद्गृहस्थ चे मित्र श्री दीक्षित होते त्यांनी त्या मुलीला बाबाचे भस्म पाण्यातून काही दिवस औषध म्हणून पाजले त्यामुळे त्या मुलीला फिट्स येणे कायमचे थांबले श्री दीक्षित हे बाबाचे भक्त होते.त्यामुळे त्यांनी बाबवर विश्वास ठेऊन हा प्रयोग केला व तो यशस्वी झाला.
श्री साई बाबां चे असे अनंत चमत्कार व अनंत लीला आहेत.त्या लीला सा तेवढ्या कमीच आहे.श्री साई बाबा कृपा सिंधू करण्यामुर्ती होते त्यांचा जन्म च मुळात लोकोपकरा साठीच झाला आहे.
श १८४० विजया दशमी श्री साई बाबां नी समाधी घेतली आज ही समाधी जागृत आहे.यांचा अनेकाला अनुभव आला आहे.
“सबका मलिक एक हे”
//श्री सच्चिदानंद सदगुरू साई नाथ महाराज की जय//

आमचे इतर लेख इथे वाचा

संदर्भ :

श्री साई बाबा व्रत कथांची विविध पुस्तके