Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

अहमदनगर हा संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे . हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी स्थित आहे. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे .

अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ

जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे १७०४८ चौरस किलोमीटर इतके आहे. अहमदनगर मध्ये सध्या १४ तालुके आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४९ लाखाच्या आसपास आहे .

अहमदनगर जिल्ह्याचा नकाशा
अहमदनगर जिल्ह्याचा नकाशा

1. अहमदनगर जिल्ह्याचे हवामान व पर्यावरण

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगाचा काही भाग आहे . ह्याच भागामध्ये कळसुबाई चे शिखर आहे . ही शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अहमदनगर मध्ये प्रवरा , मुळा , गोदावरी , सिना व घोड या नद्या आहेत. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे.

2. अहमदनगर मधील धार्मिक स्थळे

नगर शहरात माळीवाडा परिसरात ग्रामदैवत विशाल गणपतीचे मंदिर आहे. येथील विशाल गणपतीची ऊंची ११ फुट आहे . विशाल गणपतीची मूर्ती ही फारच सुंदर व मोहक आहे. हे नगर शहराचे प्रमुख आराध्य दैवत आहे. तसेच ही मंदिर खूप सुंदर आहे.

शिर्डी येथील साई बाबांचे मंदिर , ही मंदिर नगर शहरापासून ८५ किमी अंतरावर आहे . ही मंदिर जगप्रसिद्ध असून , नेहमी येथे भक्तांची वर्दळ असते . येथे भाविक विविध राज्ये , देशातून दर्शना साठी येतात.

2.1 संत ज्ञानेश्वर व पैस खांब

भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो खांब आजही याठिकाणी आपले स्थान टिकवून आहे. एका साध्याशा दगडी खांबाला या अलौकिक संताचा स्पर्श झाला आणि त्याला आजच्या जगात देवत्व प्राप्त झालेले आहे. या खांबाला पैस खांब असेही संबोधले जाते. हे स्थळ नगर पासून ७५ किमी दूर आहे .

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा हे गाव प्रवरा नदिच्या तिरावर वसलेले आहे. माऊली याठिकाणाचे वर्णन करताना म्हणतात, “त्रिभूवनैक पवित्र, अनादी पंचक्रोळ क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे”.

2.2 श्री क्षेत्र शनि शिंगणापुर

भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. नगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते.

2.3 श्री क्षेत्र देवगड

अहमदनगर – औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प. प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

2.4 चांदबीबी महाल

शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (१५६५-८८) कारकीर्दीत सलाबतखान महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला.
सलाबतखान दुसरा इ.स. १५८० मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे ७० फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे २० फूट रूंद आहे.या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे.

2.5 दमडी मशीद

भुईकोट किल्ल्याजवळ स्थित, इ. स. १५६७ मध्ये  साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोप लोकांची  आणि इतर लोकांची कबरे  आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.

2.6 भुईकोट किल्ला

या किल्ल्याला ५०० वर्षांचा इतिहास असून  निजामशाहीचा संस्थापक अहमद  बादशाहाने शहर  वसविण्यापूवी इ.स. १४९०  मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ १ मैल ८० यार्ड इतका असून किल्ल्यास २२ बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात इ.स. १८३२ मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला, अजूनही त्याचे अवशेष बाकी आहेत.

2.7 कोटला १२ इमाम

अहमदनगर मधील कोटला १२ इमाम या मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स १५३६ मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.

स्त्रोत व संदर्भ :

१) नगर डिस्ट्रिक्ट सरकारी वेबसाईट भारत सरकारद्वारा संचालित वेबसाइट

२) https://wikipedia.com विकिपेडिया मुक्त माहिती स्त्रोत वेबसाइट

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo