समृध्दी महामार्गा विषयी माहिती

समृध्दी महामार्ग : माहिती

समृध्दी हा भारतातील पहिला तसेच जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. महाराष्ट्रात समृध्दी आणणारा असा हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार आहे. कधी नामांतर किवा शेतकऱ्यांच्या जमिनीवरून चर्चेला राहणारा मार्ग म्हणजे समृध्दी मार्ग.
समृध्दी महामार्गाची माहिती –
१) महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उप राजधानी नागपूर या दोन्ही शहराना जोडणारा हा मार्ग आहे.
२) भारताचा सगळ्यात मोठा जवळपास ७१० किलोमीटर अंतराचा हा हायवे म्हणजे समृध्दी मार्ग आहे.
३) राज्यात मुंबई ते नागपूरचा ७१० किलोमीटर लांबीचा सोबतच ६ लें असलेला समृध्दी मार्ग आहे.
४) १०जिल्हे २७ तालुके आणि ३९२ गावातून हा महामार्ग जाणारा आहे.
५) १४ वर्षापूर्वी हा महामार्ग ४०,००० कोटीचा प्रकल्प होता आणि आता ह्या प्रकल्पाची किंमत ६०,००० कोटीपर्यंत गेली आहे.
समृध्दी महामार्गाचे नाव काय व कसे ठेवण्यात आले ?
२०१५ साली फडवणीस सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली. त्यानंतर २०१७ मध्ये ह्याचा आराखडा तयार करून झाला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला आपल्या जमिनी देण्याला विरोध केला होता. पण त्यानंतर जमिनीच्या बदल्यात पाच पट मोबदला देण्याचा निर्णय फडवणीस सरकारनी घेतला मग शेतकऱ्यांनी विरोध नाही केला.

फडवणीस सरकार सत्तेत असताना या मार्गाला “अटल बिहारी वाजपेयी महामार्ग “नाव देण्याचा विचार होता, पण २०१९ साली ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महामार्गाचे नाव “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी ” महामार्ग असे देण्यात आले.


त्यानंतर भूमी ग्रहणाचे काम सुरू झाले होते.आतापर्यंत ८,८६१हेक्टर जमीन संपादित केली असून त्याबदल्यात ७,४२४कोटीचा मोबदला देण्यात आला आहे. या महामार्गा बाबत १९९५ पासून चर्चा होती. फडवणीस ह्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात म्हणजे ७ सप्टेंबर २०१६ या दिवशी महामार्गाचे सूचना काढण्यात आली.भारतातील नागपूर ते मुंबई मार्गातील हा मार्ग पहिला आणि जगातील तिसरा सगळ्यात मोठा महामार्ग आहे.

समृध्दी महामार्ग कोणत्या जिल्ह्यांना जोडतो ?

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, छत्रपति संभाजी नगर, अहमदनगर, नाशिक, ठाणे अशा १० जिल्हाना जोडणारा हा प्रकल्प आहे.
मार्च २०२२ ला अर्थसंकल्पात या महामार्गाची नागपूर – भंडारा – गोदीया – गडचिरोली पर्यात विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली.
हा प्रकल्प ७२% पूर्ण झाला आहे ७१०किलोमीटर मधून ५०१ किलोमीटर मार्गाचे उद्धघाटन झाले आहे.जो नागपूर पासून शिर्डी पर्यंत आहे.

समृद्धी महामार्गाचे फायदे काय आहे –

नागपूर ते शिर्डी हा ५०३ कि.मी. पट्टा पूर्ण झाला आहे. हा रस्ता तुमच्या आमच्यासाठी सुरू केला आहे. या रस्त्यावरून प्रती तास १५० कि.मी. प्रवास करता येऊ शकतो. असे एमएसआरसीडी चे म्हणणे आहे. हा रस्ता चालू झाल्यावर हा वेळ ५ तासांवर येतो. तर नागपूर हून मुंबईला जायला १४-१५ तास लागतात. तर हा वेळ ७ तास लागणार आहे.

समृध्दी महामार्गावर किती टोलनाके आहेत ?
७०० कि.मी. रस्तावर किती वेळा गाडी थांबवावी लागणार आहे अशी भीती लोकांना असते. पण या रस्त्यावर मुंबई ते पुणे जसे दोन टोलनाके आहे.तसेच दोनच टोलनाके असणार आहे.एक टोलनाका मुंबईला असणार व दुसरा नागपूरला मधल्या ठिकाणी आहे. जर तुम्हाला मुंबई हून निघायचं आणि नागपूरला उतरायचं तर मध्ये एकही टोलनाका नाही.

या महामार्गात कोणती टेक्नॉलॉजी वापरली आहे –
या महामार्गासाठी जर्मन टेक्नॉलॉजी वापरली वापरण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गाच्या वेळी ही टेक्नॉलॉजी नव्हती.
पण या महामार्ग त पूर्ण स्लाप मध्ये पूर्ण computerize मटेरियल प्रपोषणल वापरण्यात आली आहे.

या महामार्गा साठीचा किती पट्टा वन्य भागातून जातो?
या महामार्गाचा ११८ कि.मी. चा पट्टा वन्य भागातून जातो.अनेक प्राणी वाहनांना आडवे येऊन जखमी होतात. वन्य भागातल्या प्राण्याचा मुतृ होऊ नये.काही उपाययोजना सगितल्या होत्या. जगातील प्राण्याचे अपघात टाळण्यासाठी आणि प्राणी यांना मुक्त पणे वावरता येण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे.
भुयारी मार्गात ध्वनीविरोधक यंत्रणा सुद्धा बसवण्यात येणार आहे.त्याने करून वाहनांना आवाज हे प्रण्यापर्यात पोहाचनार नाही आणि हे अपघात होणार नाहीत.
या मार्गालगत समृध्दी कृषी केंद्र उभारण्यात येणार आहे.
या महामार्गातील सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्याचे जीवन समृद्ध झाले पाहिजे.
हा रस्ता नागपूर ते मुंबई प्रवास करण्या साठी चालू होतोय यासाठी आपल्याला जास्त वाट पहावी लागणार नाही.

मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

एक्सप्रेसवेचे नावसमृद्धी महामार्ग
मुंबई ते नागपूर द्रुतगती मार्गाची लांबी701 किमी
प्रकल्पाची अंदाजित किंमत55,000 कोटी रुपये
गल्ल्या/ Laneसहा, आठ पर्यंत विस्तारण्यायोग्य
समाविष्ट जिल्हे (10)नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे
प्रवासाची वेळनागपूर ते मुंबई 8 तास. प्रवासाचा कालावधी 8 तासांनी कमी करण्यात आला आहे
मालकमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)

References

  1. Wikipedia Mumbai Nagpur Expressway
  2. इमेजेस टाइम्स ऑफ इंडिया ची वेबसाईट

आमचे इतर लेख

Author: maymarathi