दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा संपत्तीचा सण आहे. यावर्षी १०नोव्हेंबर 2023 ला धनतेरस आहे.
वार शुक्रवार
धन आणि संपत्ती साठी या दिवशी कुबेर देव ची पूजा केली जाते. आणि नवे भांडे विकत घेण्याची परंपरा आहे या दिवशी खरीद दारी केल्यामुळे धनसंपत्ती मध्ये वाढ होते.

कार्तिक कृष्ण त्रयोदशी ला धनतेरस उत्सव साजरा केला जातो .असे म्हणतात की या दिवशी समुद्रमंथन ते अमृत कलश निघाला आणि देवतांच्या वैद्य धनवतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले .यामुळे आरोग्यासाठी या दिवशी धनवतरीची उपासना केली जाते.

धनतेरस या दिवशी कोणत्या वस्तू घ्याव्यात.
धनतेरस या दिवशी तुम्ही धातूपासून बनलेल्या पाणी साठवण्याची वस्तू घेऊ शकतात.
या दिवशी गणेश आणि लक्ष्मीच्या वेगवेगळ्या मूर्ती तुम्ही विकत घेऊ शकतात.
मातीचे दिवे विकत घेऊ शकतात या दिवशी सोन्या-चांदीचे आभूषण खरेदी करू शकतात. सोने चांदी खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते.

आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन यांच्या बद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.
व्यापारी आणि शेतकरी यांना हा दिवस खूप महत्त्वाचा असतो .
या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोड पदार्थ बनवले जातात. कुटुंबातील मंडळी एकत्र येतात आणि आनंदाची दिवाळी साजरी करतात.
शेतकरी हा आपल्या शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो . त्यासाठी धने गुळ खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडूची फुले देखील देवीला वाहिली जातात.

धनत्रयोदशी मागे एक कथा आहे
हेमा नावाचा एक राजा असतो. त्याच्या पुत्राला अकाळी मृत्यूचा शाप मिळालेला असतो. या शापा नुसार राजाचा मुलगा वयाच्या सोहळ्या वर्षीमृत्यूमुखी पडणार असतो .राजा व राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या शापाने दुःखी असतात. मात्र आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे घ्यावी. म्हणून त्याचे ते लग्न लावून देतात. लग्नानंतर च्या चौथा दिवशी त्याच्या मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याला सतत जागी राहण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या अवतीभवती सोन्याची चांदीची मोहरा ठेवलेल्या असतात. महालाचे मुख्य द्वार हे सोन्या-चांदीने मडलेले असते. जेणेकरून मृत्यूच्या वेळी यम हे महालामध्ये प्रवेश करू शकणार नाही .संपूर्ण महाल हा दिवे लावून लखलखित केला जातो .इकडे त्याची पत्नी त्याला वेगवेगळ्या गोष्टी व गाणी म्हणून त्याला जागी राहण्याचा प्रयत्न करत असते.