अश्विन कृष्ण द्वादशी ला वसुबारस साजरी केली जाते. या वर्षी गुरुवार 9नोव्हेंबर या दिवशी हा सण साजरा केला जाणार आहे. वसु म्हणजे द्रव्य अर्थात त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
वसुबारस ही पूजा गोमाता ची पूजा असते .महाराष्ट्रामध्ये गाईला खूप महत्त्व आहे .या दिवशी दिवाळीला सुरुवात झालेली असते. आपण घरात दिवा लावायला सुरुवात करतो .या दिवशी बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगा यांचा नैवेद्य दाखवला जातो .तुम्हाला या दिवशी गायीची पूजा करायची आहे.
वसुबारस पूजा कशी करायची?
तुम्ही गाईची पूजा करताना आधी गाईच्या पायावर पाणी टाकावे. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात.यानंतर गाईला हळद कुंकू लावावे. गाईला गुळ खाऊ घालावा. त्या गाईला प्रदक्षिणा घालाव्या ,आपण जर गाईला प्रदक्षिणा घातल्या तर ते ३३कोटीला देवाला प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिळते.
घरातल्या घरात गाईची सेवा कशी करायची आहे?
आपल्याला एक पाठ देवघरात ठेवायचा आहे .नंतर त्यावर लाल वस्त्र टाकावे .व गाईची मूर्ती ठेवावी ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी .त्यानंतर पाटासमोर दिवा लावावा व नंतर गणपतीचा अभिषेक करावा .व गणपतीची मूर्ती साफ करून पाटावर त्या मूर्तीची स्थापना करावी. गणपती बाप्पांना च्या मूर्तीवर हळदीकुंकू अर्पण करावे. फुल अर्पण करावे, त्यानंतर बाळकृष्णाची स्थापना करावी .बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण अभिषेक घालावा. नंतर गाईच्या मूर्तीवर हळदीकुंकू वाहून फुल वाहावे व नंतर गाईच्या मूर्तीला फुलाची माळ घालावी.
पुष्कळ स्त्रियांना या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला बाळांला चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे ,म्हणून पूजा करतात.
वसुबारस साजरा करण्यामागे काय कारण आहे
दिवाळीच्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते .ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते .यामुळे 33 कोटी देव जीच्यात सामावले आहेत .अशी ही गोमाता तिचे पूजन केले जाते. जिच्यामध्ये देवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे.