अक्षय तृतीया 2022
अक्षय तृतीया हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हनुन ज्या दिवसाचं महत्व विशद केले जाते असा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया.
कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातला अनेक भागात निरनिराळ्या नावाने ओळखला जातो.
वैशाख शु. तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच नाश न पावणारा असा होतो.या तिथीला नारायण परशुराम आणि हायग्रिव यांचा जन्म झाला आहे.म्हणून या दिवशी त्याचा अक्षय तृतीया साजरी करतात.
अक्षय तृतीया 2022 याचा मुहूर्त
या वर्षी अक्षय तृतीया 2022 मध्ये ३मे ला आहे. अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ मानला जातो.
याच दिनी , भगवान विष्णूंनी परशुराम च्या रूपाने या सृष्टीत जन्म घेतला होता. अन्न की देवी अन्नपूर्णा का जन्म पण याच दिवशी झाला आहे.या दिवशी पूजा,पाठ, व्रत करणे खूप चागले मानले जाते.

अक्षय तृतीया शुभेच्छा मायमराठी
.co.inअसे म्हणतात की महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय्य पत्र दिले होते. हे पत्र कधीही रिकामे नसते आणि नेहमी अन्नाने भरलेले असते.
अक्षय तृतीया 2022 हे व्रत कसे करावे ?
या दिवशी पूजा करणाऱ्यांनी प्रातःकाळी स्नान करून नर नारायणा साठी भाजलेले जवस किंवा गव्हाचे पिठ . परशुराम साठी कोवळी वाळकी आणि हायग्रिवा साठी भिजलेली हरबऱ्याची डाळ घालून नैवेद्य अर्पण करावे . शक्य असल्यास उपवास , गंगास्नान करावे .
त्याच प्रमाणे पितृ श्राद्ध करून ब्राम्हण भोजन घालावे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे ?
हा एक धार्मिक उत्सव आहे.
या दिवशी तुम्ही सोने जवाहिर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सत्त वाढ होत जाते.
नवीन संकल्प केले जातात, तसेच नवीन व्यवसाय सुरू केले जातात.
कोणतेही शुभ कार्य या दिवशी सुरू केल्यास ते कायम स्वरुपी अक्षय राहते.
कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये. कारण ते ही अक्षय टिकून राहते.
अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, यासह कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो.
शुभ मुहूर्त कधी आहे?
अक्षय्य तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. या दिवशी रोहिणी नक्षत्र राहील. रोहिणी नक्षत्र ४ मे रोजी सकाळी १२:३४ ते ०३:१८ पर्यंत राहील.