Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

आज आपण या लेखात पाहणार आहोत की वृंदावन आणि मथुरा चे रहस्य . जे तुम्ही कधी ऐकले नसेल.

१)वृंदावन चे वन

वृंदा चा अर्थ तुलसी आहे ,आणि वन म्हणजे जंगल यालाच वृंदावन असे म्हणतात.

असे म्हणतात की सहा हजार वर्षांपूर्वी तुळसी चे वन म्हणजे वृदावन हे दहा किलोमीटर शेत्रा मध्ये पसरले होते .

आता हे वन वृंदावन च्या निधी वनात दिसते.

२) वृंदावन मधिल भावा – बहिणीची आंघोळ

मधुरा मध्ये एक विश्राम घाट आहे. तो खूप पवित्र मानला जातो .जिथे देशाविदेशातून मधून लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात.

आणि याच कारणामुळे इथे भाऊबीजेच्या दिवशी खूप गर्दी असते.

विश्राम घाटाची मान्यता अशी आहे की भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहीण इथे येऊन स्नान केले तर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात .

३) पंचमुखी शिवलिंग –

मथुराच्या विश्राम घाटात पंचमुखी शिवलिंगाची स्थापना केली आहे.

जिथे या शिवलिंग वर एक नाहीतर पाच मुख स्थापित केले आहे.

४) यमुना माता -वृदावन चे १२ रहस्य

यमुना माता ही नदी मथुरा आणि वृंदावन पासून वाहती. यमुना नदीला माताच्या रूपात पुजतात .

यमुना माता ही भगवान श्रीकृष्णाची चौथीपट्टराणी होती . भगवान श्रीकृष्ण हे ब्रिजमध्ये परत आल्यावर त्यांचे यमुना जी सगे मिलन झाले.

त्यामुळे मथुरा मध्ये एका मंदिराची स्थापना केली त्याचं नाव आहे मिलन मंदिर.

५) वृंदावन मध्ये बन्सी चोर

आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण यांना लोणी चोरून खात होते .एक दिवस राधा राणीला श्रीकृष्णावर राग आला .

राधाला श्रीकृष्णाला अद्दल घडवायची असते .त्यामुळे राधा ने श्रीकृष्णाची बासुरी चोरली.

वृंदावनच्या निधी वनात “बन्सी चोर राधा रानी “असे मंदिर आहे.

त्या मंदिरात राधा ही श्रीकृष्णासारखी बासरी वाजताना दिसते. राधाने श्रीकृष्णाचे रूप घेतले होते.

६)दुर्भाशया ऋषी –

वृंदावन चे १२ रहस्य मधिल दुर्भाशया ऋषी हे एक आहे . यांना शंकराचा अवतार मानला जातो.

त्यांच्या रागीट स्वभावामुळे ते खूप प्रचलित आहेत.

दुर्भाशया ऋषी हे सत युग त्रता युग आणि द्रापार युग मध्ये प्रसिद्ध ऋषी आहेत.

दुर्भाशया ऋषी यांनी कोणत्याच देवावर कृपा नाही केली.

फक्त श्रीकृष्ण यांच्यावर त्यांनी कृपा केली होती.

दुर्भाशया ऋषी यांचे एक आश्रम आणि मंदिर हे मथुरा मध्ये स्थित आहे .जे विश्राम घाटामध्ये यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूस आहे.

७) रासलीला – वृंदावन चे १२ रहस्य

निधीवान ही अशी जागा आहे. तिथे तुळसी वन आहे. निधीवनाची अशी मान्यता आहे, की श्रीकृष्ण हे अजून पण प्रत्येक रात्री तेथे येतात.

राधा राणी आणि गोपिया संग रासलीला करतात. असे म्हणतात की निधीवांमध्ये जेवढे तुळशीचे झाड आहे ते दिवसा झाड असतात .

आणि ते रात्री गोपिया बनतात. दररोज रात्री निधीवांमध्ये पंडित हे तेथील महल सजवतात आणि तेथील महल हा वापरलेला असतो.

८)८४ कोस ची यात्रा

ब्रिजची ८४ कोस चे यात्रा मध्ये आपण सगळ्यांना माहित आहे. मथुरामध्ये प्रत्येक वर्षी एक ८४ कोस ची यात्रा आयोजित केली जाते. आणि या यात्रेची सुरुवात मथुराच्या विश्राम घाटापासून होते .

लोक विश्राम घाट मध्ये येऊन सगळ्यात आधी यमुना माताची पूजा करतात .

नंतर त्यांच्या यात्रेला सुरुवात करतात. ही यात्रा जवळ जवळ ८४ कोस लांब असते.

९) भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी

भगवान श्रीकृष्ण जन्मले तीथे आज मंदिर बनवले आहे .ते आधी कंस मामा यांचं कारावास होतं.

जिथे त्यांनी आपली बहीण देवकी आणि मेहुना वासुदेव यांना कैदी बनवले होते. आणि त्या कारावासात श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला होता.

त्यामुळेच श्रीकृष्ण यांची जन्मभूमी ही देश विदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.

१०) गोपेश्वर महादेव मंदिर

असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण दररोज रात्री येऊन निधीवनात रासलीला करत होते. जेव्हा एका दिवशी शंकराने निधी वनामध्ये गोपी यांचे रूप घेऊन गेले होते.

त्यांना श्रीकृष्ण यांचे दर्शन घ्यायचे होते. पण श्रीकृष्ण यांनी भगवान शंकराला गोपीच्या रूपात ओळखले. त्यांनी त्यांना गोपेश्वर महादेव नावाने हाक मारली .

तेव्हापासून शंकराचे नाव गोपेश्वर महादेव पडले .वृंदावन मध्ये आजही गोपेश्वर महादेवाचे मंदिर आहे.

१०) केसी घाट –

हिंदू पुराणानुसार केसी घाट ची कथा जास्त प्रसिद्ध आहे .केसी है एका राक्षसाचे नाव होते.

ज्याचं रूप हे घोड्यासारखं होतं .पण कसं राजा यांनी केसी राक्षसाला कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवले होते .

आणि या घाटापाशी श्रीकृष्ण यांनी राक्षसाचा वध केला होता. म्हणून या घाटाचे नाव केसे घाट पडले आहे.

१२) बाके बिहारी ची मूर्ती –

वृंदावन चे १२ रहस्य मध्ये हे एक सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. ते म्हणजे बाकी बिहारी मंदिर याची स्थापना तानसेन चे गुरु श्री हरिदास यांनी केली होती.

निधिवणात बाकी बिहारीची मूळ रूपाची पूजा केली जाते. बाकी बिहारी मंदिरात श्रीकृष्णाचे बाल रूपाचे दर्शन होते. जसे एखांदी लहान बाळ दुपारपर्यंत झोपते.

तसे बाकी बिहारी हे दुपारपर्यंत झोपतात. म्हणून या मंदिरात कोणतीच घंटी किंवा आवाज करणाऱ्या वस्तू नाही .

कारण कोणतेही बाळ आवाजाने घाबरते. म्हणून श्रीकृष्णाच्या आरतीच्या वेळेस पण घंटी नाही वाजत.
बाकी म्हणजे तिरका .
आणि बिहारी म्हणजे आनंद घेणारा.
ते तुम्हाला बाकी बिहारी ची मूर्तीत मान ,कंबर ,पायात तिरकेपणा दिसेल.
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर सांगा.

संदर्भ

  1. Youtube VIdeo

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo