Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

भगवान शंकराचे बरेच मंदिर आहे. पण त्यामधी भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग चे खास महत्त्व आहे. त्याचे कारण असे की भगवान शिव हे या बारा ज्योतिर्लिंगा मध्ये स्वतः विराजमान असतात. त्यामुळे त्या स्थानाला ज्योतिर्लिंग असे नाव दिले आहेत. पुराणानुसार असे म्हणतात की जे लोक हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेईल त्याचे सर्व पाप धूऊन जातात .
तर आपण माहिती पाहू की भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग.


भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग.

१) सोमनाथ ज्योतिर्लिंग – (गुजरात)

सोमनाथ ज्योतिर्लिंग ला भगवान शंकराचे पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. हे मंदिर गुजरात राज्यात सौराष्ट्र क्षेत्रामध्ये स्थित आहे. शिवपुराणानुसार चंद्रमाला दक्ष प्रजापतीने सहा रूप होण्याचा शाप दिला. तेव्हा चंद्रमाने या स्थानी तपश्चर्या करून या शापा पासून मुक्त झाले. विदेशी आक्रमण करणाऱ्या नी या मंदिराला सतरा वेळेस लुबाडले आहे. पण परत या मंदिराचे निर्माण झाले इथे दर्शन घेण्यासाठी वर्षभर गर्दी असते.

सोमनाथ ज्योतिर्लिंग

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग- (आंध्र प्रदेश)

हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशच्या कृष्णा नदीच्या काठावर शिर शेलश नावाचा पर्वतावर स्थित आहे. या मंदिराला भगवान शंकराचा कैलास पर्वता सारखे मानले जाते .अनेक शास्त्रात या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे इथे भाविक वर्षभर दर्शनासाठी गर्दी करतात.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग- ( मध्यप्रदेश)

हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मधल्या उज्जैन मध्ये स्थित आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की हे एक मात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे .येथे होणारे भस्म आणि आरती पूर्ण देशात प्रसिद्ध आहे .असे म्हणतात की इथे पूजा केल्याने आयुष्य वाढते, आणि सगळ्या प्रकारचे संकट दूर होतात .येथे महाशिवरात्री ला आम्ही श्रावण महिन्यात खूप गर्दी असते.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग- (मध्यप्रदेश)

हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मधल्या इंदोर जिल्ह्यात स्थित आहे. ज्या स्थानावर ही ज्योतिर्लिंग स्थित आहे त्या स्थाना वरून नर्मदा नदी वाढते. आणि चारी बाजूंनी नदी वाहती त्यामुळे ओम तयार होतो. हे मंदिर ओम आकाराचे बनते त्यामुळे या मंदिराला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात.

ॐ कालेश्वर ज्योतिर्लिंग

केदारनाथ ज्योतिर्लिंग- (उत्तराखंड)

भगवान शंकराचे हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडमध्ये स्थित आहे. हे मंदिर समुद्र पासून तीन हजार किलोमीटर उंच ठिकाणावर आहे. इथे दर्शन केल्याने कैलास पर्वताचे दर्शन केल्यास समान फळ मिळते. इथे हिवाळ्यात खूप बर्फ असतो त्यामुळे सहा महिने मंदिर बंद असतात .इथे दर्शनाला उन्हाळ्यामध्ये प्रवेश मिळतो.

केदारनाथ ज्योतिर्लिंग

भीमाशंकर ज्योतिर्लिंग- (महाराष्ट्र)

भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र मध्ये पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर स्थित आहे .भीमाशंकर ज्योतिर्लिंग ला मोटेश्वर महादेवाच्या नावाने पण ओळखले जाते .या मंदिरात जो भक्त श्रद्धा पूर्वक मनाने सूर्य उगवण्याच्या वेळी दर्शन करतो. त्याचे सर्व पापी नष्ट होतात.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग- (उत्तर प्रदेश)

काशीमध्ये विराजमान विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला सप्तम ज्योतिर्लिंग म्हणतात .हे मंदिर उत्तर प्रदेशात काशीमध्ये स्थित आहे. या मंदिराचे काही मान्यता आहे. आणि वर्षभर येथे भक्तांची गर्दी असते. आणि काशीचे धार्मिक स्थान सगळ्या स्थळापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

विश्वनाथ ज्योतिर्लिंग

त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग- (महाराष्ट्र)

हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या तटावर महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भगवान शंकराचे एक नाव त्रिंबकेश्वर पण आहे. असे म्हणतात की भगवान शिवजी ला गौतम ऋषी आणि गोदावरी नदीच्या आग्रहावरून इथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहावे लागले.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

बैद्यनाथ ज्योतिर्लिंग- (झारखंड)

बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे हे नऊ स्थानावर आहे. हे मंदिर झारखंड राज्याच्या सदाल परणशा दूमका जनपग मध्ये पडते .भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे हे मंदिर ज्या स्थानी आहे. त्याला वैद्यनाथ धाम म्हणतात.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे बर्‍याच वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात असून वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या अचूक स्थानाबद्दल लोकांमध्ये बरेच मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की वैजनाथ ज्योतिर्लिंग झारखंड प्रांताच्या संथाल परगनाच्या दुमका नामक जिल्ह्यात आहे आणि काही लोक असा विश्वास करतात की महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्ह्यात परळी नावाच्या ठिकाणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग

नागेश्वर ज्योतिर्लिंग-( गुजरात)

नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये बडोदा जिल्ह्यात गोमती द्वारका च्या जवळ स्थित आहे .या स्थानाला द्वारका वन पण म्हणतात. याशिवाय काही लोक दक्षिण हैदराबादच्या ओठा गाव मध्ये स्थित असलेल्या शिवलिंगाला नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात.

नागेश्वर ज्योतिर्लिंग

रामेश्वरम ज्योतिर्लिंग- (तामिळनाडू)

हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूच्या रामनाथ जिल्ह्यामध्ये स्थित आहे. इथे समुद्राच्या किनारी भगवान रामेश्वराचे विशाल मंदिर सौमित हे आहे .हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धाम पैकी एक आहे .हे ज्योतिर्लिंग मुन्नार खाडीच्या जवळ स्थित आहे .भगवान रामाचे पण येथे प्रसिद्ध मंदिर आहे.

रामेश्वरम ज्योतिर्लिंग

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग- (महाराष्ट्र)

हे भगवान शंकराचे बारावे ज्योतिर्लिंग आहे. हे स्थान महाराष्ट्राचे दौलताबाद पासून 18 किलोमीटर लांब बेरुलढ गावा पाशी आहे या स्थानाला शिवालय पण म्हणतात. महाराष्ट्रात असलेले हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
हे आहेत भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग. जिथे जाऊन भावीक श्रद्धेने दर्शन करून त्यांचे दुःख दूर करतात.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

संदर्भ

१. जानिए भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंग कौन से हैं और कहाँ पर स्थित हैं, 12 jyotirling in india

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo