Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

मित्रांनो आज आपण पोहे बनवण्याच्या ३ रेसिपी पाहणार अहोत . ही मराठी माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट आहे . पण आपण आज जर हटके अशा हटकेपोहे बनवायच्या पद्धती पाहणार आहोत. चला तर मग


1 कांदेपोहे

साहित्य

• दोन वाट्या जाड पोहे
• एक वाटी कांदा बारीक चिरून
• तीन-चार हिरव्या मिरच्या
• आठ-दहा कढीलिंबाची पान
• एक चमचा लिंबाचा रस
• चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
• मीठ , साखर , तीन मोठे चमचे तेल
• फोडणीसाठी मोहरी, हिंग , हळद.

पोहे

कृती

• फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पान , शेंगदाणे घालून परतून घ्यावे .

• त्यावर कांदा घालून परतावा . लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .

• पोहे , मीठ , साखर घालून परतून गार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे .

• सुरवात करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव .

• मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट कांदेपोहे होतात.


२. बटाटापोहे

साहित्य

• २ कप पोहे
• १ बटाटा
• २ कांदे
• ३ हिरव्या मिरच्या
• कोथिंबीर
• कढीपत्ता
• ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
• १ लिंबू
• १ चमचा साखर
• पाव चमचा हिंग
• अर्धा चमचा मोहरी
• २ मोठे चमचे तेल
• पाव चमचा हळद
• मीठ

कृती

• पोहे निवडून धूवून घ्या. असे करण्यासाठी एका गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा.

• दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका.

• नंतर बटाटा व कांदा टाका. झाकून पाच मिनिटे शिजू द्या.

• बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा.

• आता हळद आणि पोहे टाका. तीन-चार मिनिट हलवा उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा.

• बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटार वापरल्यास छान लागतात.

बटाटा पोहे झटपट
बटाटा पोहे

३ .भेळपोहे

साहित्य

• ५-६ वाट्या पातळपोहे
• आतपाव खारे दाणे
• ५० ग्रॅम शेव
• ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
• अर्धे लिंबू
• २ मध्यम कांदे
• थोडी कोथिंबीर
• खोबरे
• साखर
• मीठ

कृती

• तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.)

• नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.

• चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.

• कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन भेळेसारखे कालवावे.

• ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते.

• चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

झटपट भेळ पोहे
३ .भेळ-पोहे

संदर्भ

१. pngtree व canva विविध छायाचित्र निर्मिती साठी

२. Poha Bhel Chaat | Missing street food? Try this easy chatpata poha bhel chaat recipe at your home – YouTube

३. Marathi Recipes| मराठी रेसिपी – Apps on Google Play

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo