आपण प्रत्यक्ष कामाची सुरुवात करताना गणपतीची प्रार्थना करतो. तसेच लग्नाची पत्रिका असो किंवा देवाची आरती आपण गणपतीची आरती करतो. तर लग्नाच्या पत्रिकेत सगळ्यात आधी श्री गणपती यांनी आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचा फोटो लावतो. तर आज आपण या लेखात दुर्वा गणपती व्रत याबद्दल माहिती पाहणार आहोत.


दूर्वा गणपती व्रत कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आहे?

  • वार= रविवार
  • दिनांक= 20 ऑगस्ट 20२०२३

गुरुवार गणपती व्रत माहिती

भगवान गणपती बाप्पा यांना दुर्वा या अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्यांना दूर्वा अर्पण केल्या जातात. आपल्याला गणपती बाप्पाला रोज अर्पण दूर्वा करायला जमलं नाही. तर भगवान गणपती बाप्पाचे काही विशेष दिवस आहेत जसे संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, बुधवार तसेच आपण गणेशोत्सव गणेश चतुर्थीला बाप्पांना दूर्वा अर्पण केल्या पाहिजेत. तसेच हरतालिका व्रत हे व्रत पण खूप पवित्र आहे. या दिवशी पण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या पाहिजे. गणपती बाप्पा यांना आपण सुखकर्ता ,दुखहर्ता, विघ्नहर्ता मानतो व ते सर्वांचे दुःख हरण करतात.

दूर्वा चा अर्थ

  • दू म्हणजे दुरस्त
  • र्वा म्हणजे जवळ आणतो.
    दूर असनारा जवळ आनतो.
    गणपती बाप्पाला अर्पण केलेली दुर्वा कोमल पाहिजे. गणपती बाप्पांना दुर्वा ही विषम संख्या मध्ये होतो जसे ३,५,७, 11, 21 असे दुर्वा वाहतो.


दूर्वा गणपती व्रत कथा

पुराणानुसार या दुर्वा गणपती व त्यामागे एक कथा आहे,
प्राचीन अंधलासूर नावाचा एक राक्षस होता . ज्याने स्वर्गात आणि धरतीवर खूप तांडव घातला होता. हा असा राक्षस होता जो ऋषीमुनी आणि मानवाला जिवंत गिळून टाकत होता. या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून इंद्रा पासून ते सर्व देवी देवता भगवान महादेवाच्या जवळ गेले .आणि त्यांनी महादेवाला प्रार्थना केली की ते आंधलासुरू ला नष्ट करा. महादेवाने सर्व देवी देवतांची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की आंधलासुरूचा नाश श्री गणेश जी करू शकतात . नंतर सगळ्यांची प्रार्थना ऐकून श्री गणेशांनी अंधारासुर गिळून घेतले. त्यानंतर श्री गणेश जी यांच्या पोटात आग होऊ लागले. सगळी जडीबुटी खाऊन पण श्री गणपती बाप्पांच्या पोटाची आग शांत नाही झाली. त्यावर उपाय म्हणून कश्यप ऋषी नि दुर्वाचे 21 घाट बनून श्री गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिले. श्री गणपती बाप्पा नि त्या दूर्वा ग्रहण केल्या त्यानंतर त्यांच्या पोटाची आग शांत झाली.
असे म्हटले जाते की श्री गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा तेव्हापासून चालू झाली आहे. आपल्या सर्व दुखांचा नाश करण्यासाठी दूर्वा गणपती व्रत या दिवशी भगवान गणपती यांची पूजा केली पाहिजे. त्यांना दुर्वा अर्पण केल्या पाहिजे हे शुभ मानले जाते.

गणपती व्रत माहिती

या दिवशी श्री गणपती बाप्पांना हा मंत्र म्हणून गुरुवार पण केल्या पाहिजे.


||श्री गणेशाय नमः दुर्वा कुराण समर्पयामी ||

तसेच गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांचे सर्व दुःख चे हरण करतात. जे कोणी भगवान गणपतीचे पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
त्यांचे जीवन सुखी होते आणि सुख-समृद्धी मिळते.

संदर्भ

१. दूर्वा गणपती व्रत कथा:बस एक मंत्र से होगा जीवन मी चमत्कार

आमचे इतर लेख