या वर्षी रक्षाबंधन वर भद्राची सावली आहे,तर जाणून घेऊया की रक्षाबंधन कोणत्या वेळी व कोणत्या दिवशी साजरा करणं जास्त शुभ आहे.
रक्षाबंधन हा सण वर्षाच्या श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण आहे.त्या दिवसाला ” नारळी पौर्णिमा” पण म्हणतात.पण या वर्षी श्रावण पौर्णिमा च बरोबर भद्रा काळ चा आरभ झाला आहे,जो पूर्ण दिवस राहणार आहे.अशात रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरा करावा हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल,तर मग आपण पाहू की कोणत्या दिवशी रक्षाबंधन साजरा करणं शुभ मानले जाते.
तारीख व मुहूर्त – रक्षाबंधन हा श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. पण रक्षाबंधन चा हा नियम आहे की तो भद्राच्या काळात केला पाहिजे.पण भद्राच्या काळात राखी बांधने अशुभ मानले जाते.त्यामुळं शास्त्रात असे म्हटले जाते की “भद्रा परिहर” म्हणजे त्याग करूनच हा साजरा केला पाहिजे.
या वर्षी पौर्णिमा तिथी दोन दिवस आहे.त्यामुळे रक्षाबंधन सण कोणत्या दिवशी साजरा करावा हे जाणून घ्या.काही ब्राम्हण ११तारीख ला रक्षाबंधन सण साजरा करा.तर काही ब्राम्हण १२ तारखेला साजरा करा.
Table of contents
मुहूर्त व तारीख
तारीख : ११ ऑगस्ट २०२२
वार : गुरुवार आहे.शुभ मुहूर्त सकाळी ९वाजून २८ मिनिट ते रात्री ९ वाजून १४ मिनिटापर्यत राहील .
तर १२ ऑगस्ट २०२२ ला वार शुक्रवार आहे . सकाळी ७ वाजून ६ मिनिट पर्यंत पौर्णिमा तिथी आहे.त्यामुळे ह्या तिथीचा मान राहील.
हिंदू धर्मात असा नियम आहे की ज्या दिवशी सूर्योदय होतो त्या दिवशी त्या तिथीचा मान असतो.त्या मुळे ती तिथी मानली जाते.आणि सूर्य मावळला की पौर्णिमेची वेळ पण समाप्त होईल आणि भद्राची सावली पण राहणार नाही.त्यामुळे १२ ऑगस्ट लाच रक्षाबंधन हा सण साजरा केला तर शुभ राहील.
रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो?
रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे, हा सण साजरा केला जातो यामागे फार गोष्टी आहे. त्याप्रमाणेच पुराणानुसार या दिवशी इंद्राने दैत्याला हरविल होत.त्याचप्रमाणे राजा बली आणि माता लक्ष्मी यांची कथा पण रक्षाबंधन साजरा करण्या मागचे कारण आहे.भारतात हा त्योहार हजारो वर्षांपासून साजरा केला जातो.महाभारतात द्रौपदीने पण भगवान श्री कृष्ण ला राखी बांधली होती.
रक्षाबंधनाच्या दिवशी ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.
त्यानुसार मुलगी आपल्या वडिलांच्या हातावर राखी बांधते.राखी बांधन्याच्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देते. व कायम त्यांची रक्षण करण्यास वचन देते.

राखी बाधण्याची पद्धत
राखी बांधवाच्या वेळी भावाला पूर्व दिशकडे आणि बहिणीला
पश्चिम दीशेकडे तोड केले पाहिजे.
असे केल्याने आपल्या राखीला देवाचा आशीर्वाद मिळतो.
राखी बांधव्हायचा वेळी भावाच्या धोक्यावर अक्षदा टाकाव्यात .
त्यानंतर दिव्याने त्यांनी आरती करावी.
बहिणीने भावाच्या डाव्या हाताला राखी बांधावी.
साखर किवा पेढा यांनी तोड गोड करावे.
भाऊंनी काहीही भेटवस्तू देऊन बहिणी सुखी जीवनाची प्राथना करावी.
रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमेच काय महत्त्व आहे –
नारळी पौर्णिमा हा सण समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांचा म्हणजे कोळी बांधवांचा आहे.
श्रावण पौर्णिमेलाच कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
समुद्र हे वरून देवाचे स्थान आहे.
त्याला या नारळी पौर्णिमेच्या
दिवशी नारळ अर्पण करून त्यांच्या विषयी कृतञता व्यक्त केली जाते.
कोळी बांधवांचे संपूर्ण जीवन सगराशी एकरूप झालेले असते.त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राघावी या करिता त्यांची प्राथना करून त्यांचे उतराई होण्याच्या हेतूने नारळी पौर्णिमेचा हा सण मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरा करताना दिसतात.
संदर्भ :
१ ) विकिपेडिया मुक्त ज्ञान कोश .