Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

मुले जर आपल ऐकत नसतील. चिडचिडेपणा करत असतील. तर आपल्याला त्यांना वळण लावायचे असेल ,तर मुलांना मारून काहीच होत नाही. तर आज आपण या लेखात मुलांना कसे घडवावे ही माहिती पाहणार आहोत.
प्रत्येक घरामध्ये लहान मुले असतात. आणि ते सर्वांचे लाडाचे असतात .पण त्यांना वळण लावणे हे पण तेवढेच महत्त्वाचे आहेत.
मुलांना कसे घडवावे याबाबतीत काही नियम आहेत.

1 मुलांना समजून घ्यावे.

पालकांनी मुलांना कसे घडवावे तर त्यांनी मुलांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही पालक खूप रागीट असतात. त्यांचे मोठ्याने बोलणे त्या आवाजामुळे भांडण होतात. लहान गोष्टीवरून पण आई-वडिलांचे भांडण होते .त्याचा राग ते आपल्या मुलांवर काढतात .त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या पालकांविषयी चुकीचे मत निर्माण होऊ शकते .अशा ओरडण्याने, भांडनाणे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशी सवय असणाऱ्या पालकांनी ही सवय लवकरात लवकर सोडून द्यावी .आणि आपल्या मुलांची खूप प्रेमाने वागावे.

2 मुलांशी बोलून प्रश्न सोडवा.

मुलांची बोलण्याने अनेक प्रश्न आणि समस्या मिळू शकतात. मुलांनी चूक केली की पालकांना राग येतो .आणि ते मारून त्यांना समजवायला जातात पण ही पद्धत चुकीची आहे .पालकांनी मुलांशी प्रेमाने बोलावे .जे करून मुलं हे आपल्या समस्या पालकांना सांगायला घाबरणार नाही .कधीकधी पालक हे मुलांशी जसे वागतात .तसे ते मुलं इतर मुलांची वागतात .मुलं हे अनुकरण लगेच करत असतात. पालकांनी ह्या गोष्टी टाळाव्यात मुलांशी चर्चा करण्यावर भर द्यावा. मुलांची बोला त्यामुळे त्यांच्या समस्या तुम्हाला कलेळ.

3 टाईम आउट रुल.

अमेरिकन अकॅडमी ऑफ द पिरॅटिक्स यांनी एका संशोधनांमध्ये हा खास रूल पुढे आणला आहे. यामध्ये पालकांनी मुलांना ताकीद द्यावी. जर मुलांनी पहिल्यांदा चूक केली तर त्यांना समजावून घ्यावे. दुसऱ्यांदा चूक केली तरी समजून घ्यावे .पण त्याने तिसऱ्यांदा चूक केली तर त्यांना थोडीशी का होईना शिक्षा करावी. पण मुलं हे तिसऱ्यांदा चूक करणारच नाही त्यासाठी त्यांना सक्त ताकीद द्यावी .हाच आहे टाईम आउट रुल हा रूल बऱ्याच मुलांना प्रभावी असल्याचे लक्षात आले आहे.

4 मुलांना प्रोत्साहन द्या.

प्रत्येक पालकांना असे वाटते की आपल्या मुलांना शिस्त लावणे म्हणजे मुलांना वळण लावणे होय. पण नाही ही पण चुकीची गोष्ट आहे .पालक मुलांनी चूक केली की ओरडतात .ती मुलं केलेली चूक सुधारतात किंवा चांगले वागतात .तेव्हा पालक त्यांची स्तुती करत नाही. त्यांना प्रोत्साहन देत नाहीत ही चुकीची गोष्ट आहे. मुलांना पण वाटतं की आपण जी चूक सुधारली आहे त्याबद्दल पालकांना आपल्याला शाब्बासकी द्यावे. मुलांना जेव्हा चांगल्या गोष्टी करण्यात प्रोत्साहन देतात. तेव्हा मुलांना त्या गोष्टी करण्यात अधिक उत्साह येतो.

5मुलांना खोट्या धमक्या देऊ नका.

पालकांना आपल्या मुलांना कसे घडवावे असा प्रश्न पडला असेल तर पालकांनी ह्या चुका करू नका .

अनेक पालक आपल्या मुलांना खोट्या धमक्या देत असतात .जर तू असं केलं नाही की तुला मोबाईल देणार नाही, खेळायला पाठवणार नाही .आणि ह्या धमक्या पोकळ असल्याने पालक त्यांना सिरीयसली घेत नाही. आणि मुलं पण घेत नाहीत आणि मुलांना या गोष्टीची सवय होऊन जाते .मुलांना असे वाटते की आपले पालक फक्त ओरडतात बाकी काहीही करत नाही .पालकांनी ह्या सवयी सोडून दिल्या पाहिजेत आणि त्याऐवजी सामंजसपणे मुलांना समजवायला पाहिजे. बऱ्याच वेळा प्रेमाने समजवल्याने मुले त्या गोष्टी लवकर समजतात.

तर तुम्हाला आमचा मुलांना कसे घडवावे हा लेख कसा वाटला .

संदर्भ

.1 मुलांना वळण कसे लावावे?। मुलांना कसे घडवावे? #Sarika Pawase

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo