कष्टाची कमाई : गुरु नानक यांची गोष्ट

कष्टाची कमाई : गुरु नानक यांची गोष्ट

गुरु नानक जी आपल्या शिष्य मर्दाना सोबत भ्रमण करत होते. भ्रमण करता करता ते विविध गावांमधून जात व आपल्या शिकवण जन सामान्य माणसांपर्यंत पोहचवत असत. त्यामुळे त्यांचे विविध ठिकाणी मुक्काम होत असत. तर पाहूया ह्या प्रवासामधील एक घटना कष्टाची कमाई : गुरु नानक

कथा : कष्टाची कमाई

असेच ते जात असताना एका गावात त्यांनी लाला नावाच्या गरीब व्यक्ति च्या घरी मुक्काम केला. लालाचा स्वभाव खूपच चांगला होता , ते पाहता गुरु नानक यांनी तेथे मुक्काम वाढवला.

शेजारीच एका श्रीमंत शेठ चे घर होते. त्याने अनेकदा नानक यांना आमंत्रण पाठवले. पण ते काही शेठजी कडे गेले नाही. त्यामुळे शेठजी ला राग आला व त्यांनी लाला चे घर गाठले , व नानकजीना आपल्या घरी न येण्याचे कारण विचारले.

कष्टाची कमाई गुरु नानक जी

तेव्हा शेठजी म्हणाला , हा लाला तर शूद्र आहे, गरीब आहे. तरी देखील तुम्ही त्याच्याकडे राहतात, त्याचे जेवण देखील इतके उत्कृष्ठ नाही , त्याच्या उलटे माझ्याकडे शुद्ध तुपातले जेवण असून , ब्राम्हणा द्वारे गंगाजल द्वारे पवित्र करून बनवलेले भोजन आहे. तरी देखील तुम्ही आमंत्रणे स्वीकारली नाही.

त्यावर गुरु नानक म्हणाले , मला तुझ्या जेवणात स्वारस्य नाही , पण तुझे मन राखण्यासाठी मी येतो , सोबत लालाला आपली चपाती घेवून चलण्यास सांगितले.

त्यांनी एका हातात लालची चपाती घेतली , व दुसऱ्या हातात , शेठची शुद्ध तुपातील पुरी घेतली. त्यांनी दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या. लालच्या चपातीतून दूध तर शेठ च्या चपातीतून रक्त बाहेर आले.

मर्म

त्यावर नानक म्हणाले , ही पहा दोन्ही गोष्टी , ते पाहून शेठ व लाला दोन्ही आवक झाले . शेठ ची कमाई , जनतेच्या शोषणावर अवलंबून होती.

शेठ जरी लोकांचे रक्त काढत नव्हता , तरी जास्त दराने वस्तु विकून , साठा करून आर्थिक शोषण करीत होता , त्या कमाईने बनवलेल्या जेवणाला देखील शोषणाची चव होती. दुसरीकडे लाला हा गरीब माणूस होता , पण आपली कमाई तो कष्टाने कमावत असे.

कष्टाची कमाई गुरु नानक जी

आता पुरी मधून रक्त व चपाती मधून दूध , ही घटना अशीच खरोखर झाली असेलच असे नाही , पण मर्म पाहता , लक्षात येईल की आपण किती ठिकाणी खाताना ही गोष्ट लक्षात ठेवतो , बऱ्याच वेळा आपले लक्ष हे चवीवरच असते .

आपण अनेक ठिकाणी हॉटेल, समारंभात जेवण करतो. ह्या कहाणी च्या शेवटी शेठ जी ला पण आपली चूक कळली , कारण त्याला पण आठवले की आपण कश्या प्रकारे , जनतेची लूट करत होतो.

आणि त्याला उत्तर देखील मिळाले की का नानक जी त्याच्या कडे जेवणास येत नव्हते.

नानक यांनी जेवणाच्या चवी व गुणवत्ता पेक्षा , त्या मागच्या भावनेला झुकते माप दिले होते. लाला च्या सेवेत कोणताही अहंकार नव्हता, ती नम्रते ने भरली होती. तर शेठजी आपल्या श्रीमंतीच्या बळावर नानकजी यांना बोलवत होता.

संदर्भ :

  1. सदगुरु नानक पुस्तक लेखक सरश्री.

इतर लेख

Author: maymarathi