माता महागौरी म्हणजे देवी पार्वतीचे श्वेत स्वरूप आहे. देवी पार्वतीने कठोर तप साधना करून महादेवास प्राप्त केले , त्या नंतर महादेवा ने गंगा जल द्वारे निर्मल केले , त्यामुळे देवीचे शरीर कांतीमय होवून श्वेत वर्ण झाले.

स्वरूप

देवीचे महागौरी हे स्वरूप पूर्णतः गौरवर्णी आहे. ह्या गौर रंगाची उपमा शंख , चंद्र व कुंदनाच्या फुलांसोबत केली जाते. देवीचे सर्व वस्त्र , अलंकार हे श्वेत रंगाचे आहेत. देवीस चार भुजा असून , वृषभ हे त्यांचे वाहन आहे. देवीच्या उजव्या हाताने अभय मुद्रा धारण केली आहे. दुसऱ्या उजव्या हातात त्रिशूल धारण केले आहे. डाव्या हातात डमरू आहे, व दुसऱ्या डाव्या हाताने वर मुद्रा धारण केली आहे. देवीची मुद्रा अत्यंत प्रसन्न चित्त आहे.

माता महागौरी
Source

देवी महागौरी कथा

देवी महागौरीची कथा ही माता पार्वतीची कथा आहे , आपणास माहीत आहे की देवीने महादेवाच्या प्राप्ती साठी कठोर व्रत केले होते , ह्या कठोर व्रता मुळे देवीचे शरीर तपअग्नि मुळे काळे पडले. देवीच्या कठोर तपस्या पाहून महादेवाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. नंतर महादेवानी देवीची काया गंगा जल द्वारे धुतली , तेव्हा देवीचे विद्युत समान कांतीमय स्वरूप उदयास येते. त्यामुळे तिचे नाव गौरी असे पडले. महागौरी रूप मध्ये देवी करूणामयी, स्नेहमयी, शांत आणि मृदुल दिसते. देवीच्या ह्या रूपाची प्रार्थना करत असताना देव व ऋषिगण म्हणतात

“सर्वमंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तुते..”

एक अन्य कथाअनुसार दुर्गम दानवांच्या अत्याचारामुळे संतप्त देवता जेव्हा भगवती शाकंभरी च्या शरण मध्ये आले तेव्हा माता ने त्रिलोकीस मुग्ध करनारे महागौरी रूपाचा प्रादुर्भाव केला। ही माता महागौरी आसनस्त होवून शिवालिक पर्वताच्या शिखरावर विराजमान झाली आणि शाकंभरी देवीच्या नावाने ह्या पर्वतावर त्यांचे मंदिर आहे , हे टेच स्थान आहे जिथे देवी शाकंभरी ने महागौरी चे रूप धारण केले होते.

पूजन विधि

अष्टमी च्या दिवशी महिला आपल्या सुहाग (पती )साठी देवीला ओढणी अर्पण करतात , देवीच्या इतर स्वरूपांची जशी पूजा नवरात्रीत केली जाते त्या प्रकारे मनोभावे महागौरी देवीची पूजा केली जाते.

महत्व

माता महागौरी चे स्मरण , ध्यान , पूजा अर्चन भक्तांसाठी अतिशय कल्याणकारी आहे. माँ महागौरी भक्तांचे दुःख नक्कीच दूर करते. त्याची पूजा केल्याने आर्तजनांची अशक्यप्राय कामेही शक्य होतात. त्यामुळे त्याच्या चरणी आश्रय घेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. महागौरीच्या पूजेने सर्व नऊ देवी प्रसन्न होतात.

माता महागौरी पूजन

मातेच्या ह्या स्वरूपाचा महिमा पुराणात विपुल वर्णन केले आहे. मानवी वृत्तीला सत्याकडे प्रवृत्त करून ते असत्याचा नाश करतात. आपण नेहमी प्रभावातून त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. 

या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्था ।नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः ।

अर्थ : अरे आई! अंबे, जी सर्वत्र आणि माँ गौरी म्हणून प्रसिद्ध आहे, मी तुला वारंवार नमस्कार करतो. हे आई, मला सुख आणि समृद्धी दे.

देवी महागौरी मंत्र

ध्यान मंत्र :-

वन्दे वांछित कामार्थेचन्द्रार्घकृतशेखराम्।

सिंहारूढाचतुर्भुजामहागौरीयशस्वीनीम्॥

पुणेन्दुनिभांगौरी सोमवक्रस्थितांअष्टम दुर्गा त्रिनेत्रम।

वराभीतिकरांत्रिशूल ढमरूधरांमहागौरींभजेम्॥

पटाम्बरपरिधानामृदुहास्यानानालंकारभूषिताम्।

मंजीर, कार, केयूर, किंकिणिरत्न कुण्डल मण्डिताम्॥

प्रफुल्ल वदनांपल्लवाधरांकांत कपोलांचैवोक्यमोहनीम्।

कमनीयांलावण्यांमृणालांचंदन गन्ध लिप्ताम्॥

स्तोत्र मंत्र :-

सर्वसंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।

ज्ञानदाचतुर्वेदमयी,महागौरीप्रणमाम्यहम्॥

सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।

डमरूवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्॥

त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।

वरदाचैतन्यमयीमहागौरीप्रणमाम्यहम्॥

कवच मंत्र :-

ओंकार: पातुशीर्षोमां, हीं बीजंमां हृदयो।

क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो॥

ललाट कर्णो,हूं, बीजंपात महागौरीमां नेत्र घ्राणों।

कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो॥

संदर्भ

आमचे इतर लेख