Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

कार्तिक जाखड वयाच्या 12 वर्षी याने तुटलेल्या फोन मधून कोडिग शिकून आज तो हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकण्यासाठी पोहचला आहे,तर जाणून घेऊन की हा मुलगा कोण आहे?

तुटलेल्या फोन मधून शिकला कोडिंग , वी अवघे 12 वर्ष !

तर आपण आजच्या लेखात कार्तिक जाखड हा शेतकरी कुटंबात वाढलेला मुलगा आहे.आणि त्याने एका तुटलेल्या फोनमधून कोडींग शिकून तो परदेशात शिकायला गेला.

कार्तिक जाखड याने तीन लर्निग ऐप बनवले आहे.आणि तो आता अमेरिका येथे हावेर्ड युनिव्हर्सटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिएसी करत आहे.विशेष म्हणजे की कार्तिक याने तुटलेल्या फोनमधून you tube मधून कोडीग शिकला आणि लर्निग एप बनवला .कार्तिक नी तयार केलेल्या एपमुळे ४५,०००पेक्षा जास्त मुलांना मोफत शिक्षण देत आहे.म्हणतात ना की “सफलता सुविधा की बात नहीं है”.फक्त १२वर्षाचा हा मुलगा आज अमेरिका येथे शिक्षण घेत आहे.कार्तिक याने तुटलेल्या फोन मधून हा कारनामा केला आहे.त्यामुळे त्याच नाव “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रीकॉर्ड”मध्ये घेण्यात आले आहे
दिल्लीपासून १००की.मी.लांब हरियाणा मधील झज्जर जील्हाच्या झासवा गावचा तो राहणारा आहे.बारा वर्षाच्या कार्तिक जाखड याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रीकॉर्ड मध्ये दाखल झालं आहे.
कार्तिक याने तीन ऐप तयार केले आहे.आणि त्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचे कोचीग क्लासेस पण नाही घेतले.
मोबाईल फोन वर व्हिडिओ पाहून त्याने कोडीग शिकून हे ऐप तयार केले आहे.कार्तिक जाखड हा आठवीला शिकणारा मुलगा आहे.

हवर्ड यूनिवर्सिटी | कार्तिक जाखड

कार्तिक जाखड याचे वडील काय करतात ?

कार्तिक जाखड यांच्या वडिलाचे नाव अजित सिंह जाखड आहे.ते व्यवसायाने शेती करतात.

घरी शिकण्यासाठी टेबल खुर्ची पण नाही, आणि त्याच्या गावात २४ तास लाइट पण नसते.

तो ऑनलाइन क्लास शिकत असताना त्याने हे ऐप तयार केले, त्याला लहानपणापासून खूप शिकण्याची इच्छा होती.

तो तिसरीत असताना त्यांला काही इतर मुलं पेक्षा काही वेगळे करण्याची इच्छा होती.

कोरोणामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे त्याचे वडील यांनी त्याच्या ऑनलाइन क्लास साठी ८ते१० हजारांचा अँड्रॉइड फोन विकत घेतला.

कार्तिक याने आपल्या शिक्षणा बरोबरच आणखी काही नवीन शिकता येईल असे वाटले.

आणि त्याने you tube वर कोडिग आणि ऐप डेवलपमेंट बद्दल वाचले.you tube वर स्वतः शिकून त्याने स्वतःऐप तयार केले.

ऐप तयार करण्याच्या वेळी त्याने अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचा फोन हैग होत होता त्यामुळे त्याला परत कोडीग करावी लागत होती.

कार्तिक जाखड ने कोणते लर्निग ऐप तयार केले आहेत ?

१) पहिल्या ऐप चे नाव “ल्यूसेट जिके ऑनलाइन” हे आहे.
हे ऐप सामान्य द्यान याच्यवर आधारित आहे.
२) दुसऱ्या ऐपचे नाव “श्री राम कार्तिक लर्निग सेंटर” हे आहे. त्यामध्ये कोडिंग आणि ग्राफिक्स डिजायनिंग शिकवलं जातं.
३) तिसऱ्या ऐप चे नाव “श्री राम कार्तिक डिजिटल एजुकेशन “ हे आहे.हे डिजिटल एजुकेशन बरोबर आधारित आहे.
हे सर्व ऐप लर्निग ॲप्लिकेशन च साह्याने एका संस्था मधील मुलांना म्हणजे जवळ जवळ ४५,०००गरीब मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.

कार्तिक याने १२वर्षा च्या वयात बरेच अवॉर्ड भेटले आहेत.

त्यामध्ये चाईल्ड प्रोडिजी अवॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रिकोर्ड्स हे अवॉर्ड आहेत
हॉवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एट्रास परीक्षा पास झाला आणि त्याला स्कालरर्शिप मिळाली.
कार्तिक जाखड याचे असे म्हणणे आहे की जरी तो अमेरिकेत शिक्षण घेत असला तरी तो शिक्षण झाल्यावर भारतात येऊन आपल्या देशासाठी काहीतरी नवीन करायचं आहे त्याला कॉम्प्युटर शेत्रात असे काही करायचं आहे की जे अजून पर्यंत कोणी केले नाही.

कार्तिकला भेटली विविध पारितोषिके

संदर्भ :

  1. बेतूळ समाचार सांकेतिक स्थळ
  2. ipaperwala सांकेतिक स्थळ

इतर लेख :

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo