मोरींगा म्हणजे काय?
जे शेवगाच्या झाडाचे पान असतात ते आपण वाळवतो .आणि त्यांची पावडर तयार करतो त्याला आपण मोरिंगा पावडर म्हणतो. मोरिंगा पावडर च्या गोळ्या पण बाजारात मिळतात.
मोरीगा हे झाड खूप आरोग्यदायी मानले जाणारे झाड आहे. बऱ्याच वर्षापासून शेवग्याचे झाड हे औषधी वनस्पती म्हणून वापरले जाते.
शेवग्याच्या पानात कार्बोहायड्रेट, प्रोटीन ,कॅल्शियम ,पोटॅशियम, आयर्न ,मॅग्नेशियम ,विटामिन ए, सी आणि बी भरपूर प्रमाणात आढळून येते.
शेवग्याच्या पानात पिट्रीगोस्वेरमिन नावाचे कार्यकारी तत्त्व असते .ते जिवाणू प्रतिबंधक म्हणून काम करते.


मोरिंगा पावडर न्यूट्रिशन व्हॅल्यू
Amount | १tsp (५gms)of moringa |
Energy | ९kcal |
Carbohydrates | १ gms |
Protein | १ gms |
Fats | ०.१gms. |
मोरींगा एटीऑक्सिडेंट आणि एटी इफ्लेमेंटरी गुणांनी भरलेला असतो. शरीरात बॉडीग्लुकोजला नियंत्रित करण्यापासून तर जखमांना भरणे पर्यंत मोरींगा मदत करते.
मोरींगाहे झाड शरीरासाठी खूप फायदेमंद मानले जाते .
मोरींगा पावडर चे फायदे –
1)पाचन तंत्र साठी चांगले आहे
मोरिंगा लिव्हरला अल्कोहोल फॅटी लिव्हर या रोगापासून बचाव करतो.
जी लोक मोरींगा सेवन करता त्यांचे कोलेस्ट्रॉल कमी होते.
त्या लोकांच्या लीव्हरची सूज पण कमी होते.
२) डायबिटीस आजारात मोरिंगाचा काय फायदा आहे?
मोरींगा पावडर हे अर्कातून काही गुण डायबिटीस लेव्हल मध्ये सुधार करतात.
मोरिंगा ब्लड शुगर आणि इन्सुलिन च्या लेव्हल ला नियंत्रित करण्यास मदत करतात.
डायबिटीस मुळे शरीराला होणाऱ्या आतल्या अंगाला होणाऱ्या नुकसानापासून पण वाचवते.
३) डोळ्याला स्वस्थ बनवणे
मोरींगा मध्ये बीटा कॅरोटीन एंटीऑक्सीडेंट हे गुण आहेत.
जे डोळ्यांची निगा ठेवतो. आणि डोळ्यांच्या आजारावर मात करतात.
4) मोरिंगा पावडर एनिमियाच्या आजारावर उपचार करते.
मोरिगा मध्ये असणाऱ्या ए टीऑक्सिडेंट शरीरामध्ये एक्स्ट्रा आयरनला नियंत्रित करण्यात मदत करते.
आणि ते सिकल सेल रोगाला पण बरं करण्यामध्ये मदत करते.
5)अस्थमा वर उपचार करतात
मोरींगा सेवन केल्याने फुफुसाची कार्य करण्याची क्षमतेत विकास होतो.
त्याचबरोबर त्याचे अर्क वायू मार्गची सूज आणि अस्थमा च्या स्थितीमध्ये सुधारण्यास मदत होते.
6) मोरिंगा पावडर जखमांना ठीक करण्यासाठी फायदेमंद आहे
मोरिंगाच्या बीचे तेल तेल जखमेवर लावल्यावर जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
मोरिंगा हृदयाच्या आजारापासून वाचवण्यास मदत करतात.
शेवगा ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतातला आहे .