Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

इथेनॉल मिश्रित पेट्रोल लवकरच येणार आहे. ते आपल्या कार, मोटारसायकलच्या इंजन साठी किती फायद्याचं ठरू शकते किवा नुकसानदायक ठरू शकते.आतर रत्त्रिय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारत इंधनाच्या नव्या आईड्या च्या शोधत आहे. भारत सरकारने पण इथेनॉल या नावाने एक डेटा तयार केला आहे त्यात सागितले आहे की, देशाने तयार केलेल्या वेळेच्या आधी १०% इथेनॉल मिश्रनाच लक्ष्य साध्य केलं आहे. अशात आपल्याला माहीत पाहिजे की इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपल्या वाहना साठी किती फायद्याचं आहे की किती नुकसानच आहे.

काय आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल?

जेविक यौगिक इथइल अल्कोहोल ला इथेनॉल म्हनतात. याचा उपयोग दारू सारख्या पेल्या जाणाऱ्या पदार्थात होतो. इथनाच्या रुपात इथेनॉल चा उपयोग वाहनासाठी केला जातो . केंद्रीय पेट्रोलयममंत्री आणि प्राकृतिक गॅस मंत्री हर दीप सिंह पुरी यांनी सोमवारी असे सागितले की एप्रिल २०२३सलाच्या आधी देशाच्या पेट्रोल पंपावर २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळणार आहे.इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे वाहनावर कोणताच वाईट परिणाम झाला नाही, इथेनॉल मिश्रित पेट्रोल लवकरच येणार आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल का ?

भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवणे, इंधनावरील आयात अवलंबित्व कमी करणे, परकीय चलन वाचवणे, पर्यावरणीय समस्या सोडवणे आणि देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देणे या उद्देशाने भारत सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमाला चालना देत आहे. सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेल्या ‘जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरण’ मध्ये 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे सूचक उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता, 2014 पासून सरकारने केलेल्या विविध हस्तक्षेपांमुळे, 20% चे लक्ष्य 2030 ते 2025-26 पर्यंत % इथेनॉल मिश्रण प्रगत केले गेले.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे वाहनावर कोणताच वाईट परिणाम झाला नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे ४१, ०००करोड रू विदेशी मुद्राची बचत झाली आहे. वन आणि जलवायु परिवर्तन राज्य मंत्री आश्र्विनी कुमार चोबे बुधवारी म्हणले, आहे की इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे देशात ४१,०००करोड रू विदेशी मृदेची बचत झाली आहे.

या मुळे शेतकरी लोकांना पण खूप फायदा झाला आहे.

इंधनावरील आयात अवलंबित्व कमी करून भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवतो. तसेच मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कृषी क्षेत्राला देखील चालना देतो.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलच्या मिश्रणामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 40,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले गेले. या कालावधीत, EBP मुळे 41,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलन प्रभावित झाले. तसेच 27 लाख मेट्रिक टन हरितगृह वायू उत्सर्जन कमी झाले.

इथेनॉल वापराचे प्रत्यक्षात झालेले फायदे .

चोबे यांनी म्हणले आहे की पुढचे लक्ष्य असे आहे की २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल तयार करणे हे आहे. २०२५साली ते २०२६ साला पर्यंत पूर्णे करणार आहे. त्यांनी म्हणले आहे की देशात इथनाची आयात आणि कार्बन उस्तर्जन ला कमी करण्याचया दिशेने एक मोठे पाऊल आहे. त्यांनी म्हणले आहे की इलेक्ट्रॉनिक वाहनाला घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हे देशाच्या खूप फायदयाच आहे.

भारत ट्रान्सपोर्ट च्या वापरत होणाऱ्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपयोगामुळे मागच्या एका वर्षात ९,५८० करोड रू की किमती विदेशी मुद्रा वाचण्यात यश आले आहे. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी ससद मध्ये एका प्रश्नाचं लेखी उत्तरात असे म्हणले आहे की, १डिसेंबर २०२०ते१४नोव्हेंबर २०२१ या कालावधी मध्ये अनुमानीत विदेशी मुद्रची प्रभाव सरासरी ९,५८०करोड रू. होण्याचे अनुमान आहे.

इंजिनांवर परिणाम

पेट्रोलच्या 10% मिश्रणासाठी इंजिनमध्ये मोठे बदल आवश्यक नाहीत परंतु 20% मिश्रणासाठी काही बदल आवश्यक असू शकतात आणि वाहनांच्या किमती देखील वाढू शकतात. मिश्रणाच्या मोठ्या टक्केवारीचा अर्थ असा होऊ शकतो की ऊस सारख्या पाणी-केंद्रित पिकांसाठी अधिक जमीन वळवली जाईल, ज्याला सरकार सध्या अनुदान देते.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल
20 % USE OF ETHENOL IN UPCOMING DYS
इथेनॉल मिश्रित पेट्रोल
FLEX FUEL ENGINES FOR E20

NITI आयोगाने 2025 पर्यंत 10.16 अब्ज लीटर इथेनॉल मागणीचा प्रकल्प केला आहे, जो वाहनांच्या अवलंबनावर आधारित आहे. भारतातील सध्याची इथेनॉल उत्पादन क्षमता 4.26 अब्ज लिटर मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजमधून मिळते आणि 2.58 अब्ज लिटर धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून मिळते. हे अनुक्रमे 7.6 अब्ज लिटर आणि 7.4 अब्ज लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि 2025 पर्यंत दरवर्षी 6 दशलक्ष टन साखर आणि 16.5 दशलक्ष टन धान्य आवश्यक असेल.

जमिनीचे वाढलेले वाटप पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्याने उत्सर्जनात होणारी वास्तविक घट देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते.

आमचे इतर नवीन तंत्रज्ञान लेख इथे वाचा ..

संदर्भ

१ . भारत सरकारची पेट्रोलियम मंत्रालायची वेबसाईट

२ . विकिपेडिया मुक्त ज्ञानकोश

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo