राष्ट्रपति पदाच्या निवडणुकीसाठी NDA (रालोआ) ने आपला उमदवारी दिली आहे, याबाबत भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माहिती दिली. द्रौपदी मुर्मु या झरखंडच्या माजी राज्यपाल असून भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (२१ जून) भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकित राष्ट्र पती पदासाठी द्रौपदी मुर्मु यांच्या नावावर शिककामोर्तब करण्यात आलं.

कोण आहेत द्रौपदी मुर्मु?

१ )20 जून 1958 रोजी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात जन्मलेल्या मुर्मु संथाल वंशाच्या आहे. अहवालानुसार त्यांचे वडील, बिरांची नारायण तुडू आणि आजोबा हे पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावचे प्रमुख होते.

२ ) त्यांनी भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठातून १९७९ मध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून कार्य केले.

३) राजकारणात येण्यापूर्वी मुर्मू यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च, रायरंगपूर येथे मानद सहाय्यक शिक्षक आणि पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले.

४ ) त्याच वर्षी त्यांना भाजपच्या अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या उपाध्यक्षपदी घोषित करण्यात आले. ओडिशातील त्या भाजपा बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या.

५ ) झारखंड ची स्थापना २००० साली झाली. त्यानंतर २०१५ते२०२१साला दरम्यान मुर्मु ह्या राज्यपाल होत्या.

द्रौपदी मुर्मु NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार

द्रौपदी मुर्मु यांचा राजकीय प्रवास.

  • द्रौपदी मुर्म यांनी आपला राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९७ मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या एक नगरसेविका म्हणून केली.
  • द्रौपदी मुर्मु २०००आणि २००९ मध्ये साली भाजप पक्षाच्या तिकिटावर आमदार झाल्या.
  • मुर्मु यांच्याकडे 2000 ते 2004 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन या खात्यांचा स्वतंत्र कार्यभार होता. 2007 मध्ये, त्यांना ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
  • द्रौपदी मुर्मू हा झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. झारखंड ची स्थापना २००० साली झाली. त्यानंतर २०१५ते२०२१साला दरम्यान मुर्मु ह्या राज्यपाल होत्या.

मुर्मु यांचे वैयक्तिक आयुष्य .

  • द्रौपदी मुर्मु यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिका ने भरलेलं आहे.
  • त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, मुर्मूने पती श्याम चरण मुर्मु आणि दोन मुलगे गमावले , त्यामुळे त्यांनी अनेक शोकांतिका पाहिल्या आहेत.
  • 2009 ते 2015 या अवघ्या सहा वर्षांत मुर्मु यांनी पती, दोन मुले, आई आणि भाऊ गमावले. त्यांना तीन मुले होती – दोन मुले आणि एक मुलगी. एक मुलगा 2009 मध्ये मरण पावला आणि दुसऱ्या मुलाचा तीन वर्षांनंतर रस्ता अपघातात मृत्यू झाला. यापूर्वी पती श्याम चरण मुर्मु यांना हृदयविकाराच्या झटक्याने गमावले होते. त्यांची मुलगी इतिश्री ओडिशातील एका बँकेत काम करते.
  • मुर्मु या देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत आणि देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. एकदा निवडून आल्यावर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि देशाच्या इतिहासातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील.
  • 6 वर्षांहून अधिक काळ झारखंडच्या राज्यपालपदाचा त्यांचा कार्यकाळ केवळ वादग्रस्तच नाही तर संस्मरणीयही आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी झारखंड राजभवन सोडले 12 जुलै 2021 रोजी ओडिशातील रायरंगपूर येथील गावासाठी आणि तेव्हापासून त्या तिथेच राहत आहे.
आमच्या व्यक्ति विशेष भागाला भेट द्या व इतर व्यक्ति विशेष बद्दल माहिती वाचा ..

संदर्भ

  • जून महिन्यातील विविध मराठी भाषिक वृत्तपत्रे