आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात गणपती बाप्पा च्या पूजे ने करतो. त्यामुळे आपले प्रत्येक काम जे शक्य नसते, ते गणपती बाप्पा च्या प्रार्थने मुळे शक्य होते. ह्या वर्षी विनायक चतुर्थी 4 एप्रिलला येत आहे, शास्त्रा नुसार अमावस्ये नंतर येणाऱ्या शुक्लपक्ष चतुर्थीला  विनायक चतुर्थी म्हणतात. 

विनायक चतुर्थीला वरद विनायक  चतुर्थी असे सुद्दा म्हणतात. ह्या दिवशी गणपतीची पूजा दुपारी केली जाते. गणपती बाप्पा ला विघ्नहर्ता पण म्हणतात. विघनहर्ता म्हणजे आपल्या सगळ्या दुःख व अडचणी वर उपाय करणारी देवता. ह्या मुळे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थी चा उपवास भाविक ठेवतात. 

ह्या दिवशी गणपती बाप्पा ची पुजा करणे चांगले असते. ह्या दिवशी उपवास केल्याने आरोग्य , सुख संपदा घरात नांदते.

विनायक चतुर्थी व्रत पुजा विधी

सकाळी उठुन अभ्यंग स्नान करून , लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे, व गणपती बाप्पा चे स्मरण करावे. पूजेसाठी आपल्याकडे जी गणेशाची मूर्ती आहे ती पुर्वीकडे किंवा उत्तर दिशेकडे मुख करून गणपती बाप्पा ची स्थापना करावी. गणपती बाप्पा पुढे कलश मांडावा. फुले , हार, दुर्वा पंचामृत इत्यादी ठेवावे. गणपती बाप्पा ची मनोभावे पुजा करावी, नंतर आरती करावी.

गणपतो बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करावे.

त्यांनतर ओम नमो गणपताये नमः या मंत्राचा जप करावा. त्यांनतर देवाला नैवेद्य दाखवावा.

गणपती बाप्पा पुढे 21 मोदक ठेवावे , त्यातले 5 मोदक दान करावेत , 5 गणपती पुढे ठेवावे, बाकीचे प्रसाद म्हणून वाटावेत. तुम्ही हा उपवास फळे खाऊन पण करू शकता. तसेच ह्या दिवशी गणेश चालिसा किंवा गणेश पुराण वाचू शकतात.

अश्या प्रकारे आपण गणेश चतुर्थी चे व्रत करू शकता.

आपल्या इतर सणवारां विषयी माहिती आमच्या मराठी सणवार या पोस्ट कॅटेगरी पेजवर उपलब्ध आहे .

टीप : श्री गणेशाची आरती ..