Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा लाभ कोणत्या महिलाना होतो ?

प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र सरकार ची योजना आहे . याची सुरवात 2017 पासून झाली आहे . प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी महिला पहिल्या वेळेस आई होणार असते , त्या महिलाना या योजनेचा लाभ होतो . या योजनेतून पैसे ए बी सी अश्या 3 टप्प्याने गरोधर महिलांच्या खात्यावर जमा होतात . ही योजना सगळ्या वर्गातील महिलांसाठी आहे . 

फॉर्म ए : 

फॉर्म ए साठी महिला लभार्थीचा एल यम पी तारखेपासून 120 दिवसाच्या आत नाव नोंदणी करावी लागते . नाव नोंदणी अंगांवाडीत किंवा  मनपा कार्यालयात करू शकता . नोंदणी झाल्या नंतर पहिल्या टप्प्यात 1000 रुपये खात्यात जमा होतात . 

फॉर्म बी :

फॉर्म बी साठी रक्त पडताळणी गरोदर पणाच्या 6 महिन्या पासून करायला पाहिजे . तारखेच्या आधारावर दूसरा टप्पा रुपये 2000 चा खात्यावर जमा होतो . 

फॉर्म सी :

फॉर्म सी हा बाल जन्मल्या नंतर 3.5 महिन्याचे झाल्यावर त्याचे पूर्ण लसीकरण झाल्यावर 2000 रुपये दिले जातात . 

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे मुख्य कारण काय आहे ?

जी महिला काम करत असते , पण गरोधर असल्यावर तिला काम करणे शक्य नसते , त्या मुळे  सरकार गरोधर महिलेला स्वतः ची काळजी व थोडीशी मदत व्हावी यासाठी सरकार महिलाना 5000 रुपये मदत करते . 

फॉर्म साथी लागणारे कागदपत्र : 

 PMMVY साठी 3 फॉर्म भरावे लागतात . 

फॉर्म ए

हा 4 पानाचा असतो . 1) गरोदर महिलेचे व तिच्या 2) पतीचे आधार कार्ड . 3)बँकेचे पासबूक . गरोदर महिलेचे 4) लस घेतल्याचे एम सी पी कार्ड अश्या 4 कागदपत्रांची गरज असते . 

फॉर्म बी 

गरोदर महिलेची सोनोग्राफी ची नाव नोंदणी झाल्यावर [प्रसव पीडा तपासणी ] ती फॉर्म बी भरू शकते . त्या साठी आधार कार्ड व एम सी पी कार्ड  लागते . 

फॉर्म सी : 

बाल 3.5 महिन्याचे झाल्यावर व त्याचे संपूर्ण लसीकरण झाल्यावर त्या मध्ये एम सी पी कार्ड व बाळाची लस दिल्याची तरीख , बाळाचा जन्माचा दाखला , बँकेचे पासबूक ची झेरॉक्स  लागते . 

ही फॉर्म भरण्यासाठी तुम्ही गावातील बलविकास कार्यालय सोबत संपर्क साधू शकता . किंवा त्यासाठी आंगणवाडी सेविकांची मदत घेवू शकता . 


इतर सरकारी योजनांची माहिती इथे पहा..

—————————-

संदर्भ

  1. भारत सरकार ची योजने संदर्भातील वेबसाइट
  2. उमंग – भारत सरकारचे वेब पोर्टल

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo