आषाढी एकादशी 

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा रखूमाईवर उभा विटेवर कर कटेवर ठेऊनिया भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

View More

कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई (विठाई) माझी लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी ऊस, गाजर, रताळू अवघा झालासे गोपाळू मोट, नाडा, विहीर, दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा

Radish
Carrot
Persimmon
Artichoke

दिंडी चालली चालली 

अवघा रंग एक झाला l  रंगि रंगला श्रीरंग ll   मी तूंपण गेले वाया l  पाहता पंढरीच्या राया ll    नाही भेदाचे ते काम l  पळोनि गेले क्रोध काम ll   देही असोनि विदेही l  सदा समाधिस्त पाही ll   पाहते पाहणे गेले दुरी l  म्हणे चोखियाची महारी ll

देवा पंढरीनाथा 

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥

आम्हीं तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।।१।। तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ।।२।। कंठी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ।।३।।