वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण जेष्ठ महिन्याच्या पौर्णमेच्या दिवशी येतो. सुवासिनी या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पूजेचा मुहूर्त या वर्षी १४ जून २०२२ रोजी मंगळवारी सायंकाळी ५:२२ पर्यंत आहे.

वटपौर्णिमा

पूजेचे साहित्य ताट, पाण्याने भरलेला तांब्या आगरबत्ती, ओटीचे साहित्य पंचामृत, सुपारी खारीक खोबरे तांदूळ पूजेसाठी गणपतीची मुर्ती कापसाचे वस्त्रमाळ दोरा गूळ शेंगदाणे नैवेद्यासाठी हळद कुंकू ५ फळे फुले नगिनीची पाने

वटपौर्णिमा

या सर्व वस्तू तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथे घेवून जाव्यात. या दिवशी लवकर उठून सर्व सकाळची कामे उरकून वडाची पूजा करावी

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा पूजा कशी करावी ? प्रथम वडाच्या झाडावर पाणी घालावे. नंतर नगिनीच्या पान v ओटिचे समान घेवून वडाच्या झाडा समोर ठेवावे. ५ प्रकारची फळे ठेवून नंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू वहावे. दिवा व अगरबत्ती लाऊन पूजा करावी... 

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा पूजा कशी करावी ? .. नंतर झाडाला कापसाची वस्त्रमाळ बांधावी. व त्या नंतर वडाच्या झाडाला दोरा बांधून ७ फेरे मारावेत... 

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा पूजा कशी करावी ? .. अशाप्रकारे वटवृक्षाची मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे.

वटपौर्णिमा

वट पौर्णिमा महत्व ह्या दिवशी वडाची पूजा केली जाते. अशी कथा आहे की सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली मिळवले होते. म्हणून जेष्ठ महिन्याच्या पौ्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते... 

वटपौर्णिमा

वट पौर्णिमा महत्व .. सर्व वृक्षात वट वृक्ष हा पवित्र वृक्ष मानला जातो. त्या दिवशी पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करतात.