श्री कृष्ण जन्माष्टमी केव्हा आहे? शुभ मुहूर्त ?श्री कृष्ण व बलराम याचे नामकरण कसे झाले? गोपाळकाला चे काय महत्त्व आहे?
श्रावण महिना आला की खूप सनाना सुरवात होते. नागपंचमी ,रक्षाबंधन तसेच श्री कृष्ण जन्माष्टमी असे बरेच सण आहे.
तर आज आपण या लेखात श्री कृष्ण जन्माष्टमी केव्हा आहे ते पाहणार आहोत,आणि त्याबरोबर श्री कृष्ण यांच्या जीवनाबद्दल आणखी काही माहिती.
श्री कृष्ण जन्माष्टमी
हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमी ला खूप महत्व आहे.हिंदु पचागाणनुसर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्री कृष्ण यांचा जन्म झाला आहे.
त्यामुळे दरवर्षी भादोच कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात.
श्री कृष्ण जन्म कहाणी
भगवान कृष्ण हे भगवान विष्णू यांचे आठवा अवतार आहे.ते सगळ्या वाइट गोष्टी विशेषता” मथू राचा शासक राजा कंस” याचा वध करण्यासाठी जन्म झाला आहे.त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांनी त्यांना जन्म दिला.कृष्णाच्या जन्मानंतर पिता वासुदेव व माता देवकी हे आपल्या पुत्राला कंस पासून वाचविण्यासाठी त्यांनी कृष्णाला टोकरीत घेऊन नदी ओलांडून गोकुळात यशोदा माता व नंद बाबा यांच्या घरी सोडून आले.माता यशोदा यांनी कृष्णाचा सांभाळ केला.
जन्माष्टमी चा शुभमुहूर्त
तारीख – १८ ऑगस्ट २०२२.
वार – गुरुवार.
मुहूर्त – रात्री ८.४१ ते १९ ऑगस्ट रोजी ८.५९ पर्यंत आहे.
श्री कृष्ण व बलराम याचे नामकरण कसे झाले?
ऋषी गर्ग हे यदुवंश हे कुलगुरू होते.एकदा ते एका मुलांच्या नाव ठेवण्यासाठी गोकुळात आले होते. तेव्हा त्यांची नंदबाबा आणि यशोदा यांच्याशी त्यांची भेट झाली.त्यांनी त्यांना आग्रह केला की आपल्या दोन्ही मुलांची नावे ठेवा. त्यावर ऋषी गर्ग यांनी कंस राज्याला घाबरून नकार दिला. त्यावर नंदबाबा यांनी गोकुळात येऊन नाव ठेवावे कोणालाच माहित नाही होणार असे सागितलं.
“बलराम”यांचे नाव कसे ठेवले?
ऋषी गर्ग यांनी सागितले की बलराम यांचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला.
ते रोहिणी नक्षत्र आहे.
त्यामुळे त्याचं नाव रोहनेय आहे.
हा मुलगा त्यांच्या गुणांनी लोकाना प्रसन्न करीन म्हणून त्यांचं एक नाव “राम “राहील.
हा मुलगा खूप शक्तिशाली राहीन त्यामुळे लोक त्यांना “बलराम” म्हणते . आणि हा मुलगा साऱ्या लोकात प्रमाचे वातावरण निर्माण करीन त्यामुळे हा मुलगा “बलराम” या नावाने ओळखला जाईल .
श्री कृष्ण हे नाव कसे ठेवण्यात आले?
ऋषी गर्ग यांनी कृष्ण यांना बाळ रुपात बाघीतल्यास , ऋषी गर्ग यांनी सागितले की हा मुलगा अनेक नावांनी ओळखला जाईल. त्यांचा जन्म झाला व त्यांचा रंग हा काळा आहे,म्हणून त्यांचं नाव “कृष्ण” राहीन. त्यांच्यमुळे गोकुळात आनंदाचे वातावरण राहीन,आणि अनेक संकटापासून ते गोकुलाचे सवरक्षण करते न.
त्यांचे बरेच नाव आहे, कान्हा,किशन,कन्हेया,किसणा आणि कृष्ण या नावाने ओळखले जाते.
कृष्ण जन्माष्टमी महत्त्व
कृष्ण जन्माष्टमी दिवशी भगवान कृष्ण यांचे भक्त विधिनुसार त्यांचे व्रत करतात.उपवास करतात आणि त्याने मंदिर जिथे असेन तिथे दर्शनास जातात.
असे म्हणतात की या दिवशी पूर्ण श्रद्धापूर्वक व्रत केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात तसेच त्यांना मुल होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूप चागलं आहे.
कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी कशी करतात ?
सकाळी लवकर उठून अंघोळ करून पूजेची सुरवात करावी .
या दिवशी भगवान श्री कृष्ण यांच्या बाळरुपाची पूजा केली पाहिजे .
पूजेला सुरवात करण्या आधी श्री कृष्ण यांला पंचामृत आणि गगाजल याने स्नान घालावे.
त्यानंतर नवे वस्त्र घालून त्यांचा श्रुगार करावा.
भगवान श्री कृष्ण यांना पाळण्यात ठेवून त्यांना झोका द्यावा .
त्यांना गोड कीवा त्यांचे आवडते पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला.
नैवेद्य दाखविल्यानंतर गगाजल अर्पण करून त्यानंतर कृष्णाची आरती करावी.
गोपाळकाला चे काय महत्त्व आहे ?
कृष्णाअष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तो दहीहंडीचा उत्सव असतो. महाराष्ट्रात आणि भारताच्या अन्न राज्यातही हा उत्सव साजरा केला जातो.या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी टागली जाते आणि गोविंदाची पथके एकावर एक थर रचून दहीहंडी फोडतात.
गोपाळकाला चे काय महत्त्व आहे ?
गोपाळकाला – गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा .कळ म्हणजे एकत्र मिसळणे मुरमुरे,ज्वारीच्या लाह्या,धान्याच्या
लाह्या,दही, ताक,चण्याची भिजलेली डाळ,साखर,फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो.
हा खाद्यपदार्थ श्री कृष्ण यांचा आवडता आहे.
संदर्भ :
- विकिपीडिया मुक्त ज्ञान कोश