Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

झाशीची राणी लक्ष्मीबाई या एकोणीसव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या.हिंदुस्तान व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध स्वातंत्र उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्या लहानपापासूनच खूप हुशार आणि धाडशी होत्या.

राणी लक्ष्मीबाई यांचा बालपण आणि जीवनप्रवास

लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ साली उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण चे नाव मणिकर्णिका होते. त्याला प्रमाणे सगळे मनू असे म्हणत. त्यांच्या आई चे नाव भागीरथी बाई आणि वडिलाचे नाव मोरोपंत तांबे होते.मोरोपंत तांबे हे बिठुर न्यायालयात पेशवा होते. आई भागीरथी बाई हया एक सुसंस्कृत ,बुद्धिमान आणि धर्म निष्ट स्वभावाच्या होत्या. राणी लक्ष्मीबाई या ४ वर्षाचा असतांनाच त्याचा मृत्यू झाला. घरात मुलीची देखभाल करण्यासाठी कोणी नव्हते .म्हणून त्यांचे वडील त्याला त्यांच्याबरोबर नेत होते.
मनु यांना लहानणापासूनच शास्त्र ची शिक्षा व शस्त्र यांची शिक्षा घेतली होती. मनु हळू हळू मोठ्या होत गेल्या.त्यांचा विवाह ठरला. झाशी चे मराठा शासित राजा गागाधर राव नेवाळकर यांच्याशी १८४२ साली विवाह झाला.
व त्या झाशीच्या राणी झाल्या. विवाहानंतर त्यांचं नाव “लक्ष्मीबाई” असे ठेवले.
त्यानंतर १८५१साली राणी लक्ष्मीबाई यांनी एका पुत्राला जन्म दिला.
परंतु चार महिन्यातच त्याचा मृत्यू झाला. १८५३ साली राजा गगाधर राव यांचं स्वास्थ जादा बिघडले मग त्यांनी एका पुत्राला दत्तक घेण्याचे ठरवले.
व पुत्र दत्तक घेतल्यानंतर २१नोव्हेंबर १८५३साली राजा गगाधर राव यांचा मृत्यू झाला. त्यांनी दत्तक घेतलेल्या पुत्राचे दामोधर हे नाव ठेवले.

झाशी चे युद्ध

झाशी हे १८५७ च्या सग्रामाचे एक प्रमुख केंद्र बनले त्यामुळे हिसेच वळण लागले.
राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीची सुरक्षा वाढवली व एक स्वयंसेवक सेना तयार केली.
या सेनेत महिला त्यांची भरती केली व त्यांना युद्धाचे प्रशिश्रन दिले.
झलकरी बाई जी राणी सारखीच दिसणारी होती.तिला त्यांच्या सेनेत जागा दिली.
१८५७ सलि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात शेजारच्या राज्याने ओरछा आणि दलिता या राज्याने झासिवर आक्रमण केले.
राणी त्याला चागल्या योजनेची त्याला मात केली.
१८५८ साली जानेवारी महिन्यात ब्रिटन सेनानी झाशीच्या दिशेने यायला सुरवात केली.
आणि मार्च महिन्यात झाशीला चारी बाजूने घेरले.दोन तासाच्या लाडाई नंतर ब्रिटन सेनानी झाशीवर कब्जा केला.
राणी हया दामोधर याला पाठीवर घेऊन युद्ध करत होत्या.
राणी यांनी दामोधर राव यांचा जीव वाचवला.
१८५८ मध्ये ब्रिटिशानी झाशी त्यांच्या ताब्यात घेतली.
व राणी लशमीबाईंनी या आपल्या सैन्य समवेत कल्पी येथे पोहचल्या.
तेथे तात्या टोपे यांनी त्याला मदत केली.
शिवाय तेथील पेशव्यांनी दे राणीला कल्पी इथे आश्रय दिला आणि आपले सैन्य देखील मदतीसाठी दिले.२२ मे १८५८ साली इंग्रजांनी कल्पिवर आक्रमण केले.यावेळी राणी नी आपल्या अतुलनीय शौर्याने त्यांचा पराजय केला.त्यामुळे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू

१७ जून १८५८ साली राणीलक्ष्मीबाई किंग्स रॉयल आयरींग विरोधात युद्ध पुकारले आणि पूर्व भागात ग्वालियर चे नेतृत्व केले .
या युद्धात त्यांच्या महिला सेविकांनी देखील त्याला चाग ली साथ दिली.
गेल्या युद्धात राणी चा घोडा “राजरत्न ” मारला गेल्याने या युद्ध वेळी त्यांचा घोडा नवीन होतं.
या युद्धात राणी लक्ष्मीबाई प्राप्त परिस्थिती स्वीकारत जबर जखमी झाल्या आणि घोड्यावरून खाली पडल्या.
अश्या प्रकारे १७जून १८५८ साली कोटा येथील सराई नजिक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाई यांना वीरगती प्राप्त झाली.

इतर लेख

संदर्भ

  1. मुक्त ज्ञान कोश
  2. विकासपेडिया

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo