Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

आयुर्वेदीक भिमसेनी कापुर

भीमसेनी कापूर हा कापराचा एक शुद्ध प्रकार आहे. हा कपूर सामान्य कापरा पेक्षा वेगळा असतो.सामान्य कापरात मेण असते.

त्यामुळे सामान्य वापरातील कापूर आकार घेतो , चला तर पाहूया भीमसेनी कापूराचे गुणधर्म व उपयोग.

भीमसेनी कापुर व आयुर्वेदिक गुणधर्म

 • हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.
 • सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत, नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
 • रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
 • पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा.
भीमसेनी कापुर
 • केसातील कोंड्याकरीता तसेच सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
 • तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी.
 • नेहमीच्या कापरात मेण असते, पण या भीमसेनी कापूर मध्ये मेण नसते. त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा.
 • आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना भीमसेनी कापूर मिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात , श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
 • दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
 • खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
 • शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.
 • संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही.

कापराचे इतर ही काही उपयोग आहेत

 • प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो, कपड्यांना कसर झुरळ लागत नाही.
 • पावसाळ्यात विशेषत: कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो.
 • डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात.
 • कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात.
 • रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही .
 • गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित.
 • भीमसेनी कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.

कापुर पवित्र का मानला जातो ?

जाणुन घ्या धार्मिक कारण

 • शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.
 • भीमसेनी कापूर लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

कापराचे वैज्ञानिक महत्व

भीमसेनी कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. आणि वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.

भीमसेनी कापूर चे अजून फायदे

 • सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही
 • कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
 • कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
 • कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
 • घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
 • मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
 • मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाही.
 • गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. (५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)
 • कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.

‼आपल्या घरात नियमीतपणे कापुर वापरा व उत्साहित रहा‼

आमचे काही ऐच्छिक अफिलिएट लिंक्स , याद्वारे आम्हाला वेबसाइट चालविण्याचा खर्च चालवता येतो .

आमचे काही इतर लेख

संदर्भ

1 मंगलम ची वेबसाइट

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo