सिंधी पदार्थ रेसिपी

भारतात प्रत्येक किचन मध्ये स्वतःची एक कुकबुक असते . किती पण वेळा आपण जेवणाचा आनंद घेतो ,पण आपल्यला माहित नसते कि ती डिश कोणत्या परंपरेचे आहेत .तसेच आपण आपल्या आहारात सिंधी पदार्थ खातोत .तर आपण काही सिंधी पदार्थ रेसिपी खालीलप्रमाणे आहेत ,

मसाला वाली जवार रोटी-

साहित्य-

  • ज्वारीचे पीठ अडीचशे ग्रॅम,
  • एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून ,
  • कवळ्या हिरव्या पात्या सगटचा लसूण तीन चार दांड्या
  • ,मीठ,
  • तेल,
  • थोडी कोथिंबीर ,
  • अनारदाणे फूड एक चमचा.

कृती-

सर्व साहित्य एकत्र करा. जरा घट्टसर मळा .मग लहान गोळे करा .

पोळपाटावर स्वच्छ प्लास्टिकचा कागद घाला .त्यावर थोडी कनिक भुरभुरवा व हा गोरा ठेवून लाटा .

अलगद लाटावे व कागद उचलून तेवढ्यात अलगदपणे तव्यावर टाकावे. दोन्ही बाजूने थोडे थोडे तेल सोडून भाजा. पराठ्याप्रमाणे लालसर सोनेरी करा .

लस्सी बरोबर या रोटी खाव्यात.सिंधी पदार्थ रेसिपी करून पहा .

आलू टिक्की-

साहित्य-

  • उकडलेले बटाटे सोलून मऊ मळून 250 ग्रॅम,
  • जिरे भाजून व कुटून एक टीस्पून शहाजिरे एक टीस्पून
  • चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून,
  • मीठ ,
  • चिरलेली पुदिना पाने अर्धा टेबलस्पून,
  • काजूचे लहान तुकडे दीड टेबलस्पून,
  • तेल, ब्रेडचे दोन-तीन तुकडे.

कृती-

बटाटे मिरच्या शहाजिरे इत्यादी पदार्थ एकत्र करा .ब्रेड पाण्यात भिजवा तर हातात खूप घट्ट दाबून, त्याचे सर्व पाणी काढून टाका .व तोही या पिठात घाला. व घट्ट मळा मग त्याच्या लिंबाएवढे गोळे करा .

प्रत्येक गोळा हातावर थापा ,चपटा करा. दोन्ही बाजूने रव्यात घोळवा .गरम तव्यावर टाका .दोन्ही बाजूने तेल सोडा .खरपूस लालसर सोनेरी भाजा.

सुरणाची भाजी सिंधी पदार्थ रेसिपी

साहित्य-

  • प्रत्येकी 100 ग्रॅम सुरण व बटाटे ,
  • एक मोठा कांदा,
  • एक इंच आल्याचा तुकडा ,
  • दोन-तीन टोमॅटो बारीक चिरून,
  • मीठ ,
  • धने पूड ,
  • गरम मसाला पूड प्रत्येकी एक टीस्पून ,
  • तिखट एक टीस्पून थोडी कोथिंबीर व पुदिना पाने चिरून ,
  • तूप.

कृती-

सुरणाचे साल काढा. चौकोनी तुकडे करा धुवा. तूप गरम करा .त्यात लाल तळा.

बाजूला ठेवा बटाट्याची साले काढा .लांबट उभे तुकडे करा .ते या तुपात टाका. लालसर तळा मग त्यात सर्व मसाले टाका .थोडे पाणी घाला .

मंद आचेवर शिजवत ठेवा .शिजत आली की सुरणाचे तुकडे टाका .आणि नंतर शिजवा.

अस्साप्रकारे तुम्ही हे सिंधी पदार्थ जे स्वाद आणि फ्लेवर नि तयार केलेले असतात .आणि ते बनवायला आणि करायला पण खूप सोपे असतात .

संदर्भ

  1. अनमोल प्रकाशन प्रांतोप्रांतीचे पदार्थ

आमचे इतर लेख