Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

श्री क्षेत्र आळंदी इथून निघालेली संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी श्री शेत्र पंढरपूरला पोहोचते.

संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका त्यात ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीआपल्या दिंडीतून पायी चालत जातात.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरला का जाते-

पंढरपूरची वारी किंवा वारी विठोबाच्या स्तुतीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे .

यामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामाचे पालखीचा त्यांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थानापासून पंढरपूरपर्यंत नेणे हे समाविष्ट आहे .या मिरवणुकीत अनेक भाविक पायीच सामील होतात.

पालखी महत्त्वाची का आहे-

१६८५ साळी तुकारामाचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून .दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचा त्यांनी निर्धार केला.

हे सामाजिक आदर आणि शांततेचे लक्षण होतं. तुकारामाचे चांदीच्या पादुका त्यांनी पालखी ठेवल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरला का जाते ? जाण्यामागचा इतिहास-

ज्ञानेश्वर माऊली यांची वडील विठ्ठल पंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला पायी वारी करत असत असे म्हणतात.

त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्यांचे भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली .

श्री हेवत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटानेआणि ऐश्वर्याने या सोहळ्याचे पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली .श्री ज्ञानदेव यांच्या पालखी सोहळ्यात पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब यांच्याकडून येत असे.

आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची पालखी 11 जून रोजी श्री पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे .

शनिवारी देहूतून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.
आळंदी होऊन निघून पालखी पुण्यातील भवानी पेठ, सारवड, जेजुरी ,वाल्हे ,लोणंद, तरडगाव विमानतळ ,फलटण ,बरड नातेदूते ,माळशिरस ,वेळापूर, भडे शेगाव ,वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे .

यंदाच्या पालखी सोहळा उत्साहात साजरा होणार आहे.

तीन जुलै पर्यंत पालखी पंढरपूर येथे मुक्कामी असणार .नंतर पंढरपुरी येथील गोपाल काल्याच्या कार्यक्रम होऊन पालखीच्या पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

परतीच्या प्रवासात वाखरी ,वेळापूर ,नातेदूते फलटण ,सासवड ,हडपसर ,पुणे आळंदी नगर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिरात विसरणार आहे .

संदर्भ

  1. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo