सँडविच च्या वेगवेगळ्या रेसिपी करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

सँडविच रेसिपी करताना एक दिवस शिळा असलेला ब्रेड ही चालू शकतो. मात्र रोल सँडविच करताना ताजा ब्रेड वापरावा. सँडविचला ताजा ब्रेड वापरावयाचा असेल तर तो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मगच वापरावा.

ब्रेडमध्ये बरेच प्रकार असतात पांढरा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, स्पायसी ब्रेड, बन आणि रोल. वापरताना ब्रेडची बाहेरील बाजू चांगली असलेलाच ब्रेड वापरावा.
सँडविच करताना ब्रेडच्या प्रत्येक स्लाईसची जाडी बोटाचे अर्धे पेर इतकी असावी. चहाबरोबर द्यायचे सँडविच अजूनही पातळ असावे.
वापरताना क्रीम व बटर ताजे असावे त्यामुळे ब्रेडवर पसरणे सोपे जाते, शिवाय सँडविचसाठी आपण ज्या भाज्या वापरतो त्या चिकटून राहतात.
सँडविच कापण्याची सुरी धारदार पाते असलेली घ्यावी , व ती पाण्यात बुडवून वापरावी. नेहमी भाज्या वगैरे साहित्य ताजेच वापरावे. सँडविच मध्ये भाज्या भरताना जास्त भरल्या जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
सँडविच मध्ये घालवायचे सारण असेल तर ब्रेडवर सॅलडची पाने घालून मग सारण भरावे. सँडविच नेहमी फाईल पेपर किंवा ओल्या मलमलच्या कापडाखाली झाकून ठेवावे. त्यामुळे सँडविच खाताना मऊ व ताजे वाटतात. सँडविच च्या वेगवेगळ्या रेसिपी खालीलप्रमाणे आहे,

आलू सँडविच

साहित्य-

 • ४-५ मध्यम आकाराचे बटाटे,
 • आले लसूण,मिरची पेस्ट,
 • मीठ चवीनुसार,
 • लोणी,
 • एक ब्रेड.
आलू सैंडविच
आलू सैंडविच

कृती –

 • बटाटे उकडून घ्यावेत .गार झाल्यावर साले काढावी .नंतर बटाटे कुस्करून घ्यावेत. कुस्करलेल्या बटाट्यामध्ये प्रत्येकी अर्धा चमचा आले ,लसूण व मिरचीची पेस्ट घालावी. त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून गोळा करा.
 • ब्रेडचा एक स्लाईस घेऊन त्याला लोणी लावावे. नंतर त्यावर बटाट्याच्या मिश्रणाचा जाडसर थर द्यावा.
 • दुसऱ्या ब्रेड घेऊन त्याला लोणी लावावे. तो स्लाईस आधीच्या ब्रेडवर पालथा घालावा. दोन्ही स्लाईस जरा दाबून घ्यावे व मधोमध तिरके कापावे .नंतर तव्यावर थोडेसे लोणी घालून सँडविच भाजून घ्यावेत .
 • हे सँडविच टोमॅटो सॉस सोबत गरम गरम खावयास द्यावेत.


खजुराचे गोड सँडविच

साहित्य

 • एक मोठा ब्रेड किंवा अधिक लागल्यास अधिक ब्रेड ,
 • मीठ चवीनुसार,
 • पंधरा-सोळा काजू ,
 • पंधरा-वीस बेदाणे,
 • खजूर बिया काढून वीस पंचवीस ,
 • पिठीसाखर अर्धा मोठा चमचा.
 खजुराचे गोड सँडविच
खजुराचे गोड सँडविच

कृती-

 • प्रथम खजुराच्या बिया काढून, स्वच्छ धुऊन घ्या. काजू ,बेदाणे हवी असल्यास एखादी मिरची मीठ ,लोणी हे सर्व मिक्सरमधून काढावे .
 • सर्व साहित्य पिठीसाखर घालून एकजीव करून घ्यावे. नंतर ब्रेडच्या कडा कापून त्याला लोणी लावावे .लोणी नसल्यास दुधावरची साय ही चालेल.
 • मग वरील मिश्रण ब्रेडच्या एका स्लाईस वर लावावे .त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाईस घालावा .किंचित दाबावे सुरीने मधोमध तिरके कापावे .छान डेकोरेटिव्ह प्लेटमध्ये खायला द्यावे .
 • डेकोरेशन म्हणून चेरी कापून ठेवली तरी चालेल .तिखट पदार्थ बरोबर हा गोड पदार्थ देण्यास बरे वाटते .शाळेच्या मुलांच्या डब्याला हे सँडविच देता येते.

आज-काल सँडविच तिरके न कापता आयताकृती किंवा चौकोनी करतात. या सँडविच मध्ये सर्व साहित्य पौष्टिक असल्याने मुलांसाठी ते चांगले असते. सँडविच अशा रेसिपी वाचाल तर करून बघाल. पाच मिनिटात बनेल सँडविच च्या ह्या रेसिपी.

संदर्भ

 1. मराठी कुकबुक पीडीफ
 2. सर्वांचे आवडते सँडविच अमोल प्रकाशन २०१०

आमचे इतर लेख