आपण विवेक चूडामणी या शृंखलेचा दुसरा भाग पाहत आहोत. या भागात आपण ब्रम्ह निष्ठेचे महत्व पाहणार आहोत. ह्या साठी विवेकचूडामणी ग्रंथात 6 (2 ते 7) श्लोक दिले आहेत, हे आपण एक एक करून पाहूया.
ह्या 6 श्लोकांचा भावार्थ मी माझ्या अल्प मंद संसारिक बुद्धी द्वारे देत आहे त्यामुळे तो त्रुटीयुक्त असेल , तरी वाचकांनी अधिक माहिती साठी संदर्भ मध्ये दिलेल्या लिंक पहाव्यात.
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (२/७)
जन्तूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद्वैदिकधर्ममार्गपरता विद्वत्त्वमस्मात्परम्।
आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति- र्मुक्तिर्नो शतकोटिजन्मसु कृतैः पुण्यैर्विना लभ्यते।।२।।
कोणत्याही जीवाला नरजन्म मिळणे दुर्लभ आहे . त्यात पुरुषत्व आणि ब्राम्हणत्व मिळणे फारच कठीण आहे. कारण ह्या 2 गोष्टी जन्मतः मिळत नाहीत. तसेच ब्राम्हण म्हणजे ज्याला ब्रम्ह चे ज्ञान आहे. त्याला देखील वैदिक धर्माचा अनुगामी होणे अवघड आहे , तसेच त्याहून हि अवघड म्हणजे विद्वत्ता प्राप्त होणे आहे.
आणि जरी वरील दिलेल्या सर्व गोष्टी असतील तरी आत्मा व अनात्मा यांच्यातील भेद ओळखणारा विवेक , सम्यक अनुभव करण्याची पात्रता , ब्रम्हत्मा भाव होणे व मुक्ती मिळणे , हे फक्त करोडो जन्माच्या पुण्याचे , कर्मा नेच प्राप्त होते.
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (३ /७ )
दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम् |
मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरूषसश्रय: ||३||
या तिन्ही गोष्टी या जगात मिळणे कठीण आहे आणि ते देवांच्या दयेवर अवलंबून आहेत – मानवी जन्म, मोक्षाची इच्छा आणि महान आत्म्याचा सहवास. हे सूत्र अध्यात्मिक व्यक्तीला नक्कीच आकर्षित करेल! वैयक्तिकरित्या आपण विचार करू शकतो की आपल्याकडे यापैकी कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याबद्दल आपण कृतज्ञ होऊ शकतो. जर आपल्याला महान आत्म्याचा सहवास नसेल तर आपण एक व्हावे!
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (४/७)
लब्ध्वा कथञ्चित्ररजन्म दुलभं तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारर्शनम्।
यः स्वात्ममुक्तौ न यतेत मूढ़धी: सह्यात्महास्वं विनिहंत्यसद्ग्रहात्।।४।।
हा दुर्लभ मनुष्यजन्म कसा तरी प्राप्त करून ,आणि त्यातही श्रुतीच्या तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होऊन, असे पुरुषत्व प्राप्त करून, जो मूर्ख मनुष्य आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी प्रयत्न करीत नाही, तो निश्चितच आत्मघातकी आहे. असत्यावर विश्वास ठेवून तो स्वतःचा नाश करतो.
यात आदि शंकराचार्यांचे म्हणणे असे कि मनुष्य जन्म किती महान आहे याचे मनुष्याला ज्ञान नाही , किंवा तो हा अनमोल मनुष्य जन्म असत्य गोष्टींमागे असाच वाया घालून स्वतःचा नाश स्वतः करून घेतो.
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (५/७)
इतः कोन्वस्तिमुढ़ात्मा यस्तुस्वार्थे प्रमाद्यति।
दुर्लभ मानुषं देहं प्राप्य तत्रापि पारुषम्।।५।।
दुर्लभ मनुष्य देह और उसमें पुरुषत्व को पाकर जो (मोक्ष रूप)स्वार्थ-साधन में प्रमाद करता है इससे अधिक मूढ़ और कौन होगा?
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (६/७)
वदन्तुशास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तुदेवता:।
आत्मैक्यबोधेनविना विमुक्तिर्न सिध्यतिब्रम्हशतान्तरेsपि।।६।।
शंभर ब्रह्म होऊनही (म्हणजे शंभर कल्पांनंतरही) आत्मा आणि परमात्मा यांच्या एकात्मतेची जाणीव होईपर्यंत मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. जरी त्याने कितीही शास्त्रांचे स्पष्टीकरण केले, देवतांची पूजा केली, विविध शुभ कर्मे केली किंवा देवतांची पूजा केली. तरी जो पर्यंत त्याला आत्मा हा परमात्मा सोबत एकात्मिक जाणवत नाही तो पर्यंत तो बंधनातच आहे.
विवेकचूडामणी ब्रम्हनिष्ठेचे महत्व श्लोक (७/७)
अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेनेत्येव हि श्रुतिः।
ब्रवीति कर्मणो मुक्तेरहेतुत्वं स्फुटं यतः॥ ७॥
धनाद्वारे अमृत्वाची आशा नाही , असे वेदातील श्रुतींचे वचन आहे , यातून कर्म हा मुक्तीचा हेतू नाही असे स्पष्ठ होते. आता हा श्लोक जास्त गूढ आहे , याचा अर्थ काढणे तसा कठीण आहे , इंटरनेत वर देखील जास्त काही या बाबत मिळत नाही , पहिले वाक्य सोपे आहे कि संपत्ती किंवा धन हे अमरत्व प्रदान करत नाही ,
रेफेरेंस
- https://www.facebook.com/shishyasatsang/photos/a.803774139789748/1755091404658012/?type=3
- Kavita Kosh Website
- https://www.wisdomlib.org/hinduism/book/vivekachudamani/d/doc144455.html