प्रत्येक आषाढ महिन्यात आपण बरेच पंढरपूरला जातो .विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगाचे रहस्य काय आहे ते पाहूत.आषाढी एकादशी माहिती.

विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगाचे रहस्य-

आपण आषाढी एकादशी ला विठ्ठला च्या वारीला जातोत .तचेच एक कथा आहे ती , भगवंत विष्णू रुक्मिणीच्या शोधात दिंडीर वनात आले .आणि तेथे येऊन पुंडलिकाच्या विनंतीवरून विटेवरी उभे राहिले. पुंडलिकाने प्रार्थना केली तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्यावी .जे पण भक्त येतील त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या .भगवंत रुक्मिणीच्या शोधासाठी आले नव्हते तर आपल्या भक्ता ला पण भेटायला आले होते.
ज्यावेळेस भगवंत पुंडलिकाला भेटायला आले त्यावेळेस लाखो सूर्याचे तेज पडते तसे तेज त्या ठिकाणी पडले .आणि भक्त पुंडलिकांनी ते पाहिले . पुंडलिका ने आपल्या आई-वडिलांची सेवा करू दे मला वेळ नाही असे भगवंताला सांगितले. त्यानंतर फक्त पुंडलिकांनी एक वीट फिरवली आणि भगवंताला सांगितले .

भगवंता तुम्ही या विटेवरी उभे रहा जे कोणी भक्त येतील त्यांना तुमची पूर्ण कृपा प्रदान करा .ही बातमी देव देवतांना सुद्धा कळाली की, भगवंत पंढरपुरात राहत आहे. त्यांची कृपा भक्तांवर प्रदान करत आहेत .

भगवान शिव शंकर पंढरपूरला कसे गेले .

विशेष म्हणजे आषाढी कार्तिक एकादशीला लाखो भक्तांचा मेळा या ठिकाणी भरतो. तेव्हा शिवशंकर यांना ही बातमी कळाली.आपल्या संपूर्ण परिवारासह पंढरपूरला निघाले. सगळ्यात पहिले वारकरी हे भगवान शंकर आहे .नंतर पार्वती कार्तिकी, गणपती आणि नंदी हे पाचही जण पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपूरला भयंकर गर्दी होती.

पंढरपुरात गर्दीमुळे जाता येत नव्हते त्यावेळेस शिवजी आपल्या परिवारासह आले. पार्वती माता चालून चालून दमल्या तेव्हा त्या शिवजीला म्हणाल्या, देवा मी पुढे जाऊ शकत नाही. मंदिराच्या पश्चिम दिशेला पद्मावती मातेचे मंदिर आहे. तेथे पार्वती बसून राहिल्या पुढे नाही आल्या. नंतर नंदी पुढे हनुमानाच्या मंदिरासमोर जाऊन म्हणाला ,खूप गर्दी आहे. आता मी पण नाही येत. नंतर कार्तिकीय पण गेले नाहीत .नंतर गणपती व शिवजी दर्शनासाठी आत जाऊ लागले .

महाद्वारातून आज जाताना गणपतीचे मंदिर दिसते .आणि तेथेच गणपती बाप्पा थांबले .त्यांनी शिवजीला सांगितले, मी आत जाऊ शकत नाही .तुम्ही आत जा आणि त्यानंतर शिवजी आत गेले .त्यांनी भगवंताच सुंदर दर्शन घेतले. आणि त्यांना पाहून देवाचे देव महादेवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले .भगवंताची स्तुती करू लागले .आणि ते सगळं ऐकून आपल्या प्रेमळ भक्ताला जागा तरी कुठे द्यावी असं विठ्ठलाला वाटलं .तर विठ्ठलाने आपल्या डोक्यावर शिवजिला जागा दिली. म्हणून शिवजी भगवंताच्या डोक्यावर आहेत. विठ्ठल यांनी आणि शिवलिंग डोक्यावर घेतले.

भगवंत दाखवितात जो भक्त माझ्याकडे येईल प्रामाणिक भक्ती करीत त्याला मी हा मान देईल. विठ्ठल हे आपल्या भक्तांची किती काळजी घेतात एका भक्ताला दिलेल वचन पाळण्यासाठी युगेन युगे त्या विटेवरी उभे आहेत.अशाप्रकारे विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंगाचे रहस्य ची हि कथा आहे .

आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी दिसतात .

आषाढी एकादशी माहिती

आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात.
एकादशी तिथी.
दिनांक=२९ जून २०२३.
वार= गुरुवार.
एकादशी किती प्रारंभ
29 जून 2023 ला पहाटे ३ वाजून 18 मिनिटांनी होणार आहे.
30 जून पहाटे २वाजून 42 मिनिटांनी पूर्ण होईल.

या दिवशी रवियोग पण आहे सकाळी ५ वाजून 26 मिनिटांनी ते दुपारी ४वाजून तीस मिनिटांनी असेल.
विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचे दैवत मानले जातात .आषाढी एकादशी च्या दिवशी सुमारे आठशे वर्षांपासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. पंढरपुरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

संदर्भ

  1. Youtube Video

आमचे इतर लेख