काही व्हिटॅमिन आपल्या मेंदूला आणि हृदयाला या दोघांसाठी खूप आवश्यक आहे .पण इतक्या साऱ्या विटामिन्स पैकी मेंदू गतिमान करणारे व्हिटॅमिन कोणते आहेत, तर पाहूया. तत्पूर्वी आपण हे विटामिन घेण्यापूर्वी आपली हेल्थ हिस्टरी व तज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे. आम्ही इथे फक्त मेंदूला गतिमान करणारे सात विटामिन्स जे देत आहोत ते सर्व सामान्य माहिती नुसार देत आहोत.
Table of contents
व्हिटॅमिन म्हणजे काय?
व्हिटॅमिन हे आपल्या शरीरात खूप गरजेचे आहेत ते ते आपल्या मेंदूला सुरक्षा देण्याचे काम करतात. त्यामुळे यांची कमी होऊ देऊ नका. तर ते सात व्हिटॅमिन कोणता आहे ते पाहू
- व्हिटॅमिन बी,
- व्हिटॅमिन बी१,
- व्हिटॅमिन बी२
- व्हिटॅमिन B७,
- व्हिटॅमिन B१२,
- Omega-३,
- मॅग्नेशिय
व्हिटॅमिन बी
व्हिटॅमिन बी मध्ये बी१, बी२,बी३, बी७,बी५,बी७,बी९,आणि बी१२ अशा प्रकारचा व्हिटॅमिन चा समावेश असतो .हे व्हिटॅमिन शरीराचे सर्व कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी फार महत्वाचे असतात.
व्हिटॅमिन बी १
व्हिटॅमिन बी१ हे DNA आणि RNA योग्य नसाचे कार्य व संश्लेक्षणामध्ये सहाय्य करते. आणि मेंदूला चालना देते.
अन्न स्रोत- (थीयामिन)
ईस्ट, यकृत ,मासे, सोयाबीन,
वाटाणे ,बटाटे ,मशरूम, सूर्यफुलाच्या बिया ,टोमॅटो आणि वांगी.
हे सर्व अन्नपदार्थ खाणे महत्त्वाचे आहे यांनी आपला मेंदू ला चालना मिळते.
फायदे –
व्हिटॅमिन बी१ मध्ये तांत्रिक संरक्षण प्रभाव असतात. आणि ते मेंदूच्या कोशिका भोवती सुरक्षात्मक आवरण बनवतात. व्हिटॅमिन बी१ हे एक वेदना कमी करण्यासाठी पण कार्य करते.
व्हिटॅमिन बी २
फायदे
व्हिटॅमिन बी२ हे जीवनसत्त्व शरीरात ऊर्जेचे उस्तर्ग करतो. जो शरीराच्या सामान्य कार्य व गतीविधींना सहाय्य करतो .तो शरीरात विटामिन बी च्या इतर घटकांच्या सामान्य स्तर राखून ठेवतो.
अन्नस्रोत
दूध ,दुधाचे उत्पादने ,ताक ,बदाम, हिरव्या पाले भाज्या, अंडी ,नट , तांदूळ आणी होल्ग्रेस.हे अन्नपदार्थ आपण आपल्या आहारात ठेवले पाहिजे.
व्हिटॅमिन बी७ -(बायोटीन)
तांत्रिक प्रणालीच्या निरोगी कार्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन बी७ आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी७ चे अन्न स्त्रोत
अंडे ,दूध ,केळी ,बटाटे ,बियाणे सोयाबिन दाणे ,डुकरांचे मांस, आणि पालेदार हिरव्या भाज्या.
या जीवनसत्वामध्ये सप्लीमेंटेशन केल्याने केस गळती टळण्यास मदत होते. आणि नखाची ताकद व संरचना सांभाळली जाते.
व्हिटॅमिन बी १२
व्हिटॅमिन बी१२ हे लाल रक्त कोशिकांचे उत्पादन आणि DNA संश्लेषण आणि नसांच्या कोशिका व रक्त कोशिकासाठी महत्त्वपूर्ण आहे .
व्हिटॅमिन बी१२ चे अन्न स्रोत-
मेंढी, मासे ,अंडी, बिफ.
व्हिटॅमिन बी १२ चे शरीरासाठी अनेक कार्य व फायदे आहेत. तो त्वचा आणि केसांच्या आरोग्याला सांभाळतो व सुरक्षित ठेवतो.
ओमेगा -३
ओमेगा -३मध्ये फॅटी ऍसिड चे प्रमाण जास्त असते .ओमेगा -३ हे मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहे. मेंदूच्या पेशी त्यांच्या पडद्यात ओमेगाचे उच्च स्तर असलेल्या इतर पेशींशी संवाद राखण्यासाठी अधिक चांगला आहे.
मॅग्नेशिम
मॅग्नेशियम हे तुमचा मेंदू गतिमान होण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. मॅग्नेशियम मज्जातंतूच्या संप्रेषणात आणि निरोमस्कुलर वहन मध्ये एक आवश्यक भूमिका बजावतो.
व्हिटॅमिन ‘बी ‘ चे संपूर्ण घटक मेंदूला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मेंदूला गतिमान बनवण्यासाठी महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन बी हे आपल्या पेशीच्या मूलभूत कार्यासाठी आणि ऊर्जेसाठी पोषक तत्वाच्या मेटाबोलिजम साठी गरजेचे आहे. आपल्या शरीरातील सर्वात जास्त सक्रिय अवयव मेंदू असतो. त्यामुळे त्याची कमतरता भासल्यास त्याचा फटका मेंदूला बसू शकतो.
अशाप्रकारे तुम्ही देखील आपल्या खाण्यामध्ये बदल करून, हे आवश्यक पदार्थ खाल्ल्यास तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने पाऊल टाकू शकतात.मेंदूला गतिमान बनू शकतात .
संदर्भ
- A Harvard nutritionist shares the No. 1 vitamin that keeps her brain ‘young and healthy’
- 15 पदार्थ जे मेंदूचे कार्य गतिमान करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात