Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख राज्या पैकि एक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे .पावसाळा सुरू झाल्यावर पर्यटक आपोआपच निसर्गाची चाहूल घेण्यासाठी अशा नैसर्गिक वातावरणात जातात . आज आपण महाराष्ट्रातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे पाहूया. महाराष्ट्र भारतामधील असे राज्य आहे ज्याला नैसर्गिक वरदान लाभलेले आहे. महाराष्ट्राचे पर्यटन स्थळे पाहण्यासाठी खूप पर्यटक लांबून येत असतात.

महाराष्ट्रातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे खाली आहेत,

१) अंबोली

 • अंबोली हे महाराष्ट्रातील प्रमुख पावसाळी स्थळे म्हणून ओळखले जातात .अबोली हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर आणि रमनिय ठिकाण आहे.
 • संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा अबोली या ठिकाणी पडतो. त्यामुळे या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी या नावाने ओळखले जाते .
 • अबोलीचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो .
 • त्याप्रमाणे अबोली येथील धबधबे पावसाळ्यात उंच अशा ठिकाणावरून खाली ओसंनडून वाहतात .त्यामुळे येथील सौंदर्य हे पाहण्यासारखे आहे.
 • पावसाळ्यात अबोली हा धबधबा येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतो.
अंबोली : महाराष्ट्रातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे

२) माथेरान

 माथेरान महाराष्ट्रातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे
 • माथेरान हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
 • माथेरान हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यात आहे .माथेरान या पठारावर घनदाट झाडी आणि लाल माती पाहायला मिळते.
 • पावसाळ्यामध्ये डोंगरावरून ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे हिरवागार निसर्ग आणि पावसाळी धुके हे पर्यटकांना आकर्षित करत असतात .
 • माथेरान चे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणच्या शारलोक तलाव हा तलाव ओव्हरलोड झाल्यावर चा धबधबा.
 • या धबधब्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटक येथे भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत असतो.

३) इगतपुरी

 • इगतपुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख पावसाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे. समुद्रपट्टीपासून इगतपुरी हे ठिकाण 1900 फुटावर आहे.
 • पावसाळा आणि थंडी तसेच उन्हाळ्यामध्ये या ठिकाणाची वातावरण उल्हासदायीक असते.
 • परंतु पावसाळ्यात खरे इगतपुरी चे सौंदर्य पर्यटकांना पाहण्यासारखे असते. इगतपुरी हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
 • या ठिकाणी कॅमल व्हॅली, घाटना देवी मंदिर असे ठिकाण आहे.
 • कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे इगतपुरी पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.

४) चिखलदरा

 • चिखलदरा हे महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाणांपैकी एक आहे .या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण हे नेहमीच थंड आणि आरोग्यदायी असते .
 • चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यात आहे .त्याचप्रमाणे चिखलदरा ला विदर्भाचे नंदनवन म्हणून पण ओळखले जाते.
 • पावसाळ्यात चिखलदऱ्याच्या पर्वतावरून ओसंडून वाहणारे धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करत असतात .
 • चिखलदरा या ठिकाणी तलाव ,सुंदर धबधबे, दर्शनीय स्थळे असे अनेक ठिकाने आहेत.

५) कळसुबाई शिखर

 • कळसुबाई शिखरे महाराष्ट्रातील प्रमुख पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
 • कळसुबाई शिखर महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून ट्रॅक साठी कळसुबाई उत्तम ठिकाण आहे.
 • पावसाळ्यात कळसुबाई हे संपूर्ण निसर्गमय वातावरणामुळे बहरून गेलेले असते .महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून आवर्जून अनेक पर्यटक या शिखराला भेट देण्यासाठी येतात.
 • कळसुबाई या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते.

संदर्भ

 1. महाराष्ट्रातील 10 पावसाळी पर्यटन स्थळे|Top 10 Monsoon Tourist Destination in Maharashtra|Tourism

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo