तर मित्रांनो ,आज आपण या लेखात पाहणार आहोत की भारताचे टॉप पाच हिल स्टेशन. येथे जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिल स्टेशनचं नाव ऐकल्यावरच आपल्या डोक्यात येथील वातावरण, सुंदरता ,मनोरंजन, आणि जेवण अशा गोष्टी येतात.
काही लोक हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या हिल स्टेशनला जातात .त्यांना हिल स्टेशनला जाणे आवडते .
खास करून उन्हाळा ऋतू चालू होतो तेव्हा .
उन्हाळा ऋतू लागतो तेव्हा हिल स्टेशन हे काही स्वर्गापेक्षा कमी नाही असे वाटते.तसेच पाहिले तर भारताच्या प्रत्येक शहरात जवळच कोणतं न कोणतं हिल स्टेशन आहेच.
तर आज असेच आपण काही हिल स्टेशन बद्दल माहिती पाहणार आहोत .त्यामुळे तुम्हाला जर या वर्षी बाहेर फिरायला जायचं असेल, तर जास्त मेहनत नाहि कराव लागणार .
भारताचे टॉप पाच हिल स्टेशन खालील प्रमाणे आहे,
१) मसूरी –
मसुरी हे उत्तराखंड राज्याच्या देहरादून पासून 35 कि .मी . लांब अंतरावर आहे.
मसुरी या हिल स्टेशन वरून शिवालिक पर्वत माला आणि डून घाटिया हे नजारे पाहायला मिळते.
या ठिकाणाचे नाव मसूरी हे मसूर नावाच्या झाडापासून ठेवले आहे. जे या भागात जास्त प्रमाणात बघायला मिळतात.
उन्हाळा ऋतूत येथील वातावरण खूप चांगले असते. आणि हिवाळ्यात तिथे बर्फ वारीची मजा पण घेऊ शकतात .
जर तुम्ही मसुरी येथे जाण्याचा विचार करत आहात. तर तेथील केमटी फाल,लाल डूने,ज्वाला देवी मंदिर आणि waterfalls, छ डी पाने धबधबा ये ठिकाणे जरूर बघा.
२)अल्मोडा –
अल्मोडाला भारताचे स्विझर्लंड पण म्हणतात. येथील बर्फाचे डोंगर ,रुई सारखा पांढरा बर्फ,हिरवी झाडे
,सुंदर धबधबे येथील सुंदर दृश्य हे या हिल स्टेशन चे वैशिष्ट्य आहे.ते अल्मोडा या हिल स्टेशनला चार चाँद लावीतेत.
येथे जाऊन तुम्ही तुमचा थकवाषणात विसरून जातान.
येथील नैना देवी मंदिर, ब्राईट आणि कॉर्नर छताई मंदिर,कतर्माल मंदिर,बिनसर आणि कोसी या जागा बघण्यासारखे आहेत.
जर तुम्हाला ट्रेकिंग करायला आवडते तर तुम्ही तिथे ट्रेकिंग करू शकतात.
३)माऊंट आबू –
माउंट अबू हे राजस्थान मधले एक हिल स्टेशन आहे. राजस्थानमध्ये एवढे एकच हिल स्टेशन आहे .
तिथे राजस्थान या राज्य मध्ये इतकी उष्णता असते. तर माउंट अबू हे एक ठिकाण आहे की तेथे उष्णता कमी असते.
आजच नाही तर काही वर्षांपूर्वी राजस्थानचे राजा महाराजा उष्णते मुळे खूप अस्वस्थ होत होते.
तर त्यांना चांगले वाटावे म्हणून ते पण माउंट आबू या हिल स्टेशनला येत होते.
झाडांनी विळखा घातलेला हे हिल स्टेशन आणि सुंदर डिझाईन केलेल्या मंदिरानी भरलेलं आहे.
राजस्थान मधील माउंट आबू ही जागा हिंदू धर्माच्या लोकांसाठी नाही तर जैन धर्माच्या लोकांसाठी पण खूप महत्त्वपूर्ण आहे .राजस्थानच्या संस्कृतीची झलक इथे खूप छान बघायला मिळते.
४) दार्जिलिंग –
पश्चिम बंगालमधील सिलिगुरी पासून 80 किलोमीटर लांब असणारे हे दार्जिलिंग हे हिल स्टेशन काही जादू पेक्षा कमी नाही.
दार्जिलिंगच्या सुंदरतेची जादू आहे,ज्या कारणाने येथे प्रत्येक ऋतूमध्ये गर्दी असते.
प्रत्येकाने एकदा का होईना दार्जिलिंगला जायला पाहिजे. येथील सुंदरताच नाहीतर तिथे उगवणारी चहा पत्ती पण पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
हे हिल स्टेशन इंग्रजांच्या काळातच विकसित झाले होते .जर तुम्ही इथे जाणार आहात ,तर टॉय ट्रेनची सवारी करायला विसरू नका.
५) मुंनार –
केरळ राज्याचे मुनार हे हिल स्टेशन भारतामध्येच नाहीतर विदेशामध्ये पण प्रसिद्ध आहे. हे हिल स्टेशन इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध आहे.
इंग्रजांच्या काळात हे त्यांचे ग्रीन रिसॉर्ट होते.
मुनार शब्द हे एक मलयलं शब्द आहे. मुनार शब्दाचा अर्थ असा आहे की तीन नद्यांचा संगम. मुनार हे मधुर पूजाह , नीलाथ्यानी आणि कुंडल्य ह्या तीन नद्या एकाच ठिकाणी मिळतात.
मुनार हिल स्टेशन हे आपल्या चांगल्या वातावरनाप्रमाने
इथे खूप लांब वर असलेले चाय पत्ती ची बाग ,छोट्या छोट्या नद्या आणि धबधब्यांसाठी पण प्रसिद्ध आहे.