बाळगुटी

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

बाळ वर्षाचे होईपर्यंत सर्व ऋतूना, बाहेरील हवामानाच्या प्रथमच सामोरे जात असते. अपचन ,पोट बिघडणे,कृमी – जंत,सर्दी,खोकला, ताप,दात येतानाचा त्रास अशा सर्वसाधारण तक्रारी असतात. घरच्या घरी किरकोळ तक्रारी दूर करून बाळाच्या अगी लागेल अशी योजना म्हणजे बाळगुटी.
बाळगुटी हा २० आयुर्वेदिक गुणकारी औषधीचा संच आहे.
दररोज प्रत्येक वनौषधी सहाणेवर उगाळून तो लेप एकत्र करून तो बाळाला चाटवावा. त्यालाच बाळगुटी असे नाव आहे .वर्षभरा पर्यंत दर महिन्याला १- १ वळसा वाढवावा .गरजेप्रमाणे त्यातील वनौषधी व वळसे कमी जास्त उगाळून दिले तरी चालते. बाळगुटी ला शेकडो वर्षांची परंपरा आहे.ती पूर्णपणे सुरक्षित आहे .

पोट साफ होत नसल्यास बाळगुटी

सर्वसाधारणता दररोज एकदा तरी बाळाचे पोट साफ होते.कधी – कधी मात्र २ – २ दिवस शौचास होत नाही,कधी – कधी खडा होतो बाळ शी करताना रेकते.
सकाळी व रात्री हिरडा,बाळ हिरडा,सुठ व ज्येष्ठमध एकत्र उगाळून द्यावे. बाळहिरडयाने शौचास साफ होते.सुंठीने पचन संस्था नियमित होते तर ज्येष्ठमधाने आतडी मऊ पडतात.बेंबीभोवती पोटाला हलक्या हाताने एरंडेल तेल चोळून लावल्याने पोट मऊ पडते.

बाळाला अपचन व पोटदुखी झाल्यास

अपचनामुळे गॅसेस होतात.त्याने बाळाला दर्प येतो,कळ येते,बाळ पाय पोटाशी घेऊन रडते,पाय झाडते. सागरगोटे,सुंठ ,अतिविष ,बाळहिरडा, व नागरमोथा,एकत्र करून सकाळ – संध्याकाळ चाटान द्यावे. सागरगोटा पाचक आहे,तो पोटदुखी कमी करतो, सुंठ पचन क्रिया सुधारते बाळहिरडा मल पाचक आहे,अतिविषाणे पोटातील विकार कमी होतात, नागरमोथा शामक आहे. पोट दुखत असल्यास सागरगोटे व हिंगाचा बेंबी भोवती लेप लावावा.काही झाल्यानंतर पाव चमचा ओव्यचा अर्क उकळून कोमट झालेल्या बोडळभर पाण्यातून द्यावा.

ज्येष्ठमध बाळगुटी
चिंचोका बाळगुटी
वेखंड बाळगुटी
हिरडा बाळगुटी

बाळाला जुलाब झाल्यास

बाळाचे पोट बिघडून सारखे शौचास होते. पातळ धार लागते,कळ येऊन जुलाब होतात,चिकट फेस येतो,बाळाचे पोट बिगडून काही खाल्ल तरी उलटी किंवा जुलाबतून पडते. कुडा,जायफळ,मुरुड शेग , जायफळ, अतीविष व नागरमोधा,एकत्र उगाळून सकाळ,दुपार, संध्याकाळ द्यावे. कुडा आव – जुळाबतून जंतू नष्ट करतो.जयफळणे जास्तीचे पाणी आळते व दुर्गंध कमी होतो. मुरुडशेंगेमुळे पोटात कळ येऊन जुलाब होण्याचे थांबते.मायफल स्तंभक आहे,त्याने जुलाबतील जास्तीचे पाणी आळते, अतिविष ने विषर नष्ट होते.सागर गोट्याचे पोटात धुकायचे थांबते. नागरमोथा शीतल व शामक आहे.त्याने हे सर्व उष्ण पडत नाही.
जुलाब,उलट्या होत असताना पाणी भरून निघून शक्ती टिकून रहावी यासाठी कपभर पाण्यात पाव कप डाळिंबाचा रस,४चमचे साखर,पाव चमचा मीठ किंवा या ऐवजी दाडिमावलेह दिवसभरात थोडे – थोडे पाजावे. काहीही खाल्यानंतर पोटात दुखून थोडी थोडी शी होते.अशी जुनाट तक्रार असल्यास काहीही खाल्यानंतर कुडा ताकत उगाळून द्यावा.

हळकुंड बाळगुटी
काकडशिंगी
जायफळ
डाळिंबाची-साल

जंत व कृमी झाल्यास

बाळाच्या शीच्या जागी खाजते,शितून जंत ,कृमी पडतात,अन्न अंगी लागत नाही. अश्यावेळेस तीव्र उपचार करावी लागतात.वेखंड, डीकेमाली , अतीविष,हिरडा,बाळ हिरडा,रात्री ओव्याच्या अर्कात उगाळून द्या . वेखंड, व डीकेमाली कृमी व जंत नष्ट करतात. अतीविष विषार कमी करते .हिरडा व बाळ हिरडा पोट साफ करतात.

बाळाला दात येताना

दात येताना दात शिवशिवतात , हिरड्या लाल होतात,बाळ रडते. डीकेमाली मधातून उगाळून लावावी.डीकेमाली ने हिरड्या आवलतात,पोटात वात धरत नाही. लाळेतून गिळली जाऊ द्यवी. दात येताना ज्या तक्रारी होतात,म्हणजे कृमी ,ताप त्यावर त्यानुसार गुटी द्यावी

पिंपळी
बेहडा
शतावरी
अतिविष

बाळाला ताप आल्यास

शरीराचे तापमान नेहमीपेक्षा वाढले की ताप आला असे म्हणतात. काही झाले असता किरकोळ ताप येणे हे नैसर्गिक असते. फार ताप वाढला तर मात्र उपचार करावा लागतो. अतीविष, काकडशिगी ,याला बाळ संजीवनी असे नाव आहे. त्याबरोबर सुंठ व पिंपळी दिल्याने सर्व प्रकारच्या तापत उपयोग होतो. अतिविषने विषार कमी होतो, नागर मोधा थंड आहे,तो उष्णता कमी करतो. काकड शिगी कफ नाशक आहे.पिपली उत्तेजक आहे,त्याने स्त्राव पाझरतात ,ती घामही आणते.सुंठीचे पचन संस्था नियमित होते.

बाळाला अलर्जी झाल्यास

बाळ नव्यानेच सर्व गोष्टीना सामोरे जात असते.पोटातून काही गेल्याने , किंवा बाहेरून कसलीही ॲलर्जी होऊ शकते. अंगावर पित्त उठते,खाज सुटते,पुरळ येतात. नगारमोध व हळकुंड उगाळून ३ – ४ वेळा चाटण द्यावे. नागरमोथ हे थंड व शामक आहे ,हळद रक्त शुध्दकरते.ॲलर्जी झाल्यावर ज्या इतर तक्रारी होतात त्यावर त्यानुसार उपचार करावेत.

कुडा
डिकेमाली
नागरमोथा
बाल-हिरडा

बाळ घसा धरते तेव्हा बाळगुटी

घसा सुजतो,लाल होतो,आवाज बसतो,आग – आग होते, अन्न गिळायला त्रास होतो.पडजिभ वाढते, खाकरा येतो. वेखंड,हळकुंड, बेहेडा,जेष्ठ मध व काकडशिगीचे मधातून चाटण करून सकाळ – संध्याकाळ चाटवावे. वेखंड ने घश्याची सूज कमी होते,हळद ही जंतू नाशक आहे.त्याने वाढलेली पडजीभ ही कमी होते.काकडशिंगी व बेहेडयाने चिकटा कमी होतो. जेष्ठमध हे थंड आहे त्यामुळे घश्याचे लाल होणे,आग – आग होणे हा त्रास कमी होतो.

कोरडा खोकला साठी बाळगुटी

जास्त करून रात्री खोकला येतो.कफ पडत नाही.आवाजच जास्त येतो.रात्री किंवा कोरडा खोकला येताना बेहडा व जेष्ठ मधाचे चाटण मधातून चाटवावे.
जेष्ठमध वंगणा प्रमाने काम करून मुरलेला कफ बाहेर काढते व घशाला स्नेह लेप देते.बेहडा नवीन कफ निर्माण होऊ देत नाही.

मुरुडशेंग
वेखंड
हिरडा
अश्वगंधा

सर्दी व पडणारा खोकला

सर्दी, नाक वहाते ,डोके जड होते,छाती भरून येते,खोकताना कफाचा आवाज येतो. सुंठ,पिंपळी ,वेखड, जेष्ठमध,काकडशीगी मधातून सकाळ ,दुपार,संध्याकाळ चाटवावे. सुंठ व पिंपळी ने उत्तजना मिळून छातीत, सर्दीच्या सायनस पोकल्यात साठलेला कफ बाहेर पडतो.वेखंडणे सायनस पोकळीतून सूज कमी होतो,काकडशीगी ने सर्दी,कफ आळतो. बाहेरच्या दुधाने कफ वाढतो,तरीही पाजावे त लागले तर हळद व सुंठ घालून कीव सितोपलादी चूर्ण घालून गरम पाजावे.
फडके गरम करून छाती, पाठ नाक,सायनस येथे शेकावे. वेखंड ची पूड तेथे चोळवी.

खारीक
बदाम
सुंठ
सागरगोटा

दररोजची बाळगुटी

बाळाला वर्षभर पर्यंत कफ ,कृमी व पोटाच्या तक्रारी शी सामना करावा लागतो. रोगप्रतिबंध व शक्तिवर्धक म्हणून खरे तर पूर्वी या सर्वच २० वनौषधी उगाळून देत.पण हल्ली थोडक्यात तेवढाच गुण येणारी मिनी गुटी हवी असते.खारीक,बदाम , जेष्ठमध ,वेखंड,बळी हिरडा,अश्वगंधा ,सुंठ, अतीविष ,हळकुंड,ह्या ९ वनौषधी दुधातू न किवा पाण्यातून सकाळी चाटवाव्यात. खारीक,बदामने आवश्यक ते पोषण मूल्य मिळते. अश्वगंधा ने हाडे मजबूत होतात. जेष्ठमध कफा वर तर सुंठ पचनासाठी चागलं टॉनिक आहे.अतिविषणे विषार कमी होतात.हळकुंड रक्त शुद्ध करते व जंतुनाशक आहे. दूध पचाललाही ते उपयोगी पडते.वेखंडा ने कृमी नष्ट होतात.बाळ हिरड्या ने मल शुद्ध होते.

संदर्भ :

१ . बाळगुटीचे प्रॉडक्ट manual.

२ . ग्रीन pharmacy ची वेबसाइट

३ . बाळगुटी वेबसाइट

आमचे इतर लेख :

Author: maymarathi

1 thought on “बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

  1. I am really loving the theme/design of your weblog. Do you ever run into any internet browser compatibility
    issues? A number of my blog audience have complained about my site not working correctly in Explorer but
    looks great in Chrome. Do you have any solutions to help fix this problem?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *