बंगालच्या मिठाई मासे व त्यांच्या बंगालची पाककृती अत्यंत प्रसिद्ध आहे. तसेच त्यांच्या शाकाहारी पदार्थ तेवढेच लोकप्रिय आहेत .वांगी फ्लावर ,लाल भोपळा ,यासारख्या भाज्या त्या देखील केळफूल, फणस वापरतात
भाज्यांचे प्रकार.
बंगालची पाककृती परतलेले वांगे
साहित्य-
- लहान काटेरी वांगी सात ते आठ
- चार पाच कांदे किसून,
- टोमॅटो बारीक चिरून
- मीठ,
- तिखट दीड चमचा
- तेल तीन-चार चमचे
- हिंग
- मोहरी,
- जिरे
- हळद.

कृती –
- सर्वात आधी वांगी धुवा. व ते पुसून घ्या. त्याच्या चार फाका करा .
- मिठाच्या पाण्यात ठेवा. टोमॅटो खूप बारीक चीरा .कढईत तेल टाका.
- त्यात वांगी तळा. कढईतील वांगी काढून बाजूला ठेवा .
- उरलेल्या तेलात हिंग, मोहरी, जिरे टाका. ते तडतडल्यावर कांदा टाका. त्याला परतून घ्या.
- व नंतर तेल सुटले की टोमॅटो टाका .त्या सगळ्या मिश्रणाला परतून घ्या .नंतर त्यात वांगी टाका मीठ टाका. मंद आचेवर शिजवा.
कच्चा केळ्याची भाजी.
साहित्य-
- दोन कच्ची केली
- .एक मध्यम बटाटा
- , सुके पिवळे चणे
- , भिजवून वाटीभर हरभरे
- ,आले अर्धा इंचाचा तुकडा
- .दोन-तीन हिरव्या मिरच्या
- ,दोन मोठे टोमॅटो,
- एक तमालपत्रे,
- गरम मसाला
- ,पूर्ण अर्धा चमचा मीठ तिखट
- , चिमूटभर साखर
- ,दोन चिमटी,
- तूप,
- एक चमचा तेल.

कृती-
- जिरे व आले बारीक वाटा .हरभरे उकडून घ्या .
- बटाटा ,केळाची साले काढा .त्याचे तुकडे करा.
- दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करा .त्यात तेच पत्ता व पाच फोडन टाका .
- फोडणी उडली की त्यामध्ये भाजीचे तुकडे टाका. लालसर परता.
- मीठ ,साखर, वाटलेला मसाला ,टोमॅटो बारीक चिरून यात टाका .
- कोरडे होईपर्यंत शिजवा .झाकणाच्या वर पाणी घाला .व त्याच्या वाफेवर शिजवा वरून तूप सोडा.
आलू दम
साहित्य-
- लहान लहान व गोल बटाटे उकडून व साले काढून अडीचशे ग्रॅम घ्या.
- जिरे एक टीस्पून ,
- धने एक टीस्पून,
- लाल सुक्या मिरच्या दोन-तीन ,
- गरम मसाला दोन टीस्पून ,
- आले अर्धा इंचाचा तुकडा.
- मीठ चिमटीभर ,
- साखर एक दोन तमालपत्रे ,
- टोमॅटो लाल दोन तीन बारीक चिरून ,
- तळणीस तेल,
- फोडणीस एक शिक भरून टि स्पून,
- हळद,
- दोन-तीन कांदे किसून.

कृती –
- आले, जिरे ,धने व मिरच्या बारीक वाटा .कढईतील गरम करा.
- त्यात बटाटे लालसर तळून घ्या .तेल काढा .कढईत तूप टाका.
- त्यात तेच पत्ता जिरे टाका .जिरे उडाल्यावर त्यात कांदा टाका. लाल परता.
- तेल सुटले की टोमॅटो टाका .त्या मिश्रणाला परता रस व तेल सुटू द्या .बटाटे टाका चांगले परता.
- वाटलेला मसाला साखर मीठ टाका.
परत रस्सा पातळ करण्यासाठी यामध्ये थोडे पाणी टाका. - उकळी फुटू द्या. मग त्यामध्ये गरम मसाला टाका. ते हलवून घ्या. बटाटे फुटून देता भाजी करा.
संदर्भ
.1 अनमोल प्रकाशन प्रांतोप्रांतीचे पदार्थ