१२मे ला गांधीनगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना या योजेअंतर्गत घराच्या गृहप्रवेशासाठी PM नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
आत्ताच्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गांधीनगर, गुजरात मध्ये १८,९९७ पेक्षा अधिक लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळून दिला आहे. त्यांनी ही माहिती एका कार्यक्रमात दिली.
प्रधानमंत्री यांनी 12 मे 2023 ला एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याच दिवशी PM नरेंद्र मोदी यांनी या योजनानुसार गुजरातच्या ग्रामीण भाग किंवा शहरी भागातील तयार झालेल्या एकूण १९,११३ घराचे उद्घाटन केले श्री नरेंद्र मोदी यांनी PMAY नुसार ४,३३१पेक्षा अधिक घरांच्या निर्माण करण्याच्या हेतूने ग्राउंड बेकिंग समारोह पण केला.
प्रधानमंत्री आवास योजना ची (PMAY) माहिती-
२०१५ ला चालू झाली प्रधानमंत्री आवास योजना भारत सरकारची एक योजना आहे. त्याचे लक्ष प्रत्येक गरीब लोकांना कमी किमतीत घर उपलब्ध करून देणे आहे.PMAY चे लक्ष 31 मार्च २०२२ पर्यंत कमी किमतीत जवळपास २० मिलियन घरांचे निर्माण केले आहेत .प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण वर्ष २०२४ पर्यंत वाढवले आहेत. सुरक्षित घराचे एकूण लक्ष पण शोधून काढले आहेत आणि ते २.९५ घर एवढे आहेत.
PMAY योजनेचे लाभ (PMAY benefits )-
शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची मागणी मध्ये वाढ केलेली आहे .या योजनेचा लाभ म्हणजे शहरी भागात असलेल्या झोपडपट्टी कमी करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या योजनेचे सुरुवात केली आहे.
१) प्रायव्हेट डेव्हलपर्सच्या मदतीने झोपडीचे पुनर्वास करणे. २)क्रेडिट लिंक सबसिडी योजनानुसार जे गरीब माणसासाठी चांगले घर बनविणे. ३)सार्वजनिक आणि प्रायव्हेट भागात चांगले घराचे निर्माण करणे.
४)व्यक्तिगत घरांच्या निर्माण साठी सबसिडी प्रदान करणे.
PMAY योजनेचे २०२४ चे लाभार्थी –
प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या लाभार्थी खालील प्रमाणे आहेत,
१) मध्यम वर्गातील लोक (MIG I)ज्यांची वार्षिक उत्पन्न ६ ते १२ लाख रुपयांच्या मध्ये आहे .
२)मध्यम वर्गातले लोक (MIG II) यांची वार्षिक उत्पन्न बारा ते अठरा लाख रुपयांच्या मध्ये आहे.
३) कमी उत्पन्नामधील लोक (LIGS) ज्यांची वार्षिक उत्पन्न ३ते ६ लाख रुपयांमध्ये आहे.
४) आर्थिक रूपात गरीब असणारे लोक (EWS)ज्यांची वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आहे.
तसेच LIG आणि MIG चे लाभार्थी फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या क्रेडिट लिंक सबसिडी योजना चे पात्र आहेत.
EWS चे लाभार्थी यामध्ये पात्र आहेत. या योजनेनुसार LIG या EWS प्रावेदनला उत्पन्नाचा दाखला देणे महत्त्वाचे आहे.
सरकारने ही योजना 3 टप्प्यात विभागली आहे-
- पहिला टप्पा एप्रिल 2015 मध्ये सुरू झाला आणि मार्च 2017 मध्ये संपला, ज्याअंतर्गत 100 हून अधिक शहरांमध्ये घरे बांधण्यात आली आहेत.
- दुसरा टप्पा एप्रिल 2017 पासून सुरू झाला आहे, जो मार्च 2019 मध्ये पूर्ण होईल. यामध्ये सरकारने 200 हून अधिक शहरांमध्ये घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- तिसरा टप्पा एप्रिल 2019 मध्ये सुरू होईल आणि मार्च 2022 मध्ये पूर्ण होईल, ज्यामध्ये उर्वरित लक्ष्य पूर्ण केले जाईल.