Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध असे तीन ऋतू आहेत.
१)उन्हाळा
२)पावसाळा
३)हिवाळा.
उन्हाळा संपला आता पावसाळा चालू झाला आहे.मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. रिमझिम पाऊस पडतो.पावसात भिजत बसायला.एकमेकाच्या अगावर पावसाचे पाणी उडवायला खूप आनंद होतो. पावसाळ्यात पडणाऱ्या गवतावरचे पाणी.पाऊस पडला की झाडांना वेलीना पालवी फुटते.आणि सगळीकडे हिरवळ पसरते..
“पावसाळा”
कवीच्या शब्दांना धार देणारे ताल देणारा ,थेबाथेंबातून उसळणाऱ्या शब्दाशब्दातून व्यक्त होणारा, हिरव्या रानवणातून सुगंधाची गीत बरसणारा ,धरणीची तू समवणारा,सृष्टीला नटवणारा , पाना- पानातून , फुला – फुलातून सुवसाची बरसात करणारा,मृगाच्या तृशर्त धाराणी भिजून टाकणारा असा हा पाऊस.

पावसाचा शेतीसाठी कसा फायदा होतो?

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शती पावसावर अवलंबून आहे, शेतकऱ्यांसाठी पाऊस हा खूप महत्वाचा आहे. पाऊस झाला तर शेती पिकावता येते.
शेतकरी शेतात कष्ट करतात.शेती पिकवतत.म्हणून आपण अन्न खाऊ शकतो. म्हणून पाणी हेव शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळा हया ऋतूत बरेच जण खूप उष्णतेने त्रासले जातात.त्यामुळे पाऊस आला की सगळ्यांना खूप आनंद होतो .
उन्हाच्या अती उष्णतेने पावसाळा सगळ्यांच्या जीवनात नवीन आशा आणि उस्ताह घेऊन येतो.या काळात निसर्गाचे सौदर्य अतिशय मनमोहक असते.
पावसामुळे नदी,नाले ,विहिरी,तलाव आणि इतर सर्व पाण्याचे स्रोत भरलेले असतात.त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो. भारतात पावसाळा हा ऋतू जून पासून सप्टेंबर पर्यात असतो. म्हणजे आषाढ,श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात असतो.

पावसाळा सृष्टीत बहरलेले नैसर्गिक सौदर्य

पावसाळा आला की निसर्ग आपले सौदर्य दाखवण्यात सुरवात करतो. निसर्गाचे हे रूप पाहून मन प्रसन्न होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.निसर्गावर हिरव्या मखमली गवताची चादर पसरवणाऱ्या आणि वातावरणात शीतलता घेऊन येणारा पावसाळा तर सर्वांनाच आवडतो.

पावसाळ्यातील लहान मुलांचा आनंद

पावसाळ्यात लहान मुलांच्या आनंदाला तर सीमाच नसते . लहान मुले कागदाच्या होड्या बनून पाण्यात सोडतात आणि पावसाच्या पाण्यात उड्या मारतात.हे एक रमणीय दृश्य असते.

पावसाळ्यातील नुकसान व उपाय

पावसामुळे कधी कधी खूप नुकसान होते. तसे पाहिले तर या नुकसान होते त्याला कारण माणूसच आहे. ज्याप्रकारे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. प्रकृतीचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे आपण निसर्गाला जपायला शिकलो पाहिजे . “तरच हा पाऊस आपल्यासाठी आनंदाचा पाऊस ठरेल”.

संक्षिप्त स्वरूपात

  1. पाऊस हा एक निश्चित वरदान आहे.
  2. ते आपल्या निसर्गात सौंदर्य वाढवते.
  3. सर्व काही उत्कृष्ट आणि भव्य दिसते.
  4. पाऊस हा आपला स्वभाव बदलणारा घटक आहे.
  5. पावसाळा हा सुंदर आणि आवडीचा ऋतू आहे.
  6. तो उन्हाळ्यानंतर लगेच येतो, याला मान्सून पावसाळा म्हणूनही ओळखले जाते.
  7. या ऋतूत पाऊस येतो जो प्रदूषणाच्या भयंकर पकडीतून आपले पर्यावरण स्वच्छ करतो.
  8. या ऋतूत पावसामुळे नद्या, तलाव, तलाव भरतात आणि नदीच्या प्रवाहाची पातळीही वाढते, त्यामुळे सर्व स्त्रोतांना पुरेसे पाणी मिळते.
  9. या ऋतूला प्रजनन ऋतू असेही म्हणतात.
  10. दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे, पूर येऊ शकतो, ज्यामुळे प्रभावित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचे आणि जीवनाचे बरेच नुकसान होते.

संदर्भ

१ . विकिपीडिया मुक्त ज्ञान कोश
२ . रायगड जिल्हा सरकारी संकेत स्थळ

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo