पाच बोधकथा

पाच बोधकथा.

आपल्या जीवनात खूप कठीण काळ येतो. पण या काळात खचून न जाता आपण आपले चागले विचार ठेवावे व हिमतीने आलेल्या काळाचा सामना करावा. बोधकथा यासाठी प्रेरणा देतात. तर आजच्या या लेखात आपण अश्याच काही गोष्टी पाहणार आहोत. जर तुंम्हाला आमचा लेख आवडला तर नक्की सांगा.

बोधकथा १ : जबाबदारी

लालबहादूर शास्त्री दीड वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांच्या संगोपन नंतर आजोळी झाले. एकदा शास्त्रीच्या हातून लहानपणी काच फुटली .मामी खूप रागावली. तर मामा म्हणाले, “कशाला रागवतेस ? त्याला वडील नाहीत. ही दयेची भावना शास्त्रीच्या मनात घर करून राहिली.
पुढे एकदा शास्त्री व त्यांचे काही सवंगडी परवानगी न घेताय का आमराईत आंबे तोडत होते. इतक्यात रखवालदारा धावत आला. बाकी सगळे भिंतीवरून उडी मारून पळून गेले. शास्त्री नेमके रखवालदाराच्या हातात सापडले.
” का रे चोरी करतोस काय ?सांगू का तुझ्या वडिलांना?” रखवालदाराने दम दिला.
” मला सोडून द्या हो .मला वडील नाहीत. शास्त्री गयावया करत सांगू लागले.
” वडील नाहीत! मग तर तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आईचे पोट नंतर तू असे चोरी करून भरणार काय?” वडिलांच्या नावाला असा कलंक लावणार काय ?”रखवालदाराने प्रश्नांचा भडीमार केला.

त्यांना आपली चूक कळली. त्यांनी जीवनभर प्रामाणिकपणे वजबाबदारीने वागण्याचा विचार केला .

तात्पर्य – संकट काळी पण सद्गुण सोडता कामा नये .

बोधकथा २ : विनम्रता-

एक अमेरिकी प्रवासी स्वीडन मध्ये बस मधून प्रवास करत होता. बोलता बोलता त्याची शेजारच्या प्रवाशाची ओळख झाली. आपल्या देशातील लोकशाही बद्दल तो सांगू लागला. “आमच्याकडे लोकशाहीची मुळे अगदी खोलवर रुजली आहेत. तुम्हाला एखाद्या दिवशी फोन येईल .ओळखा पाहू कोण बोलत असेल तुमच्याशी? खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष!”
त्यावर तो स्वीडीश प्रवासी अमेरिकन माणसाला म्हणाला, अहो हे तर काहीच नाही स्वीडनमध्ये बस म्हणून प्रवास करताना शेजारच्या माणसा बरोबर गप्पा मारत असताना. तो एखाद्या वेळेस त्या देशाचा राजा सुद्धा असेल .”इतक्या त्याचा उतरण्याचा स्टॉप आला म्हणून तो निघून गेला .
अमेरिकन प्रवाशांना नंतर कळले की , त्याच्या शेजारी बसलेले खुद्द राज्य साहेब बस होते .
तात्पर्य – खरे मोठे लोक नेहमी विनम्र असतात.

बोधकथा ३ : परोपकार-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन वाईट हाऊस मध्ये जाण्यासाठी आपल्या घरून निघाले.

वाटेत त्यांनी एक डुक्कर चिखलात फसलेले पाहिले. ते जितकं त्यातून ,बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तितकं ते अधिकच त्यात चाललं होतं. त्याची तिथे अवस्था अब्राहम लिंक कमला असह्य झाली.

हे तशाच पोषकात चिखलात थोडे गेले व त्यांनी त्यात त्या खड्ड्यातून बाहेर काढलं. या प्रयत्नात त्यांच्या कपड्यावर बराच चिखल उडाला. सेनेट ची सभेची वेळ जर झाली होती.

त्यामुळे घरी कपडे बदलण्यासाठी प्रयत्न जातात ते तसेच पार्लमेंट मध्ये गेले .लोकांना व सदस्यांना वरील प्रकार जो तो त्यांच्या स्तुती करू लागला.

ही स्तुती ऐकल्यावर लिंकन म्हणाले ,”आपण सर्वजण माझी विनाकारण स्तुती करत आहात .मी डुकराला बाहेर काढले त्याचे कारण मला त्याचीच तशी स्थिती पाहून जे दुखवत होते ते नाहीसे करायचे होते .तेव्हा माझा तो स्वार्थ होता माझ्या मनात परमार्थ हा विचार पण नव्हता .

तात्पर्य – पारंपारी माणूस निरअहंकारी असला पाहिजे .

बोधकथा ४ : सहिष्णुता –

संत कबीर कडे एकदा एक तरुण एक समस्या घेऊन आला .त्याची समस्या होती संसार सुखी होण्याबद्दलची .तो व त्याची पत्नी यांचे सदैव भांडण होत असे. दोघांचे दोघांचेही स्वभाव रागीट होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात सदैव दुस चालू असायची. संसारात सुख शांती कशी मिळेल हा त्यांचा प्रश्न होता .
कबीर म्हणाला ,”थांब तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो .”त्याने आपल्या बायकोला हाक मारली व घरातून दिवा लावून अनवयास सांगितला. दिवसाढवळ्या दिव्याची गरज काय ?असे तिने विचारले सुद्धा नाही .
थोड्या वेळाने पत्नीने दोघांना दूध आणून दिले. दूध पीत असतानाच पत्नीने विचारली,” साखर कमी नाही ना झाली ?”कबीर ने उत्तर दिले ,मध्यभागी ठीक आहे.” त्यातून विचित्र उत्तर ऐकून हसू आले.

आपल्याला कबीर काय कपाळ मार्गदर्शन करणारा असा विचार त्याच्या मनात आला .तरी त्याने परत आपला प्रश्न विचारला. कबीर म्हणाले, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .”ते कसे ?”तरुणाने विचारले “.कबीराने त्याबद्दल सागितले .

संसारत सहनसिलता हवी .दिवसा दिवा कशाला ?हा प्रश्न पत्नीने विचारला नाही .दुधात साखर न पडता मीठ पडले होते तरीही मी काहिच बोललो नाही .

तात्पर्य – संसारत सहनसिलता असेल तरच घराचा स्वर्ग बनतो .

बोधकथा ५ : विश्वास-

फॅक्स हा इंग्लंड मधील प्रसिद्ध वक्ता होता. त्याने एका सावकाराकडून प्रॉमिसरी नोट लिहून कर्ज घेतले होते.

कर्ज फेडण्याची मुदत संपली. तेव्हा सुरू करण्यासाठी सावकार फॅक्स कडे गेला . मोहरा मोजत होता. “तुझ्याजवळ पैसा आहे .मग तू कर्ज का फेडत नाहीस? विनाकारण व्याज का वाढवतोयस? तगादा मागे लावून घेणे तुझ्यासारख्याला शोभत नाही .” सावकार म्हणाला.
हे द्रव्य मी आज शेरेदीनला देणार आहे .त्याने काही कागदपत्र लिहून न घेता ,केवळ शब्दावर विश्वास ठेवून मला पैसे दिले. त्याच्या विश्वासाला मी जागलेच पाहिजे.

प्रथम मी त्याचे कर्ज चुकते करी, मग तुमचे. तुझ्याजवळ तर मी प्रॉमिसरी नोट लिहून ठेवली आहे.” फॅक्स एकदम सांगत झाला.
“तसे असेल तर मी दस्तऐवज लिहून घेऊन चूक केली. हे बघ आता ते फाडून टाकतो. आता तर मी सुद्धा या रकमेचा हकदार झालो.”

असे मला सहकार्य खरोखरच ते दस्तावेज फाढून टाकले . त्याचा विश्वास पाहून चकित झाला .

तात्पर्य – विश्वास हि एक अपूर्व शक्ती आहे .
अश्या या पाच गोष्टी आपल्याला शिकवतात की आपण कसे वागावे.

संदर्भ :

  1. कथामृत पुस्तक लेखक हेमंत गोखले..
  2. विकिपीडिया

आमचे इतर लेख

Author: maymarathi