नवजात बाळाचा आहार : पहिलं बाळ असेल तर प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या आहाराची चिंता असते.आई होण्याचा आनंद तर असतोच पण एक भीतीही मनात असते .आई होण हा प्रत्येक महिलेसाठी सुखद असा अनुभव आहे.पहिल्यांदा आई होत असताना बाळाची काळजी लागून राहते.बाळाचा आहार हा खूप महत्वाचा आहे.कारण यावर बाळाचा विकास होणार असतो.बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी त्याला पोषक आहार देणे अतिशय गरजेचे आहे.
तर आपण पाहू की बाळाला कसा व कोणता आहार द्यावा ?

नवजात बाळाचा आहार पहिले ६ महीने .

पहिले ६ महीने तर बाळाला डॉक्टर फक्त आणि फक्त आईचे दूधच द्यायला सांगतात. परंतु या बाबतीत जर बाळाची तब्येत सामान्य, नसेल तर डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही अजून खात्री करू शकतात , काही वेळेस डॉक्टर काही औषधे सुचवतात. ती त्यांच्या निर्देशनानुसार घेणे गरजेचे असते.

केवळ स्तनपान करणा-या बाळांना अतिसार आणि न्यूमोनिया यांसारख्या आजारांचा धोका कमी असतो. हे दोन्ही आजार पाच वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. केवळ स्तनपान करणा-या बाळाच्या तुलनेत , स्तनपान न केलेले बाळ बरे झाले आहे. , अनेक कारणांमुळे मृत्यूची शक्यता 14 पट जास्त असते .

६ महिन्याच्या बाळाला काय आहार द्यावा?

सहा महिन्यांनंतर , बाळांना आईच्या दुधासह पूरक आहाराची आवश्यकता असते , जेणेकरून ते मजबूत होतात आणि पूर्ण विकसित होतात. जलद वाढ आणि विकासाच्या या वयाच्या काळात, आईचे दूध बाळांना सर्व आवश्यक पोषण पुरवत नाही.

तथापि , आईचे दूध हे आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांच्या अर्भकांसाठी पोषक तत्वांचा सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे. म्हणून , पूरक आहाराबरोबरच , किमान दोन वर्षे वयापर्यंत स्तनपान चालू ठेवण्याचा सल्ला दिला जातो . सर्वात योग्य पूरक अन्न म्हणजे घन , अर्ध-घन किंवा मऊ पदार्थ , जे सहा महिन्यांनंतर आईच्या दुधासह बाळांना दिले जातात.


६ महिने पुर्णे झाल्यावर बालकाला २ते३ चमचे मऊ,कुस्करले अन्नपदार्थ दिवसातून २ते३वेळा भरवा.
एकावेळी एकच नवीन पदार्थ थोड्या प्रमाणात भरवा,जेसे कुस्करेल्या भाज्या ,फळे,डाळ आणि धान्य.
हळूहळू पदार्थाचे प्रमाण वाढवा.
लोहाचे ड्रॉप कीवा सिरप पाजवा त्यामुळे बाळाच्या शरीरातील लोहाचा साठा राखला जाईल तसेच त्याचा शारीरिक विकास होईन.

६ महिन्याच्या  नवजात बाळाचा आहार ?

६ ते ९ महिन्याच्या बाळाला कोणता आहार द्यावा?

स्तनपान देणे चालू ठेवा.
कुस्करले ल्या पदार्थाचा घट्टपणा वाडवा आणि दिवसातून ३ते४वेळा द्या.
दिवसातून ३ते४ वेळा हा आहार द्या.
पदार्थाचे प्रमाण आणि वेविध्य वाढवा.
एकाचवेळी एक नवा पदार्थ सुरू करा, जसे खिचडी.

नवजात बाळाचा आहार तयार करताना.

बाळाच्या जेवणामध्ये कमीत कमी ४प्रकारच्या अन्नपदार्थांचे समावेश करा.
१)धान्य.
२)हिरव्या पालेभाज्या आणि फळे.
३)तेल व तूप.
४)घोटलेली डाळ ,मासे, अंडे. (पूर्णपणे उकडलेली)

९ ते १२ महिन्याच्या बाळाला कोणता आहार द्यावा?

स्तनपान देणे चालू ठेवा.
९महिने पूर्ण झाल्यावर दिवसातून ३ते४वेळा किमान अर्धी वाटी पदार्थ द्या जे चावून खाता येईल.
बालकाला त्यांचा अगठा व बोटे वापरून उचलता येतील असे बारीक चिरलेले पदार्थ द्या.बालकाला स्वतः चया हातानी खाण्याची अनुमती द्या जरी जेवण बरबतून ठेवले तरि चालेल.
बालकाची दृष्टी सुधारावी यासाठी त्यांला “अ” जीवनसत्वाच्या सिरप द्या.
सामान्य सूचना.
जेवण बनवण्यापूर्वी आणि बालकाला भरवण्यापूर्वी हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
जेवणामध्ये अडी असेल तर ती पूर्णपणे उकडलेली आहे की नाही त्याची खात्री करून घ्या.
कच्ची फळे व भाज्या शिजण्यापूर्वी वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवा.
जेवण व्यवस्थित शिजवा,स्वच्छ पाण्याचा वापर करा,बालकाच्या ताटा तील उरलेले अन्न त्याला पुन्हा खाण्यास देऊ नका.
जेवणामध्ये केवळ आयोडीन युक्त मिठाचा वापर करा.
आयोडींमुळे बालकाचा बुध्दीचा विकास होतो.

आमचे नवजात बालकांच्या विषयी इतर लेख इथे वाचा .

संदर्भ :

  • unisef जागतिक संस्था यांची वेबसाइट
  • महिला व बाळविकस मंत्रालय महाराष्ट्र शासन यांची वेब साईट