आता अधिक मास महिना सुरू झाला आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जातो .किंवा धोंड्याचा महिना म्हणून पण ओळखला जातो.धोंड्याच्या महिन्यात जावयाला काय द्यावे विचार सगळ्यांना पडतो . हा महिना भगवान विष्णूच्या आमलाखाली आहे या महिन्यात तुम्ही कुठलेही काम करा ते चांगले होईल .आणि जेवढे पाप तुमच्याकडून होईल तेवढे नुकसान पण होईल.
हा महिना भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी चांगला मानला जातो .तुमच कर्म जर चांगले असेल तर तुमच्या सर्व काम पूर्ण होतील .पण तुमचे कर्म चांगले नसेल तर कोणतेच काम होणार नाही.
धोंड्याच्या महिन्यात जावयाला काय द्यावे. अधिक मासात आपण जावयाला अधिक प्राधान्य देतो. प्रत्येक मुलीचा जोडा हा लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो. आणि जावयाला पण नारायण स्वरूप समजतो .
या काळात जर आपण आपल्या जावयाचा मानपान केला .आपण आपल्या जावयाला सोन्या चांदीच्या भेटवस्तू देतो .आणि जावई पण आपल्या सासू-सासऱ्यांना आई-वडिलाप्रमाणे मानत असतो. सासु सासरे आपल्या जावयाला मुलाप्रमाणे वागवतात . त्यांचा आदर तीथ करतात. त्यांचा मानसन्मान करतात आपली मुलगी लग्न करून दुसऱ्या घरात जाते .
आणि आपल्या मुलीला जावई सांभाळतो .कधी कधी भांडणे ,कटूपणा येतो पण हे सगळे विसरून सासू-सासरे हे आपल्या जावयाचा मान सन्मान करतात.
जावयाचा मान सन्मान कसा करावा –
धोंड्याच्या महिन्यात जावयाला काय द्यावे?तर प्रत्येक वेळी जावयाला चांदीच्या वस्तू किंवा सोन्याच्या वस्तू दिल्यास पाहिजे असे नाही. ही फक्त एक हाऊस असते .की आज असं आहे लोकांचं की मला माझ्या जावयाला सोन्याची वस्तू द्यायची. जावयाला आपण विष्णूच्या रूपाने दान करत असतो .
अधिक मासात जर आपण जावयाला एखादं वान दान दिलं तर ते भगवान विष्णूला जात असे म्हटले जाते. असे म्हणतात की ज्या वस्तूला होल पडलेले आहे त्या वस्तू दान करत असतात .आपण ३३ गोष्टी दान करतो म्हणजे बताशे ,अनारसे किंवा खारका दान करतो. प्रत्येक वर्षी सर्व सामान्य माणसाने सोन्याच्या वस्तू दान करावे असं काही नाही .
जावयाला कोणत्या वस्तू दान करायच्या आहे –
मुलीचं लग्न होतं तेव्हा आपण देव देतो ,लग्नात अन्नपूर्णा माता देतो, दान करायचं असेल तर एखाद्या धातूचा दान करा. तुम्ही स्टीलच्या वस्तू दान करू शकतात .तांब्याच्या वस्तू दान करू शकतात. ज्यांना हाऊस आहे ते सोन्या-चांदीच्या वस्तू दान करू शकतात .
पण त्याच्याबरोबर तांब्याचे पण दान करा या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, ती तांब्याची वस्तू. तुम्ही तांब्याची वस्तू निरंजन, तांब्याचा लोटा दान करू शकतात . तांब्याचे ताट पण दान करू शकतात. सर्वसामान्य लोकांना दान करायचे तर तांब्याचा दिवा दान करा.आपण तेथील व तसेच अनारसे अशा ते 33 वस्तू दान करतो कारण अधिक मास महिना ते 33महिने नि येतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी तांब्याचे देव रंगनाथ बाळकृष्ण हे पण दान करू शकतात .
कुठल्याही प्रकारचे देव तुम्ही आपल्या मुलीला दान करू शकतात. सोन्या चांदी दान करणे हे श्रेष्ठ नाही ,तर तांब्याचे वस्तू दान करणे सर्वश्रेष्ठ आहे. कुठलीही वस्तू दान केली तर ती देवापर्यंत जाते. तुम्ही आता चांगल्या मनाने दान करा. जर आपण आपल्या आई-वडिलांच्या
मान सन्मान करतो तर आपणही आपल्या सासू-सासऱ्यांचा मान सन्मान केला पाहिजे.
तर तुम्हाला समजले असेल कि धोंड्याच्या महिन्यात जावयाला काय द्यावे.संदर्भ
.1अधिक मासात जावयाला सोन्या चांदी पेक्षा पण मौल्यवान वस्तू दान करायला विसरु नका,पुण्यप्राती होईल