हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला तुळशी माता पण म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मानुसार ज्या घरात तुळशीचे रोप लावले आहे त्याची पूजा करतात. तर आज आपण या लेखात तुळशीचे फायदे माहिती पाहणार आहोत .

त्या घरात सुख समृद्धी शांतता राहते. त्या रोपाला खूप कल्याणकारी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते .तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घातल्याने आपल्याला पुण्य मिळते. तुलसी ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे .ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे महालक्ष्मी सदैव वास करते .

ज्या घरात तुळशीचे रोप लावलेली असते त्याच्यावर भगवान विष्णूची कृपा राहते. आपल्या आरोग्यासाठी तुळस ही अत्यंत उपयोगी आहे. तुळशीचे बरेच औषधी उपाय असतात ते आपण पाहणार आहोत. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि पोषक तत्व असतात त्यामुळे तुळस ही मानवाला सगळ्यात अत्यंत उपयोगी आहे.

तुळशीचे किती प्रकार आहेत.

तुळशीचे दोन प्रकार आहेत.

1.राम तुळस-

रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्याची पाने गोड असतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते. घरात असणे खूप शुभ असते.

२.कृष्ण तुळस-

कृष्ण तुळस लावणे खूप शुभ आहे, तसेच आयुर्वेदातही याला खूप महत्त्व दिले गेले आहे. कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृष्ण तुळशीची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे.

तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि विटामिन आहेत. विटामिन ए, बी ,सी. बीटा कॅरेटिन .

तुळशीचे फायदे.

  • तुळस बऱ्याच आजार बरे करण्यास मदत करते .ते आजार कोणते आहे ते पाहू.
  • सर्दी ,खोकला, स्वाईन फ्लू, डेंगू मलेरिया, टीबी, कॅन्सर, हृदयविकार , रक्तदाब ,केसाचे त्वचेचे आजार.
    अनेक प्रकारच्या तुळशीचा अर्क कॅन्सर सारख्या आजारावर उपयुक्त ठरतो.
  • एक ग्लास ताकातून दोन-तीन तुळशीचा अर्क घालून दररोज पिल्यास कॅन्सर पासून आराम मिळतो.
    तुळशीचा रस किंवा अर्क खाज, खरूज, चट्टे त्वचा विकारावर परिणामकारक ठरतो.
  • डोकेदुखी, केस गळणे, केस पिकणे ,कोंडा होणे यावर तुळशीचा रस परिणामकारक ठरतो.
    तुळशीचा रस आपण पाण्यातून प्यायला पाहिजे. तुळशीचा रस डोक्याला लावून मसाज केल्याने त्याचा फायदा होतो.
  • आपण आपले फेस क्रीम मध्ये दोन थेंब तुळशीचा रस घालून चेहऱ्याला लावावा. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग पिंपल्स निघून जातील आणि चेहरा तेजस्वी होईल.
  • तुळशीचे फायदे खूप आहेत ,जर तुम्हाला सर्दी, खोकला आला असेल तर तुळशीच्या रसाचे दोन थेंब मधाबरोबर घेतल्याने लवकर आपला आजार बरा होतो.
  • जर तुमचा घसा दुखत असेल तोंड आलं असेल तर गरम पाण्यात तुळशीच्या रस टाकून गुळण्या करा. जर तुमचे दात दुखत असतील तर कोमट पाण्यात तुळशीच्या रसाचे थेंब घालून गूळण्या करा. त्यात दात दुखी थांबते. तसेच दुर्गंधी नाहीसी होते.
  • कान दुखत असतील तर तुळशीच्या रसाचे दोन दोन थेंब कानात टाकावे .
    आपण दररोज पिण्यासाठी पाणी भरतो .त्यात तुळशीच्या रसाचे काही थेंब टाकून ते पाणी पिल्याने अनेक आजारापासून आपले रक्षण होते.

तर आज या लेखात तुळशीचे फायदे हि माहिती पहिली आहे .तुम्हाला हा लेख कशा वाटला .

संदर्भ

१. घे भरारी : आरोग्य सल्ला : तुळशीचे घरगुती फायदे

आमचे इतर लेख