दरवर्षी नवरात्राच्या दिवसात न चुकता तिरुपती मंदिराकडून महालक्ष्मीअंबाबाई ला मानाचा शालू पाठवला जातो. आणि दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाई ला नेसवण्यात येतो. तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला विष्णू पत्नी म्हणून शालू पाठवण्याची ही परंपरा फार जुनी नाही.
2015 साली भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले. कोल्हापूरचे अंबाबाई ही लक्ष्मी नसून अंबाबाई म्हणजे पार्वतीच रूप आहे. सुहास मधुकर जोशी यांनी संकलन समितीच्या युग युगीन करवीर हे पुस्तक लिहिले आहे.

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मूळ स्वरूपाचा शोध –

त्या पुस्तकामध्ये देवी अंबाबाईचा आणि महालक्ष्मी या दोन्ही नावाचा अर्थ समजून घ्या,

अंबाबाई

अंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या नावाने झाली जसे देवाला परब्रम्ह किंवा जगतपिता असे नाव आहे.

तसेच देविला जगदं अबा म्हणजे जगदंबा असे म्हणतात.

परंतु काळानुसार जगद हा शब्द काळाच्या ओघात नाहीसा झाला.

आणि अंबा हा शब्द राहिला त्यास या शब्दाला बाई हा शब्द मिळाला आणि अंबाबाई हा शब्द प्रसिद्ध झाला.

महालक्ष्मी नावाचा अर्थ

या शब्दाचा अर्थ सकल अलादी आणि सकळ जणांची स्वामिनी असा आहे. तसेच सर्व देव देवांमध्ये महादेव एकमेव सर्वश्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे सर्व लक्ष्मी गणामध्ये महालक्ष्मी ही सर्वश्रेष्ठ आहे.
देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असा होतो .त्यामुळेच देवीला ब्रम्हांडाची निर्मिती असे म्हणतात.

कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णू पत्नी आहे का ?

कोल्हापुरात हे महालक्ष्मीचे मंदिर आहे .तर विष्णू पत्नीचे नाव श्री लक्ष्मी असे आहे. त्यामागील कथा अशी आहे,
भृगु ऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवलोकात गेले.

जेव्हा महादेव आणि ब्रह्मदेवाला शाप दिल्यानंतर भृगु ऋषी हे वैकुंठात गेले .तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते .त्यांनी भ्रुगु ऋषीं लक्ष दिले नाही .

त्यामुळे रागाच्या भरात भ्रुगु ऋषीने विष्णूच्या छातीवर लाथ मारली. प्रहारने सावध झालेल्या विष्णू ने त्रास झालेल्या भृगू ऋषींची माफी मागितली.
छातीला लाथ मारल्यामुळे पायाला त्रास झाला असेल म्हणून श्रीविष्णुने भृगू ऋषींचे पाय धुतले व सेवा केली. गुरुजींचा क्रोध शांत झाला. श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहे असे पृथ्वीवर सांगितले.

छातीवर लाथ मारणाऱ्या भृगू ऋषीची विष्णू ने सेवा केली. म्हणून त्यांच्यावर नाराज होऊन श्री लक्ष्मीने वैकुंठ सोडले आणि त्या करवीर आल्या.
कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया आहे. तर तिच्यापासून तयार झाली श्री लक्ष्मी ही तिची मुलगी आहे.
त्यामुळे श्री विष्णू हे महालक्ष्मीचे जावई ठरतात.

तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मी पासूनच झालेली आहे .त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात .तसेच श्री लक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजेच माहेरी आल्या होत्या.

तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो ?

१९८३ साली तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यात सुरवात केली. हळूहळू अनोपचारिक पद्धतीने हे परंपरा सुरू झाली. पण १९९७ साली अंबाबाईला पाठवण्यात येणारे शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली.

मग कांची काम कोटीचे शंकराचार्य देवेंद्र भारती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्र लिहिले होते. की तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हा हलक्या दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी.
तो शालू अतिशय उत्तम पद्धतीचा आणि देवीला शोभेला असावा.

अशी मागणी शंकराचार्य यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतर तिरुपती मंदिराकडून अतिशय महागडा शालू कोल्हापूरच्या

अंबाबाईला दरवर्षी पाठवण्याची परंपरा सुरू झाली .ती आजपर्यंत चालू आहे, जे लोक तिरुपती बालाजीचे दर्शनाला जातात. ती कोल्हापूरच्या देवी दर्शनाला येतातच.

तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो ?

दरवर्षी येणारा शालू तिरुपतीची पत्नी या नात्यानं स्विकारला जायचा, त्यामुळं आंबाबाई भक्त मंडळाच्या भावना दुखावल्या जायच्या. वास्तविक अंबाबाई ही तिरुपतीची आई मानले जाते, पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चुकीच्या पायंड्यामुळं हा वाद निर्माण झाला होता. 

पण आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आपली चूक सुधारत तिरुमला देवस्थानकडुन आलेला शालू इतर भाविकांप्रमाणे स्वीकारुन त्याची पावती तिरुमला देवस्थानला दिली आहे.

संदर्भ

  1. तिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू भेट
  2. तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो ?

आमचे इतर लेख