आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे जगन्नाथ मंदिराचे रहस्य .जगन्नाथ मंदिर हे असे ठिकाण आहे जिथे सायन्स नावाचे शब्द पण काम नाही करू शकत. जिथे कोणतं ध्वनी आणि ऊर्जा पण काम नाही करू शकत .तिथे तुम्हाला हवा पण विरुद्ध दिशेला जाताना दिसेल. जिथे खूप वेळा राजा महाराजांनी युद्ध केले .पण तरीपण हे मंदिर सुरक्षित आहे.
जगन्नाथ मंदिराचे माहिती –
जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मामधील चार पवित्र धामामधील एक आहे.
१)बद्रीनाथ २)जगन्नाथ पुरी ३)द्वारकाधीश ४)रामेश्वरम हे मंदिर आपल्या ईस्ट न कोस्ट पुरी मध्ये आहे.
श्री जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतीय राज्य ओडिशातील सर्वात प्रभावी स्मारकांपैकी एक आहे, गंगा राजवंशातील प्रसिद्ध राजा अनंत वर्मन चोडगंगा देवाने 12 व्या शतकात समुद्रकिनारी पुरी येथे बांधले होते.
जगन्नाथ मंदिराचे रहस्य
या मंदिरात नऊ रहस्यमय गोष्टी आहेत त्याचे उत्तर आत्तापर्यंत मिळाले नाही,
- कोणताही झेंडा हा आपल्या दिशेने उडतो. पण जगन्नाथ मंदिराच्या वर जो झेंडा आहे तो विरुद्ध दिशेने उडतो . आणि या मंदिराच्या टॉप वर जे चक्र आहे. ते कसे पण पाहिजे तरी सारखेच दिसते.
- या मंदिराच्या डिझाईन हे अशा प्रकारे केले आहे, की त्याची सावली पण पडत नाही.
- मंदिराच्या समोर तुम्ही उभा राहतात .तर तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज येईल ,पण मंदिराच्या आत मध्ये गेल्यावर तो आवाज गायब होतो.मंदिरा बाहेरचा काहीच ऐकायला येत नाही.
- या मंदिरावर कोणताच पक्षी बसलेला नाही .किंवा विमान पण या मंदिरावरून गेलेले नाही.
- या मंदिराचं खास वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात एक दिवशी एका लाखावरून लोक आले. तरी प्रसाद कधीच कमी पडत नाही .आणि वायाला पण जात नाही.
- या मंदिरावर जो झेंडा लावला आहे तो प्रत्येक दिवशी बदलतो. जर तो चुकून पण एखाद्या दिवशी बदलला नाही गेला तर ,हे मंदिर अठरा वर्षासाठी बंद होईल.
- इथे प्रसाद बनवण्याचे पण एक वैशिष्ट्य आहे .इथे सात मातीचे भांडे एकवर एक ठेवून त्याखाली लाकडांचा जाळ असतो. त्यात रहस्य असे आहे ,की जे मातीचे भांडे सगळ्यात वर असते त्यातलं अन्न सगळ्यात आधी शिजते, व सगळ्यात शेवटचे भांड्यातले अन्न नंतर शिजते.
- श्रीकृष्णाने आपल्या शरीराचा त्याग केला होता.
- असे म्हणतात श्रीकृष्ण यांनी आपल्या शरीराचा त्याग केला.
होता पण त्यांचे शरीर नष्ट झाले होते .पण त्यांच्या हृदयाला काही झाले नव्हते .
श्रीकृष्ण यांनी आपल्या शरीराचा त्याग का केला यामागील कथा-
असे म्हणतात की श्री कृष्ण हे सोमनाथ मंदिरात विश्राम करत असताना .तिथे जारा नावाचा शिकारी आला, त्याने त्यांच्या पायावर तीन बाण मारले .तेव्हा त्या शिकाऱ्याला वाटले की तिथे हरिण आहे .
त्याचे तो शिकार करणार होता .ते बान लागल्यामुळे श्रीकृष्ण यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. श्रीकृष्ण यांनी महाभारतात सगळ्यात सुरुवातीला असे म्हटले आहे की ,”या शरीराला सोडण्याचे कारण माझा पाय आहे “.असे म्हणतात ,की आज पण “श्रीकृष्णाचा हृदय” हे जगन्नाथ मंदिरात आहे. इथे बारा वर्षानंतर मूर्तीला बदलले जाते.
जगन्नाथ मंदिराचे रहस्य
ज्या दिवशी हे काम असते ,त्या दिवशी ओडिशा गव्हर्मेंट पूर्ण राज्याची लाईट बंद करते .कारण मूर्ती बदलण्याच्या वेळेस कोणी काही पाहू नये. आणि जे मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्याला पण पट्टी बांधतात . जे करून ते माणसे पण काही पाहू शकणार नाही.
जुन्या मूर्तीमध्ये जे पदार्थ आहेत, ज्याला श्रीकृष्णाचे हृदय मानले आहे .ते त्या नव्या मूर्ती ठेवतात. असे म्हणतात की त्या क्षणी जर कोणी ते पाहिले ,तर त्या क्षणी तो माणूस आपला शरीराचा त्याग करतो.
जगन्नाथ मंदिराचा इतिहास –
जगन्नाथ मंदिरावर महाराजांनी सतरा वेळा हल्ला केला.
१) पहिला हल्ला 1340 मध्ये झाला .बंगालचे सुलतान इलियास शाह याने केला.
२) दुसरा हल्ला 1360 साली झाला. दिल्लीचे सुलतान फिरोज शहा तुकलक यांनी जगन्नाथ मंदिरावर हल्ला केला.
३) तिसरा हल्ला 1309 साली झाला . बंगाल से सुलतान अलाउद्दीन हुसेन शहा यांच्या कमांडर इस्लाम गाजी यांनी केला.
४) चौथा हल्ला 1568 साली झाला. काला पहाड नावाचा एक अफगण ने हा हल्ला केला.
५) पाचवा हल्ला 1592 साली झाला .ओडिशाचे सुलतान ईशाचा मुलगा उस्मान ने केला .
६)सहावा हल्ला १६०७ साली झाला .बंगालचे नवाब इस्लाम याच्या कमांडर मिर्झा खुर्म ने केला.
७) सातवा हल्ला जगन्नाथ मंदिरावर ओडीसाचे सुबेदार हासिम खान यांनी केला.
परत १६०८ साली जगन्नाथ मंदिराच्या मूर्ती परत आणल्या.
८) आठवा हल्ला हा हाशिम खानच्या सेनेत काम करणाऱ्या एका हिंदू जागीरदाराने केला.
९) नवा हल्ला १६११ साली झाला.अकबराच्या नवरत्न सहभागी झालेल्या राजा टोड रमल च्या मुलाने केला.
१०) दहावा हल्ला १६११ साली परत टोडरमल याच्या मुलाने केला.
अकरावा हल्ला १६१७ साली झाला .दिल्लीचा बादशहा जहांगीर याचा सेनापती मुकरम खान यांनी केला.
१२) बारा वाजला १६२१ साली झाला .ओडीसाचा मुघल गव्हर्नर मिर्झा अहमद बेग ने केला.
१३) तेरावा हल्ला १६४१ साली झाला. ओडिशाचे मुगल गव्हर्नर मिर्झा मक्की यांनी केला.
१४) चौदा हल्ला हा हमला पण मिर्झा मक्कीने केला.
१५) पंधरावा हल्ला १६४१ साली झाला .पंधरावा हल्ला अमीर फतीय खान यांने केला.
१६) सोळावा हल्ला १६९२ साली झाला.हा हल्ला औरंगजेब यांनी केला.
१७) सतरावा हल्ला १६९९ साली झाला.१६९९ ला मोहम्मद तकी खान याने मंदिरावर हल्ला केला.
या सगळ्या हल्ल्यातून पण आपल्या पूर्वजांनी ह्या मूर्ती वाचवल्या.
जगन्नाथ मंदिरात तीन प्रमुख मूर्ती आहेत.
जगन्नाथ मंदिराचे रहस्य
१) जगन्नाथ.
२) सुभद्रा .
३)बलभद्रा.
या सगळ्या हल्ल्यामुळेच जगन्नाथ मंदिरात जाण्यासाठी खूप नियम आहेत.
या मंदिरात फक्त हिंदू लोकांनाच प्रवेश मिळतो .जर तुम्ही हिंदू नसाल तर तुम्हाला या मंदिरात प्रवेश मिळणार नाही. हे तेथे मंदिरा बाहेर शिलापथंमध्ये पाच भाषेत लिहिले आहे.